रानभाज्या १०) वाघेटी

जागु's picture
जागु in पाककृती
21 Jun 2010 - 4:40 pm

ही आहेत वाघेटीची फळे :


ह्या फळांची साल व बिया काढुन फोडी करुन त्या वालाच्या बिरड्यात, पाढर्‍या वटाण्यात, किंवा कोणत्याही कडधान्यात घालतात. तसेच चणाडाळ घालून ह्याची भाजी करतात. हे साधारण कडू फळ असते.

टिप : कळकळीची विनंती आहे की कोणत्याही रानभाजीची खात्री पटल्याशिवाय ती घेउ नका.

१) कुरडूची भाजी - http://www.misalpav.com/node/8533
२) कंटोळी - http://www.misalpav.com/node/8546
३) टाकळा - http://www.misalpav.com/node/8565
४) भारंगी - http://www.misalpav.com/node/8576
५) कुलू - http://www.misalpav.com/node/8587
६) शेवळ - http://www.misalpav.com/node/12640
७) आंबट वेल - http://www.misalpav.com/node/12658
८) टेरी (अळू) - http://www.misalpav.com/node/12743
९) कवळा -http://www.misalpav.com/node/12776

प्रतिक्रिया

मस्त कलंदर's picture

21 Jun 2010 - 4:58 pm | मस्त कलंदर

हा हा हा.. चला एकतरी रानभाजी माझ्या ओळखीची निघाली.. आमच्या कडे (सांगली) हिला वाघाटी म्हणतात.. आई चण्याची डाळ घालून करते.. पण आम्ही भावंडं नाकं मुरडून मुरडून शेवटी तिच्यासाठी म्हणून एखादाच घास खातो.. :(

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

समिधा's picture

21 Jun 2010 - 11:06 pm | समिधा

आमच्या कडे वाघाटी म्हणतात. आम्हालाही आवडली नाही कधी ही भाजी, (पण माझी आजी म्हणायची की भाजी खायची म्हणजे पोटातुन राम नामाचा आवाज येतो आणी आपल्याला ऐकायला येतो. तो ऐकु यावा यासाठी ५वी परेन्त खाल्ली.........:))
नंतर कळायला लागल्यावर आजीला सांगायचो तु खा आम्ही तुझ्या पोटातुन आला तर ऐकतो :)

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

गणपा's picture

21 Jun 2010 - 6:36 pm | गणपा

पहिल्यांदाच पहातोय ही फळं.

सहज's picture

21 Jun 2010 - 6:47 pm | सहज

रानभाज्या!!

गणपा म्हणाला तसेच ही फळभाजी/ रानभाजी पहिल्यांदाच बघत आहे.

एक कुतूहल म्हणुन सध्या पुण्या-मुंबईत मेथीची जुडी, कोथिंबीरीची जुडीचा भाव व जागुताई तुम्ही दिलेल्या ह्या भाज्यांच्या भावात किती फरक आहे कोणी सांगू शकेल काय?

गणपा's picture

21 Jun 2010 - 7:25 pm | गणपा

पुण्या मुंबईच माहित नाही पण तुमच्या कुतुहलासाठी माहिती पुरवतो.

इकडे वाटीभर कोथिंबीर ४०-५० रुपयांना पडते :( (पेट्रोल २० रु/लि.)
जुडीची किंमत विचारायची हिंमत होत नाही.

-(कोथिंबीर के काडी काडी को मौताज ) गणा

शानबा५१२'s picture

22 Jun 2010 - 9:34 am | शानबा५१२

टिप : कळकळीची विनंती आहे की कोणत्याही रानभाजीची खात्री पटल्याशिवाय ती घेउ नका.

:D :D :D :D :D :D नाहीतर निघायची रेसीपी बरोबर!! =)) =))

खा रानभाज्या आणि पडा हॉस्पिटलमधे!!
लेखाचे नाव रानफळभाजी ठेवा.

रानभाजी - शेवळ
बर झाल फोटो दीलात तो,मी आता नदीवर दगड खरडायला जात होतो. =))

मदनबाण's picture

22 Jun 2010 - 10:24 am | मदनबाण

प्रत्येक भाग वाचतोय आणि दरवेळी नवी रानभाजीची माहिती मिळत आहे... :)

मदनबाण.....

"Life is like an onion; you peel it off one layer at a time, and sometimes you weep."
Carl Sandburg

विसोबा खेचर's picture

22 Jun 2010 - 5:17 pm | विसोबा खेचर

सुंदर लेखमाला...

तात्या.

जागु's picture

23 Jun 2010 - 10:43 am | जागु

कलंदर, गणपा, सहज, मदनबाण, विसोबा, शानबा, समिधा धन्यवाद.
समिधा तुझ्याकडून ही छान दंतकथा मिळाली रामनामाची. अशा काही काही भाज्या झाडांच्या आहेत दंतकथा.