रानभाजी १२) मायाळू

जागु's picture
जागु in पाककृती
6 Jul 2010 - 12:57 pm


मायाळूच्या भजीचे साहित्य :
मायाळूची आख्खी पाने स्वच्छ धुवुन
बेसन १ वाटी
हिंग चिमुटभर
पाव चमचा हळद
चवीपुरते मिठ
दोन चिमुट ओवा असल्यास
अर्धा चमचा तिखट
तळण्यासाठी तेल

मायाळूच्या भजीची पाककृती :
मायाळूची पाने आख्खी स्वच्छा धुवुन घ्यावीत. मग तेल सोडून साहीत्यात दिलेले सगळे जिन्नस थोडे पाणी घालून मिक्स करावे. थोडे घट्टच ठेवावे. बटाट्याच्या भजीला ठेवतो तसे. मग मायाळूचे एक एक पान भिजवलेल्या पिठात बुडवुन गरम तेलात सोडावे. गॅस मिडीयम ठेवाव. थोड्या वेळात भजी पलटून मग भजीला किंचीत लालसर रंग आला की काढाव्यात.

मायाळूची पिठ पेरुन भाजीचे (भगरा) साहित्य :
मायाळूची पाने धुवुन चिरुन
बेसन पाव वाटी
१ मोठा कांदा
फोडणी : राई, जिर, हिंग
हळद
१ चमचा मसाला किंवा २-३ मिरच्या
पाव चमचा साखर
अर्धा चमचा गोडा मसाला
चविपुरते मिठ

मायाळूच्या भाजीची (भगरा) पाककृती :
प्रथम कढईत वरील फोडणी द्यावी मग कांदा घालून थोड परतवुन हळद, हिंग मिरची किंवा मसाला घालावा. त्यावर मायाळूची चिरलेली पाने घालावीत. आता थोडावेळ पाने शिजवुन मग त्यात कोरडेच बेसन भुरभुरावे. मग त्यात गोडा मसाला, मिठ साखर घालून वाफेवर शिजू द्यावे. गॅस मंद ठेवावा नाहीतर खाली लागते. बेसन शिजले की गॅस बंद करावा.

अधिक टिपा:
मायाळूच्या पानांचा वेल खुप पसरतो. ही पाने वर्षभर मिळतात. त्याला छोट्या काळ्या बिया येतात त्या जमिनीवर पडल्या कि तिथे ह्याचि भरपुर रोपे उगवतात.
मायाळुच्या पानांची आमटीही करतात. पालकाच्या आमटीप्रमाणे.

प्रतिक्रिया

स्मिता चावरे's picture

6 Jul 2010 - 1:25 pm | स्मिता चावरे

आमच्याकडे हिरव्या देठाची भाजी मिळते.आणि पाने जास्त जाड असतात. आम्ही
मायाळूची डाळ-दाणे घालून ताकातली पातळ भाजी करतो. ती ही चविष्ट असते.
आता तुमच्या पद्धतीने करून पहायला हवी.

सहज's picture

6 Jul 2010 - 3:04 pm | सहज

भजी आवडली.

गणपा's picture

6 Jul 2010 - 3:47 pm | गणपा

असेच म्हणतो.
पालकच्या भजी सारखीच कुरकुरीत होते का?

पुष्कर's picture

6 Jul 2010 - 3:44 pm | पुष्कर

आमच्या घरी मायाळूची भाजी करतात. घरी सगळ्यांना आवडते (मला सोडून).

स्मिता_१३'s picture

6 Jul 2010 - 4:18 pm | स्मिता_१३

चविष्ट पाककृती !

स्मिता

जागु's picture

6 Jul 2010 - 4:35 pm | जागु

रसराज बर्‍याच ठिकाणी हिरवा मायाळू मिळतो.
सहज, गणपा, पुष्कर, स्मिता ह्याचा भगरा व भजी दोन्ही चविष्ट लागते.

शानबा५१२'s picture

6 Jul 2010 - 5:44 pm | शानबा५१२

राग मानु नका पण जंगलात राहणा-या व गरीब शेतकरी लोक मिपा वाचत नाहीत तेव्हा ह्या पाक्रु चे एक पुस्तक बनवा व त्या लोकांना द्या.........इमॅजीन कीती फायदा होइल त्यांना!!
आपल्याला चांगल काम केल्याच समाधान मिळेल ते वेगळ!!.......ना?

हे झाड की वेल काय ते,नदीवर येत का?नाही मी पाहीलय नदीवर.
आपण जंगलात वास्तव करुन आहात का?
कौतुक करण्याजोग काम करताय आपण्,पण ते योग्य लोकांपर्यंत नाही पोहचत.

_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे

माशांच्या देशी-विदेशी पाककृतींचे पुस्तक कोळीण गाठून तिला द्यायला हवे, तरच ते योग्य लोकांपर्यंत पोचले असे म्हणता येईल.

जागु,
आमच्याकडेही मायाळूची पातळ भाजी/आमटी करीत असत. मायाळूची भजी खाल्ल्याचे आठवत नाही. पण ओव्याच्या पानांची भजी आठवली.

शानबा५१२'s picture

6 Jul 2010 - 6:55 pm | शानबा५१२

माशांच्या देशी-विदेशी पाककृतींचे पुस्तक कोळीण गाठून तिला द्यायला हवे, तरच ते योग्य लोकांपर्यंत पोचले असे म्हणता येईल.

ओ मॅडम जरा परत वाचा मी काय व का लिहले आहे ते.राहु दे मी सांगतो.
मासे आपल्याला पण भेटतात व कोळीणींनाही(कोळ्यांनाही),तेव्हा कुणी कसे मासे बनवत ह्याला महत्व नाही उरत.
पण ह्या भाज्या...........ह्या असल्या रानटी भाज्या काहींना नावाने तरी माहीतेत का??
नाही ना,मग!......
.......पण ज्यांच्या आजुबाजुच्या परीसरात ह्या भाज्या मुबलक प्रमाणात आहेत ते लोक ह्या पाकक्रुती चांगल्या प्रमाणे उयोपगात आणु शकतील.त्यांना 'त्या' पुस्तकाचा फायदा होइल,ना?आपल्याला फक्त फोटो कामाचे,की जंगलात जाणार आहात कुणी भाज्या तोडायला? नाही ना,मग!
मासे सगळ्यांकडे उपलब्ध आहेत तेव्हा त्याबद्दलच पाक्रुच पुस्तक वाटुन काय फायदा? नाही ना फायदा? नाही.मग?
.......आता कळल मला 'नक्की' काय म्हणायच आहे ते?

नोंद

:,की जंगलात जाणार आहात कुणी भाज्या तोडायला? नाही ना,मग!

ह्या आणि तत्सम प्रश्नांना तुमच उत्तर 'हो' अस असेल,तर.....................जय महाराष्ट्र,जय बिहार्,जय गुजरात्,जय आसाम्,जय पंजाब नी जय हरीयाणा!

_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे

चित्रा's picture

6 Jul 2010 - 7:12 pm | चित्रा

मायाळू, टाकळा, कर्टुले, भारंगी, शेवळ या भाज्या माहिती असलेले जाणते लोक कोकणपट्टीत अनेक मिळतील. पण अलिकडच्या काळातील कोबी, टोमॅटो, कॉलीफ्लॉवर, अशा भाज्यांच्या सुळसुळाटामुळे पूर्वीच्या या भाज्या शहरी लोकांच्या अन्नात दिसेनाश्या होत आहेत. अजूनही टाकळा, शेवळे या भाज्या निदान कोकणातील लोकांना माहिती असाव्यात. त्यामुळे जागु यांच्या या लेखनाबद्दल मला विशेष आस्था वाटते.

असो. आणि तुमचा "टोन" आवडला नाही, म्हणून तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

शानबा५१२'s picture

6 Jul 2010 - 7:33 pm | शानबा५१२

व्यनी वाचा..........
आज माझ्या प्रतिसादांना अल्पायुष्य आहे.

_________________________________________________
''मौन मधे जर शक्ती असती तर सर्वात शक्तीशाली मीच असतो!!
see what Google thinks about me!
इथे

रेवती's picture

6 Jul 2010 - 7:20 pm | रेवती

भाजीचे नावच किती छान आहे.
आमच्याकडे कधितरी व्हायची ही भाजी.
रसराज म्हणतात त्याप्रमाणे डाळ दाणे घालून आई भाजी करायची.

रेवती

जागुताई आता टाकळा राहिला वाटतं.

विसोबा खेचर's picture

6 Jul 2010 - 9:59 pm | विसोबा खेचर

संग्राह्य लेखमाला..

जागु's picture

7 Jul 2010 - 11:21 am | जागु

शानबा, धन्यवाद.
तुम्ही राग येण्यासारख काहीच लिहल नाहीत. योग्य तेच सांगताय. माझ्याही मनात हाच विचार आहे.
थोड्या दिवसांनी ही राने आणि डोंगर सिमेंट कॉन्क्रिट चे रान उभे करतील मग ह्या भाज्याचे कदाचित नामोनिशानही राहणार नाही.

आणि तुम्ही म्हणालात की ह्या भाज्या ज्यांना दिसतात त्यांना कळतील ते ही अगदी पटत. कारण मी काही वेळा ज्या भाज्या विकायला कातकरणी बसतात त्यांना विचारते की ही भाजी तुम्ही कशी करता त्या म्हणतात आम्हाला माहीत नाही. आमच्याकडून विकत घेतात ती लोक करतात. अर्थात कातकरणी काही पुस्तक वाचणार नाहीत. पण त्यांची पुढची पिढी वाचु शकेल.
मला तुमच्या भावना समजल्या. मी प्रयत्न करते.
तुमचा व्यनी आम्ही कसा वाचणार :W ?

चित्रा धन्यवाद माझ्या लेखनाबद्दल वाटणार्‍या आस्थेसाठी.

रेवती हिच्या नावातच ममता आहे.

मिलिंद टाकळा टाकला आहे मी आधी शोधुन लिंक देते तुम्हाला.

विसोबा न चुकता तुमचा हा प्रतिसाद येतो नेहमी धन्यवाद.

सुप्रिया's picture

7 Jul 2010 - 4:21 pm | सुप्रिया

भजी आवडली.