कुरडूची भाजी - http://www.misalpav.com/node/8533
कंटोळी - http://www.misalpav.com/node/8546
टाकळा - http://www.misalpav.com/node/8565
भारंगी - http://www.misalpav.com/node/8576
कुलू - http://www.misalpav.com/node/8587
शेवळ
ही आहेत काकड, ही मिठाच्या पाण्यात मुरवुन वर्षभार टिकतात.
http://farm2.static.flickr.com/1272/4684570080_26059be4ee_s.jpg
ही शेवळ कोलंबीत जास्त छान लागतात.
व्हेज मध्ये हवा असल्यास थोडा गुळ घातला तरी चालेल. चिंच जास्त घालु नये कारण काकड आंबट असतात. ह्या शेवळांना खाज असते सुरणा सारखी ती जाण्यासाठी काकड घालतात.
प्रतिक्रिया
9 Jun 2010 - 11:22 am | जागु
फोटो टाकले होते गायब झाले. कसे टाकायचे ?
9 Jun 2010 - 11:28 am | चिरोटा
चांगली वाटतेय.
ही शेवळ भाजी कुठल्या प्रदेशात उगवते? कुठे मिळेल?
P = NP
9 Jun 2010 - 3:17 pm | मदनबाण
बर्याच दिवसांनी जागु ताईंनी नविन भाजी प्रकार टाकला हाय... :)
ते शेवळ चा फोटु लयं छोटा हाय !!!
मदनबाण.....
"Intelligence is what you use when you don't know what to do."
Jean Piaget
9 Jun 2010 - 4:05 pm | सहज
शेवळ
काकड
बर्याच दिवसांनी जागु ताईंनी नविन भाजी प्रकार टाकला हाय...
असेच म्हणतो.
हे शेवळ कधी पाहीले नव्हते असे.
काकड म्हणजे बेबी एगप्लाँट सारखा प्रकार म्हणायचा का?
9 Jun 2010 - 4:43 pm | गणपा
सहज राव, काकड म्हणजेच भोकर का?
आमच्या वाडीत आहे भोकराच झाड.
माझी आजी भोकर खार्यापाण्यात मुरवायची. {खारातल्या आंब्यां(कैर्यां)प्रमाणे } मस्त लागतात. =P~
9 Jun 2010 - 5:04 pm | सहज
गणपा कल्पना नाही रे. मिभोभौंना विचारले पाहीजे.
मी दिलेले चित्र अगदी छोट्या आकाराचे वांगे आहे.
9 Jun 2010 - 3:41 pm | स्वाती२
आई गं! सोडे घालून शेवळाची भाजी आणि गरम गरम तांदुळाची भाकरी !
9 Jun 2010 - 5:13 pm | प्रियाली
वसई-पालघर भागात ही भाजी अतिशय प्रसिद्ध आहे. तिला शेवळं किंवा शेवरं असंही म्हणतात. आमच्या मातोश्री ही भाजी करण्यात प्रवीण आहेत. :) मला स्वतःला ही भाजी आवडत नाही कारण खाजरी असते.
कोलंबी, सोडे, करंदी घालून भाजी उत्तम लागते.
काकडं म्हणजे भोकरं नाहीत. काकडं ही वेगळी असतात. थोडीफार आवळ्यांसारखी दिसतात पण चव वेगळी असते.
9 Jun 2010 - 6:45 pm | चिंतातुर जंतू
काकडं ही सिट्रस प्रकारातली फळं आहेत (त्यामुळे आवळ्यासारखी हे बरोबर आहे). अळू, सुरण यासारख्या भाज्यांचा खाजरेपणा ज्या (माझ्या मते; चूभूद्याघ्या) स्फटिकांमुळे येतो, त्यांचा परिणाम आम्लामुळे कमी केला जातो. यासाठी अळूबरोबर जशी चिंच वापरतात, त्याप्रमाणे शेवळाच्या भाजीबरोबर काकडं वापरतात.
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
9 Jun 2010 - 9:11 pm | शुचि
माझ्या सासूबाई वसईला जाऊन यायच्या नातेवाईकांकडे तिथून या भाज्या घेऊन यायच्या. चांगल्या लागतात. पावसाळ्यात येतात मला वाटतं.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
9 Jun 2010 - 11:45 pm | प्राजु
जागु ताई कृती कुठे लिहिली आहे? का फक्त मीठाच्या पाण्यातच बुडवून ठेवायचे?
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
10 Jun 2010 - 12:36 pm | जागु
प्राजु
जर नुसती काकड खायची असतील तर ती मिठाच्या पाण्यात मुरवुन खातात. ही खाउन पाणी प्यायल्यावर पाणि गोड लागत. मोरआवळ्या प्रमाणे.
चिनी मातीच्या भांड्यात पाणि आणि भरपुर मिठ घालुन ही मुरवतात.
सहज फोटो मोठा केल्या बद्दल धन्यवाद.
भोकर वेगळी असतात.
तो सगळ्यात शेवटचा फोटो छोट्या वांग्यांचा आहे.
9 Jun 2011 - 10:18 pm | जागु
मिपाकरांनो शेवळ सध्या बाजारात आली आहेत.
10 Nov 2011 - 11:13 am | शिल्पा नाईक
रेसेपी दिसत नहिये कि टाकलीच नाहिये? माझी आई शेवळांची आमटी सोडे किंवा कोलंबी घालून करते. पण वसई विरार शिवाय या भाजीला जास्त कोणी ओळखत पण नाही.
14 Jun 2019 - 3:12 pm | वरुण मोहिते
लहान असल्यापासून ह्या भाज्या खात आलोय.कर्जत ला
10 Nov 2011 - 11:43 am | जागु
शिल्पा रेसिपी टाकलेली आहे. बाकीच्यांना दिसतेय.