रानभाज्या - टेरी (पावसाळी आळू)

जागु's picture
जागु in पाककृती
15 Jun 2010 - 12:59 pm

रानभा़ज्या :
१) कुरडूची भाजी - http://www.misalpav.com/node/8533
२) कंटोळी - http://www.misalpav.com/node/8546
३) टाकळा - http://www.misalpav.com/node/8565
४) भारंगी - http://www.misalpav.com/node/8576
५) कुलू - http://www.misalpav.com/node/8587
६) शेवळ - http://www.misalpav.com/node/12640
७) आंबट वेल - http://www.misalpav.com/node/12658


टेरीचे फतफते

साहित्य :
१ जुडी टेरी, म्हणजेच पावसाळ्यातील आळू
पाव वाटी शेंगदाणे (भिजवुन)
पाव वाटी चणाडाळ (भिजवुन)
सुक्या खोबर्‍याचे १०-१२ पातळ तुकडे (चिवड्यात घालतो तसे)
२ कांदे चिरुन
आल लसुण पेस्ट
फोडणी - राई, जिर, कढीपत्ता, हिंग
पाव चमचा हळद,
१ ते २ चमचे मसाला
अर्धा ते १ चमचा गरम मसाला
चिंचेचा कोळ
गुळ
चवीपुरते मिठ
थोडस ओल खोबर खरवडून

पाककृती:
प्रथम टेरी म्हणजे आळूची पाने चिरुन चिरुन घ्यावी व थोडी शिजवुन मिक्सरमध्ये पेस्ट करावी. पानांच्या देठांची साल काढुन त्याचे अर्धा इंचिचे तुकडे करावेत. भांड्यात तेल टाकुन वरील फोडणी द्यावी. आता ह्यात कांदा घालावा. कांदा शिजवायची गरज नसते. जरा परतुन आल लसुण पेस्ट, टेरीच्या पानांची पेस्ट, भिजवलेले शेंगदाणे, चणाडाळ, खोबर्‍याचे तुकडे, टेरिंची देठे घालावीत. आता हे सगळ शिजू द्याव. शेंगदाणे शिजले का ते पाहायचे मग त्यात गुळ, चिंचेचा कोळ, मिठ, गरम मसाला घालायचा. थोड खोबर घालायच मग थोडा वेळ उकळवुन गॅस बंद करायचा.

अधिक टिपा:
ही रेसिपी आणि टेरी बर्‍याच जणांना माहीत असेल. टेरिंची पाने हिरवीगार व देठ पांढरी असतात. काही काही टेरी विकायला येतात त्यांची पाने काळपट (वडीच्या पानांच्या आळूची पाने एकदम काळी असतात त्यापेक्षा कमी काळी असतात) ह्या काळपट देठांच्या आळूला खाज येते. साफ करतानाही. ह्यात चिंच जास्त घालावी लागते. पाढर्‍या देठाच्या टेरीला खाज कमी असते. साफ करताना काही वाटत नाही.

फतफत्यामध्ये सुक्या खोबर्‍याचे काप तसच ओल्या खोबर्‍याचा किस नाही घालता तरी चालतो.
शेंगदाणे आणि चणाडाळ च्या ऐवजी वालाच बिरड, पाढरे वाटाणेही छान लागतात.
चिंच गुळाचे प्रमाण व्यवस्थित झाले म्हणजे छान लागते हे फतफते.
अजुनही मी नुसते खाते.

प्रतिक्रिया

सहज's picture

15 Jun 2010 - 1:04 pm | सहज

हे टेरी नाव कुठून पडले. :-) अळूच वाटतोय की.

जागुताई पुढल्या पावसाळ्यात मिपाकरांची चार दिवसांची सहल तुमच्याकडे करावी म्हणतो. :-)

रानभाज्या ही मिपावरील एक उत्तम लेखमाला आहे.

जागु's picture

15 Jun 2010 - 1:12 pm | जागु

धन्यवाद सहज.
मी आनंदाने स्वागत करेन तुमच.
जेवायला काय ? रानभाज्या करु की मच्छी ?
हा पावसात उगवणारा आळू आहे.

गणपा's picture

15 Jun 2010 - 1:54 pm | गणपा

मस्त जागु तै.

अळुवडिचा अळु वेगळा असतो (काळसर हिरवट), तो शक्यतो भाजीत वापरत नाहीत. टेरीचा रंग थोडा पोपटी असतो.
या पावसाळी अळुला टेरी म्हणतात हे माहीत नव्हत.
गावाला तर प्रत्येक घरामागे हे असत हे, लावाव लागत नाही. त्याचे कांदे जमिनीतच असतात, पाउस पडला की आपोआप उगवते.

गोरेगावला महात्मा गांधी रोडवर रहाताना आमच्या इमारतीसमोर एक टेकडी होती. बेलवरकर वाडी. तिथे बरीच बैठीघर असायची. तिथल्या एका घरामागे पावळ्यात बरच अळु /टेरी उगवायच. आई मला १०-२० पैसे द्यायची अळु आणायला त्यात १०-१२ पानं(काड्यांसकट) मिळायची. दर गुरुवारी उपवासाच्या दिवशी आमच्या घरी वाल+अळु किंवा चणा+अळु च फतफत हे ठरलेलच असायच.
कृती जवळजवळ अशीच.
वो भी क्या दिन थे :)

अश्विनीका's picture

15 Jun 2010 - 9:48 pm | अश्विनीका

ईथे (अमेरिकेत) अळूच्या पानांना टारो लिव्हज म्हटलेले पाहिले आहे.
ते टेरी नाव ह्या टारो वरूनच आले असावे काय?
टारो रूट्स (कंद) पण मिळतात आणि त्याची ही भाजी छान होते. बटाटा रस्सा भा़जी करतात तशीच करायची पण चिंचेचा कोळ घालावा लागतो.
- अश्विनी

आशिष सुर्वे's picture

15 Jun 2010 - 10:04 pm | आशिष सुर्वे

जागु तै.. एकदम झ्याक भाजी!
गावची आठवन आली बग..

======================
कोकणी फणस

आम्ही पन ब्लॉगतो बर्र का!
http://ashishsurve.blogspot.com/

रेवती's picture

16 Jun 2010 - 8:24 am | रेवती

ही अळूची पातळ भाजी म्हणजे जीव कि प्राण!
अगदी रोजही खाऊ शकेन इतकी आवडते.
सुदैवाने माझ्या इथल्या दुकानात बर्‍यापैकी नियमितपणे मिळतात अळू.
जागुतै, पावसाळी, बीनपावसाळी असे अळूचे लाड इथे पुरवता येत नसले तरी आपण फोटो चांगले टाकले आहेत, एकदम हिरवेगार अळू आहेत.

रेवती

रामदास's picture

16 Jun 2010 - 8:45 am | रामदास

आंबटचुका टाकावा का असे म्हणतो आहे.

रेवती's picture

16 Jun 2010 - 9:32 am | रेवती

अगदी बरोब्बर!
या भाजीतील आंबटपणामुळे अळूची खाज कमी होते तसेच भाजी मिळून येते. चव तर ग्रेट लागतेच!
भाजीत हरभर्‍याच्या डाळीबरोबर दाणे असतातच पण काजू घातले तर छान लागतात. अळवात मी कधी कांदे नाही घातले! नवा प्रकार वाटतोय!

रेवती

जागु's picture

16 Jun 2010 - 10:43 am | जागु

रेवती, रामदास, आशिश, अश्विनीका, गणपा, सहज धन्यवाद
आंबटचुका ही टाकायचा प्रयत्न करते