रानभाजी १३) सुरणाचे देठ

जागु's picture
जागु in पाककृती
12 Jul 2010 - 1:02 pm


सुरणाचे देढ हिरव्या देढावर पांढरे कोड आल्यासारखे असते दिसायला. वरचे साल काढून घ्यायचे.

सुरणाचे देठ हे आमटीत, कोलंबीच्या कालवणात, वाटाणा, बिरड्यात घालतात. हे सुरणाप्रमाणे खाजणारे असते. त्यामुळे ज्या पदार्थात टाकायचे त्यात आंबट घालावे लागते. ऋषीपंचमीच्या दिवशी जी भाजी केली जाते त्या भाजीतही ह्याचा देठ वापरतात.

ह्याच सुरणाला खाली कंद लागतो. त्याचा उपयोग भाजी, उपवासाचे पदार्थ करण्यासाठी होतो.

सुरणाच्या पाल्याचीही भाजी करतात अस ऐकलय पण मी कधी पाहीली किंवा खाल्लेली नाही.

प्रतिक्रिया

सहज's picture

12 Jul 2010 - 1:43 pm | सहज

बनवलेल्या भाजीचा फोटो पण दाखवा.

रताळ्याच्या, शेवग्याच्या पानाची पण डाळ, दाणे घालुन भाजी येउ द्या.

स्मिता_१३'s picture

12 Jul 2010 - 2:38 pm | स्मिता_१३

जागुताई
बनवलेल्या भाजीचा फोटु आणि रेशीपी पण टाका.

स्मिता

जागु's picture

12 Jul 2010 - 1:19 pm | जागु

सहज हा फोटो डिलीट करा. तो चुकुन लोड झालाय. मी सुरणाचा देयेत.

गणपा's picture

12 Jul 2010 - 1:31 pm | गणपा

ह्ममम...
फोटो पाहुन शंका आलीच होती.
सुरण थोडं पपईच्या पाना-देठासारखं दिसतं :D

जागु's picture

12 Jul 2010 - 3:05 pm | जागु

सहज, स्मिता बनवल्यावर टाकेन फोटो.
गणपा तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. साधारण तसच असत सुरणाच झाड पण वाढ मात्र तेवढी नसते.

स्वाती२'s picture

12 Jul 2010 - 7:46 pm | स्वाती२

जागू, तुमच्या मुळे नविनच माहिती मिळाली. माझी आई नेहमी सुरण लावायची पण अशी देठाची भाजी करतात हे माहित नव्हते.

नरेश_'s picture

12 Jul 2010 - 8:37 pm | नरेश_

नेहमीप्रमाणेच उत्तम :W
रानभाज्या येताहेत तोवर एक कट्टा घ्या प्लिज.

स्मिता चावरे's picture

15 Jul 2010 - 2:11 pm | स्मिता चावरे

मी कधी ऐकले नव्हते या भाजीबद्दल.... जागुताई धन्यवाद!

विसोबा खेचर's picture

12 Jul 2010 - 10:21 pm | विसोबा खेचर

सुंदर..

हापुस आम्बा's picture

13 Jul 2010 - 9:33 am | हापुस आम्बा

जागुतै , मि सुद्धा लहानपणी घरच्या सुरणाच्या पाल्याचि भाजि खाल्लि आहे. चणा डाळ घालुन करतात.

तेव्हा तितकिशि आवडलि नाहि.

जागु's picture

13 Jul 2010 - 12:37 pm | जागु

स्वाती, रसराज, तात्या, आंबा धन्यवाद.
नरेश धन्यवादरानभाज्या येताहेत तोवर एक कट्टा घ्या प्लिज.
म्हणजे काय ?
रसराज तुम्हाला मेल पाठवला आहे.
आंबा पण त्या भाजीत आंबट घालाव लागत असेल ना ?

साहित्य : सुरणाची कोवळी पाने, कांदा, तूर किंवा मूगडाळ, ओली मिरची, ओले खोबरे, हळद, मीठ, फोडणीसाठी तेल (शक्यतो खोबरेल).

कृती : सुरणाची पाने धुवून बारीक चिरावी व थोडे मीठ लावून ठेवावीत. कढईत थोडे तेल घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा टाकून परतावा. त्यावर भिजवलेली तूर वा मूगडाळ घालून चांगली परतून त्यावर कुस्करून ठेवलेली भाजी व मिरची घालावी. मुगाची डाळ लवकर शिजते. त्यामुळे भाजी शिजताना लक्ष ठेवावे. तुरडाळ घातल्यास ती थोडी शिजू देऊन मग भाजी घालावी. आधी मीठ लावले असल्यामुळे नंतर किंचित मीठ घालावे. झाकण ठेवून भाजी शिजवावी. त्यावर ओले खोबरे घालून भाजी उतरवावी.
ही भाजी अत्यंत चविष्ट असून सुरणाप्रमाणेच जास्त लोह क्षारयुक्त असते. डाळीमुळे प्रथिनेही मिळतात. शिवाय भाजी तंतुमय असते त्यामुळे सारक म्हणूनही उपयुक्त ठरते.

जागु's picture

17 Jul 2010 - 11:32 am | जागु

पिंगु सुरणाला खाज असते मग ह्या भाजीत काही आंबट नको का घालायला ? बाकि तुझी रेसिपी आवडली.