शेवग्याचा पाला
लागणारे साहित्य:
शेवग्याचा पाला
२ मोठे कांदे
२-३ मिरच्या
३-४ पाकळ्या लसुण
चिमुटभर हिंग
पाव चमचा हळद
३-४ खवलेल चमचे ओल खोबर
चविपुरते मिठ
चिमुटभर साखर
तेल
पाककृती:
प्रथम शेवग्याचा पाला काढुन धुवुन चिरुन घ्यावा. मग तव्यावर थोडा भाजावा. आता तेलावर लसुण टाकुन मिरची, कांदा, हिंग, हळद घालावे वरुन शेवग्याचा भाजलेला पाला घालावा परतुन थोडा वेळ शिजवावा. भाजलेला असल्यामुळे जास्त शिजवण्याची गरज नसते. मग मिठ, साखर, खोबर घालून थोड परतवुन गॅस बंद करावा.
अधिक टिपा:
*आमच्याइथे हा पाला भाजून घेण्याची पद्धत आहे. पण न भाजताही मी भाजी केली आहे. ती भाजलेल्या पानाएवढी टेस्टी नाही लागली. कदाचित ह्या भाजीतील जडपणा जाण्यासाठी पाला भाजुन घेत असतील.
*इतर पालेभाज्यांप्रमाणे ह्या भाजीतही डाळी घालता येतात.
*शेवग्याच्या फुलांचीही भाजी करतात.
*ही भाजी उष्ण असल्याने पावसाळ्यात किंवा हिवाळ्यातच खातात.
*बाळाच्या पाचविला ही भाजी सटवाईला नेवेद्य म्हणून पानावर दाखवुन ते नेवेद्य बाळाच्या आईने खाण्याची पद्धत आहे.
*बाळंतीणीसाठीही ही भाजी पोषक असते.
प्रतिक्रिया
2 Aug 2010 - 4:24 pm | जागु
मला वरती परत संपादन करता येत नाही म्हणून फोटो खाली टाकत आहे.
शेवग्याचा पाला
शेवग्याला लागलेली फुले.
शेवग्याच्या पाल्याची भाजी
2 Aug 2010 - 4:45 pm | परिकथेतील राजकुमार
भाजी शॉल्लेड डेंजर दिसत आहे :(
2 Aug 2010 - 7:20 pm | प्रभो
सहमत आहे.. :)
2 Aug 2010 - 4:59 pm | गणपा
भजी खाल्ली आहे, भाजी नाही खाल्ली.
भाजीही चांगली लागावी बहुतेक.
2 Aug 2010 - 5:18 pm | मदनबाण
जागु ताई, तुझ्या सगळ्या पाकृ हटके वाटतात... :)
2 Aug 2010 - 7:03 pm | रेवती
जागुतै,
मस्त गं!
तयार भाजीचा फोटू पाहून लगेच करावीशी वाटते आहे.
3 Aug 2010 - 9:48 am | आशिष सुर्वे
जागुतै,
आपण खर्या अर्थाने 'पालेभाजी-तज्ञ' आहात..
एक निरिक्षण सांगतो.. ही पालेभाजी दिसायला एकदम नीटनेटकी, सुटसुटीत आणि सुंदर दिसते.. अन् आम्हा पोराटोरांना लहानपणी निवडायलाही मजा यायची ..
माझी आई ह्यात थोड्या हिरव्या मिरच्याही टाकते.
3 Aug 2010 - 12:28 pm | सहज
ही भाजी बरेचदा खाण्यात येते. नुस्ती पाने उकळून बारीक करुन कणकेत घातली तर पराठे म्हणुन देखील पोळीला पर्याय.
10 Aug 2010 - 8:49 pm | सूड
आमच्याकडे ही पानं भाजल्यानंतर त्यात पाणी ओततात, आणि ते निथळुन मग पानांची भाजी करतात. त्याने पानांचा कडवटपणा निघुन जातो असं म्हणतात.