रानभाजी ११) कोरांटी

जागु's picture
जागु in पाककृती
1 Jul 2010 - 1:13 pm

लागणारे साहित्य :
कोरांटीची भाजी स्वच्छ धुवुन चिरुन
२ कांदे
४-५ लसूण पाकळ्या
२-३ मिरच्या
हिंग
हळद
पाव चमचा साखर
चविपुरते मिठ
पाव वाटी ओल खोबर किसुन

पाककृती:
प्रथम कढईत तेलात लसणाची फोडणी द्यावी मग त्यातवर मिरची, हिंग, हळद घालून थोडे परतून चिरलेली कोरांटीची भाजी घाला. वर झाकण ठेउन थोड्या वेळाने परता. आता त्यात मिठ व साखर घालून थोडावेळ वाफेवर ठेवा. मग त्यात ओल खोबर घालून थोड परतुन गॅस बंद करा.

अधिक टिपा:

* कोणतीही रानभाजी ओळख पटल्याशिवाय घेउ नका.

ही कोरांटी ओसाड जमिनीत येते. ही मोठी झाल्यावर ह्याला काटे येउन निळी फुले येतात. बर्‍याच जणांनी पाहीली असेल. मोठी होउन फुले आली की परत मी फोटो टाकेन.

ही भाजी अजुन विकायला आलेली पाहीली नाही. पण ही भाजी माझ्या माहेरी परंपरेप्रमाणे खातात. ही भाजी कंबरदुखीसाठी गुणकारी असते असे म्हणतात म्हणून माझी आई न चुकता ही भाजी दरवर्षी करते. आता मी पण करते.

ही भाजी पावसाळयाच्या सुरवातीलाच येते. म्हणजे जी जुनी झाड असतात त्याला बोके येतात आणि काही बिया रुजुन झुडपे आलेली असतात. पण ही कोवळी असतानाच काढायला लागते कारण नंतर त्याला काटे येतात.

प्रतिक्रिया

जागु's picture

1 Jul 2010 - 1:14 pm | जागु

हम्म.. आता हा फोटो परत थोडा छोटा करावा लागेल.

सहज's picture

1 Jul 2010 - 1:15 pm | सहज

अभिनंदन फोटो करता :-)

भाजीची औषधी माहीती व टीप आवडली.

सुप्रिया's picture

2 Jul 2010 - 4:48 pm | सुप्रिया

भाजीची औषधी माहीती व टीप आवडली.
+ १
असेच म्हणते.

Nile's picture

1 Jul 2010 - 1:17 pm | Nile

तुझे आहे तुझपाशी मधी 'कोरांटी सारखी वाढले' ची आठवण झाली म्हणुन धागा उघडला, नाहीतर 'हिरव्याचे' प्रेम आम्हास नाहीच. ;)

चमचमीत
-Nile

गणपा's picture

1 Jul 2010 - 1:42 pm | गणपा

नेहमी प्रमाणे आवर्जुन धागा उघडला.

अजुन एका नवीन भाजीची आणि तिच्या औषधी गुणाची ओळख झाली.

स्मिता चावरे's picture

1 Jul 2010 - 1:44 pm | स्मिता चावरे

कोरांटीची भाजी करतात, हे माहित नव्हते. तुमच्यामुळे नवीन भाज्यांची ओळख होत्ये,त्याबद्दल तुम्हांला धन्यवाद!

किट्टु's picture

1 Jul 2010 - 2:27 pm | किट्टु

कोरांटीची भाजी पण करतात, हे माहित नव्हते. मी फक्त फुलंच पाहिली आहे.

पण अतिशय उपयोगी माहिती.

आंबोळी's picture

1 Jul 2010 - 3:35 pm | आंबोळी

कोरांटीची भाजी पण करतात, हे माहित नव्हते. मी फक्त फुलंच पाहिली आहे.
मी पण ... घरच्या बागेत निळी आणि गुलाबी अश्या दोन्ही कोरांट्या आहेत.. पण याची भाजी करतात हेच माहीत नव्हते....
टाकळ्याची पण भाजी करतात हे जागुतैंमुळेच कळाले... पावसाळ्यात लहानपणी पिवळी फुलपाखरे पकडायला खुप टाकळा तुडवलाय.... त्याच्या काहिश्या कडवट वासामुळे मला टाकळा विषारी वाटायचा...
म्हशींनी टाकळा खाल्ला की दुध कडवट होते....

यांची खरच भाजी करतात की खेचताय तुम्ही आमची?
उद्या कोयनेल, काँग्रेस गवत, डिडोनिया वगैरेची पण भाजी येईल असे वाटते... ;)

आंबोळी

जागु's picture

1 Jul 2010 - 3:20 pm | जागु

सहज, निल, गणपा, रसराज, किट्टू धन्यवाद.

विंजिनेर's picture

1 Jul 2010 - 3:24 pm | विंजिनेर

म्हणजे जी जुनी झाड असतात त्याला बोके येतात

हायला, काय सही शब्द आहे. बोके! वा!

रेवती's picture

1 Jul 2010 - 8:17 pm | रेवती

कोरांटीची भाजीही करतात हे माहित नव्हते.
त्या झाडाला काटेकोरांटी म्हणताना ऐकले आहे.
त्याची फुले पाहिलेली आठवतात.
नविन माहिती दिलीस जागु!

रेवती

JAGOMOHANPYARE's picture

1 Jul 2010 - 8:29 pm | JAGOMOHANPYARE

देवपुजेस्तव ही कोरांटी
बाळगी अंगणी कशीतरी
मधु मागशी माझ्या सख्या परी..

ती कोरांटी हीच काय?

अरुंधती's picture

1 Jul 2010 - 9:19 pm | अरुंधती

छान माहिती! आतापर्यंत कोरांटी ही तिच्या सुरेख फुलांसाठी आणि भरगच्च गजर्‍यांसाठी माहिती होती! जागू, तुझ्यामुळे नवी माहिती कळली. धन्स! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

1 Jul 2010 - 10:10 pm | विसोबा खेचर

mastach..! :)

अजबराव's picture

2 Jul 2010 - 8:20 am | अजबराव

लहान पणी गावाला हि फुले पाहिलि आहेत....पण मि गुलबि रन्गचि बघितलि आहेत...तिला काटी कोरांटी म्हणायचे.....त्याचि भाजि करतात हे महिति नव्ह्ते...

जागु's picture

2 Jul 2010 - 11:03 am | जागु

तुम्ही सगळे समजताय ती ही कोरांटी नाही ती कोरंटी. वरील चित्रातील पाने बघा. लांबट आहेत. पण ती केशरी फुले येणार्‍या आणि गजर्‍याची कोरंटीची पाने गोलाकर लांबट असतात मी हिवाळ्यात जेंव्हा फुल येतील तेंव्हा त्याचा फोटो टाकेन.

आंबोळी ही झाडे बागेत लावत नाहीत. उलट जर बागेत आली तर काढुन टाकतात. कारण ही मोठी झाल्यावर हिला मोठे मोठे जवळ जवळ १ इंचाचे टणक काटे येतात.