श्रावणी सोमवारी दिंड्याच्या पानात उपवास सोडण्याची पद्धत आहे.
दिंड्याच्या झाडाचे देठ म्हणजे कोवळ्या फांद्या सोलुन तुकडे करुन शेवग्याच्या शेंगेप्रमाणे कडधान्यात घालतात तसेच कोलंबीच्या कालवणातही घालतात.
बाजारात दिंड्याचे देठ विकायला येतात देठ टोकाला थोडे लालसर असते किंवा कधी कधी पुर्ण लालसर असते. आल्यावर फोटो टाकतेच.
प्रतिक्रिया
19 Jul 2010 - 4:15 pm | स्मिता_१३
पाकृ कुठाय :S
पाकॄची वाट पाहत आहे.
स्मिता
21 Jul 2010 - 5:42 pm | प्रदीपा
दिन्ड्या ची फळ्भाजी मिळ्ते , त्याचीच पालेभाजी आहे का ही?... कच्च्या टोम्याटो सारखे दिसतात हे दिन्डे, पण थोडे कडक असतात. हो आणि पाक्रु द्या ना ... माहित असेल तर फळ्भाजी देखील सान्गा कशी करतात ते.. धन्यवाद.
21 Jul 2010 - 5:44 pm | वेताळ
वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती दिसताहेत त्यातली दिंडा कोणती?
वेताळ
21 Jul 2010 - 5:48 pm | आशिष सुर्वे
जागुतै, दिंडा चावून खायचा कं?
बाप्रे! मला अचानक डोसक्यावर शिंगं फुटल्यागत वाटलं!
>:)
======================
कोकणी फणस
आम्ही पन ब्लॉगतो बर्र का!
http://ashishsurve.blogspot.com/
22 Jul 2010 - 11:12 am | जागु
मी फोटो ची लिंक दिल्यावर वरची माहीती टाकली होती. त्यामुळे ती दिसत नव्हती. आता आधी टाकली आहे.