रानभाज्या - कंटोळी (कर्टुल,)

जागु's picture
जागु in पाककृती
15 Jul 2009 - 1:10 pm

कंटोळी

तयार भाजी

लागणारे जिन्नस:
४ जुड्या कंटोळी (उभी चिरुन, धुवुन)
२ कांदे
१ टोमॅटो
अर्धा चमचा आल, लसुण, मिरची, कोथिंबीर पेस्ट
फोडणी - राई, जिर, कढीपत्ता
थोडे हिंग
पाव चमचा हळद
१ ते २ चमचे मसाला
ओल खोबर पाव वाटी (खवुन)
२ चमचे तेल
चवि पुरते मिठ

क्रमवार पाककृती:
प्रथम तेलात वरील फोडणी घालावी व त्यावर कांदा गुलाबी रंगावर तळावा. कांदा शिजला की त्यावर आल लसुण वाटणाची पेस्त घालावी. थोड परतून त्यात हिंग, हळद, मसाला घालावा. जरा परतवुन त्यावर चिरलेली कंटोळी घालावीत. परतवुन ही भाजी वाफेवर (झाकणावर पाणी ठेउन) शिजवावी. शिजली की त्यात टोमॅटो चिरुन घालावा, मिठ घालावे. परत थोडावेळ शिजत ठेवावे. आता भाजी शिजली की त्यात ओल खोबर घालून परतवून गॅस बंद करावा.

अधिक टिपा:
ह्या भाजीत बटाटा ही घालता येतो. तसच कंटोळी कडधान्यात घालता येतात. आमटीत घालता येतात. पिवळी कंटोळी जुन असतात. जर आतुन लालसर झाली असतील तर घेउ नये.

प्रतिक्रिया

विंजिनेर's picture

15 Jul 2009 - 1:54 pm | विंजिनेर

ही वेगळी पद्धत दिसतीये... नुसती तेलावर मोहोरीची फोडणी देऊन परतली तरी छान लागते ही भाजी.
असो.
एक पार्सल इकडे पाठवून द्या आता तुम्ही केलीच आहे तर :)

----
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही

पक्या's picture

15 Jul 2009 - 1:57 pm | पक्या

वेगळीच भाजी. चित्रात कारल्यासारखी दिसते. चवीला कारल्यासारखीच असते का?
रेसिपी छान आहे.

चिरोटा's picture

15 Jul 2009 - 2:24 pm | चिरोटा

कडु नसते ही पण चवही नसते.आत लाल बिया असतात.वर सांगितल्याप्रमाणे मसाले टाकले की चविष्ट होते.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न

प्रणित's picture

15 Jul 2009 - 3:32 pm | प्रणित

कर्नाळ्या जवळ "हॉटेल कर्नाळा" येथे कर्टुलाची भजी फार छान मिळते.

रेवती's picture

15 Jul 2009 - 5:17 pm | रेवती

आणखी एका नव्या भाजीच्या पाकृबद्दल धन्यवाद!
आतापर्यंत ह्या भाजीबद्दल ऐकले होते आता पहायला मिळाली.
साहित्यामध्ये उल्लेख केलेला मसाला हा गोडा मसाला आहे की गरम मसाला?
(जागुने सहसा न केल्या जाणार्‍या भाज्यांची मालिका सुरु केलेली दिसते.;))

रेवती

जागु's picture

16 Jul 2009 - 10:39 am | जागु

हा साधा तिखट मसाला मी वापरला आहे. ही भाजी नुसत्या मिरचीवरही चांगली लागते.

सहज's picture

16 Jul 2009 - 11:25 am | सहज

>जागुने सहसा न केल्या जाणार्‍या भाज्यांची मालिका सुरु केलेली दिसते.

जागु कृपया सर्व अश्या भाज्यांचे दुवे एकत्र करुन लेखमाला करा म्हणजे वाचनखूण साठवायला सोपे होईल.

मदनबाण's picture

15 Jul 2009 - 8:11 pm | मदनबाण

ही भाजी बर्‍याच वेळेला खाल्ली आहे,पण ही कर्टुली कोवळी असतील तर जास्त छान लागते आणि यातील बिया मात्र कंटाळवाण्या असतात !!! :)

मदनबाण.....

Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa

दिपाली पाटिल's picture

15 Jul 2009 - 11:40 pm | दिपाली पाटिल

अमेरिकेत फ्रोझन कंटोली मिळतात पण अमेरिकन स्टाईलची च मोठ्ठी मोठ्ठी असतात भारतात पण कंटोली फक्त पावसाळ्यात मिळतात आणि रानातच उगतात बहुधा. खुप मस्त लागते याची भाजी..आई फक्त तेलावर फोडणी घालुन परतवुन करायची , कधी कधी दाण्याचं कुट पण घालयची.
पण चालु ठेव मालिका...अजुन एक टाकळ्याची पण भाजी असते , ती पण मस्त लागते.

दिपाली :)

प्राजु's picture

16 Jul 2009 - 12:06 am | प्राजु

ही भाजी पाहिली आहे पटेल मध्ये. आता आणेन आणि करेन.
रानभाज्यांची ही मालिका चालू राहुदे.
अशीच एक घोळीची भाजी म्हणून असते. आमच्या बागेत यायची. कामवाल्या घेऊन जायच्या खुडून पण कधी घरी नाही केली. तुला माहिती असेल तर त्याचीही रेसिपी टाक.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

स्वाती दिनेश's picture

16 Jul 2009 - 11:33 am | स्वाती दिनेश

रानभाज्यांची ही मालिका चालू राहुदे.
असेच म्हणते.
या मालिकेत टाकळा, भारंगी, परवलं, शेवळं इ. येऊ देत..:)
स्वाती

जागु's picture

16 Jul 2009 - 12:00 pm | जागु

स्वाती पडवळ रानभाजी नाही. ती शेतातली आहे. शेवळ आता संपली ती पुढच्या वर्शी. तिची रेसिपी लिहू शकते पण फोटो नाही टाकता येणार.

सहज मी करते ह्या भाज्यांचे दुवे एकत्र.

जृंभणश्वान's picture

16 Jul 2009 - 5:02 am | जृंभणश्वान

कर्टुल्याचे काप करायची पण रेसिपी द्या ना, तेपण मस्त लागतात.

जागु's picture

16 Jul 2009 - 10:46 am | जागु

कंटोळीच्या काप ची रेसिपी मला पण माहीत नाही. तुम्हाला कळल्यास मला जरुर कळवा.

सुनील's picture

16 Jul 2009 - 6:42 am | सुनील

व्वा! पावसाळी रानभाज्यांची मालिका चालू ठेवा!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

आशिष सुर्वे's picture

16 Jul 2009 - 9:49 am | आशिष सुर्वे

जागु ताई, तुमच्या पाकक्रुती म्हणजे पर्वणीच!
महत्वाचे म्हणजे, बर्‍याच भाज्या मी एकल्या पण नाहीयेत!
आईला विचारीन म्हणतो..
बाकी, भाजीचे छायाचित्र पाहून तोंडाला पाणी मात्र सुटले!!
-
कोकणी फणस

सूहास's picture

16 Jul 2009 - 3:11 pm | सूहास (not verified)

आणखी एक्...सही...
मालिका चालु द्या...

सुहास

हुप्प्या's picture

18 Jul 2009 - 7:10 am | हुप्प्या

ह्यातल्या काही भाज्यांची नावे अस्सल मराठमोळी वाटतात. ह्यांच्यापैकी कुठल्या भारताच्या अन्य भागात वापरल्या जातात आणि त्यांची नावे काय आहेत हे कळले तर आवडेल.