मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रानभाज्या - भारंगीची भाजी

जागु · · पाककृती
कुरडूची भाजी - http://www.misalpav.com/node/8533 कंटोळी - http://www.misalpav.com/node/8546 टाकळा - http://www.misalpav.com/node/8565 लागणारे जिन्नस: २-३ भारंगीच्या जुड्या (पाने खुडून, धुवून, चिरून) २ मोठे कांदे चणा डाळ पाव वाटी भिजवून ५-६ लसुण पाकळ्या पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद २-३ मिरच्या चवी पुरते मिठ अर्धा चमचा साखर पाव वाटी खवलेला ओला नारळ २ मोठे चमचे तेल क्रमवार पाककृती: भारंगीचा चिरलेला पाला पाणी घालून उकडत ठेवावा उकळी आली की पाच मिनीटांनी गॅस बंद करुन त्यातील पाणी काढून हा पाला पिळून घ्यायचा. मग तेलावर लसुण, मिरची, हिंग, ची फोडणी देउन कांदा घालावा व हळद घालून चणाडाळ व भारंगीचा पाला घालावा. झाकण देउन थोडावेळ शिजवावे. चणाडाळ शिजत आली की त्यात मिठ व साखर घालून थोडावेळ शिजू द्यावे. डाळ शिजली की त्यात खोबर घालून गॅस बंद करावा. अधिक टिपा: ह्या भाजीत एक दिवस भिजत घातलेले वाल साल न काढता घालूनही भाजी करता येते तसेच चणा डाळ ऐवजी मुगडाळ, तुरडाळ, उडीदडाळ घालता येते. नॉनव्हेजमध्ये सुकट व ओल्या करंदीतही (छोटी कोलंबी) घालता येते.

वाचन 17797 प्रतिक्रिया 0