मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

kathaa

पैठणी दिवस भाग-१

गुल्लू दादा ·
झाली! सगळी तयारी झाली. दंतमंजन, पांघरूण, कपडे, साबण, इ. बारीकसारीक सामान भरून झाले. " प्रवासाला जाताना जितके कमी सामान न्याल तेवढे हाल कमी होतात." या जगमान्य सल्ल्याला अनुसरूनच बॅग भरणे सुरू होते. पण एक महिन्याच्या थांबा असल्यामुळे नाही म्हणता म्हणता 2 बॅग्स गच्च भरल्या होत्या. अरे हो! पण तुम्हाला सांगायचेच राहिले आम्ही कुठे निघालो ते. त्याच अस आहे की , माझे शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद येथे सुरू होते. त्या वेळी मी आंतरवासिता (इंटर्नशिप) करत होतो. एका वर्षांच्या प्रशिक्षणात एका महिन्यासाठी ग्रामीण रुग्णालयात सेवा देणे अनिवार्य असते.

रूम-मेट्स

मिडास ·
रूमचं दार उघडून अनघा बाहेर आली तर तिला निनाद सोफ्यावर मेल चेक करताना दिसला. “गुड मोर्निंग.” अनघा त्याच्याकडे हसत बोलली. “वेरी गुड मोर्निंग princess” तीला एक नाटकी सलाम ठोकत निनाद ने प्रत्युत्तर दिले. “कधी आलास?” आपले मोकळे केस बांधत अनघाने विचारलं. “आत्ता just आलो. तू ये फ्रेश होऊन. मी चहा बनवतो तोपर्यंत.” “ओके बॉस” म्हणत अनघा फ्रेश व्हायला गेली.

(why is there nothing rather than something ???????)

मुक्त विहारि ·
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

गूढ भाग ५ (शेवटचा)

ज्योति अळवणी ·
तुम्हा सर्वांच्या आग्रहाखातर मी उरलेली संपूर्ण कथा या भागात टाकते आहे. गूढ भाग १: http://www.misalpav.com/node/40024 गूढ भाग २: http://www.misalpav.com/node/40034 गूढ भाग ३: http://www.misalpav.com/node/40049 गूढ भाग ४: http://www.misalpav.com/node/40056 भाग ५ चंद्रभान म्हादुच्या घराच्या दिशेने चालतच निघाला. गाडी त्याने देवळाजवळच ठेवली. गाव इतके लहान होते की तिथे रस्ते देखील नव्हते. त्यामुळे गाडीने जाणे शक्यच नव्हते. कालपासून सतत लागोपाठ घटनाचक्र चालू होते. त्यामुळे खर तर चंद्रभानला शांतपणे विचार करायला वेळच मिळाला नव्हता. पण आता चालताना त्याच्या मनात विचार यायला लागले.

कथुकल्या १३

अॅस्ट्रोनाट विनय ·
१. गोष्ट “पप्पा सांगा न लवकर गोष्ट.” “ कुठली सांगू बरं… न्यूट्रोफायटा आणि लेडी अॅस्ट्रोनटची ?” “नको ती बोअर आहे.” “मग गुरुवरच्या चेटकीणीची ?” “ती सांगितलीये तुम्ही चारपाच वेळा.” “बोलकी निळी झाडं, जादुई रोबो, टेट्रोग्लॅमसचं सोनेरी अंडं ?” “सगळ्या सांगितल्यात ओ पप्पा. एखादी नवीन सांगा न.” नेफीसने थोडावेळ डोकं खाजवलं. “ठिकेय एक नवीन गोष्ट सांगतो. पृथ्वीवरच्या माणसांची.” “चालेल.” शेनॉय गोष्ट ऐकायला सावरून बसला. “खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. ðζ सूर्यमालेत पृथ्वी नावाचा एक ग्रह होता.

कथुकल्या १२ अद्भुतिका ( फॅण्टसी ) विशेष

अॅस्ट्रोनाट विनय ·
१. आयला ऑफिसला जाण्याआधी कश मारावा या हेतूपोटी नागेशने सिगारेट बाहेर काढली. पण लायटर पेटवताच त्यातून हिरवट रंगाचा चमकदार धूर बाहेर पडला. थोड्याच वेळात धुराचा छोटासा ढग तरंगू लागला अन ढगातून जिन प्रकट झाला. “हॅपी न्यू इयर मेरे आका. बोलीये क्या हुक्म है “ नागेश आश्चर्याने पाहू लागला “तू जिन आहेस ?!!” “हो हुजूर.” नागेशने स्वतःला एक चिमटा घेतला. “हे स्वप्न नाहीये मालिक.” “पण तू लायटरमधे कसाकाय ? जिन तर जादूच्या दिव्यात सापडतो ना” “बरोबर. तो मोठा जिन… बड़े भाईजान. मी छोटा जिन.” “आयला असंही असतं का ?” “जी हाँ.” “तू माझ्या इच्छा पूर्ण करशील न पण ?” “बेशक.

कथुकल्या ११

अॅस्ट्रोनाट विनय ·
१. तुझ्याविना… निखिलने डोळे उघडले अन टेबलावरच्या घड्याळात पाहिलं. आज उठायला तब्बल एक तास उशीर झाला होता. त्याने पटापट आवरलं अन ड्रेस बदलून तयार झाला. कॉलरवरच्या हिरवट डागाकडे पाहून तो जरा नाराज झाला पण एका आर्ट टीचरसाठी हे नेहमीचच होतं. जाताजाता त्याने प्रियाकडे वळून पाहिलं. ती त्याच्याकडे तोंड करून झोपली होती. लांबसडक सोनेरी केसांनी मुखचंद्रमा अर्धवट झाकला होता. डोळे मिटलेला तिचा सुंदर चेहरा शांत, प्रसन्न दिसत होता. “सॉरी डियर.

कथुकल्या १०

अॅस्ट्रोनाट विनय ·
१. अपघात रात्रीचे अकरा वाजले होते. अशोक पानसे त्याच्या अंधाऱ्या बेडरुममध्ये बसलेला. झोपणे तर दूर, गेल्या एक तासापासून तो जागचा हललाही नव्हता. तो अॅक्सीडंट राहून राहून त्याच्या नजरेसमोर येत होता. सिग्नलचा दिवा लाल झाला पण तो घाईगडबडीत होता, दिव्याकडे लक्ष न देता त्याने गाडी सुसाट पुढे पळवली. त्याच्या उजव्या बाजूचा सिग्नल केशरी झाला. पुढच्याच क्षणाला वाहनांचा लोंढा अन त्याच्या अग्रभागी असलेला बाईकवाला वेगात समोर आला. ब्रेक दाबायचं कुणालाच जमलं नाही. धडक बसली अन बाईकवाला दूरवर फेकला गेला. हॉर्न वाजत होते, लोक ओरडत होते.पण अशोकची दृष्टी बधिर झाली होती.

कथुकल्या ५ ( विज्ञानकथा स्पेशल )

अॅस्ट्रोनाट विनय ·
१. टेस्ट सब्जेक्ट नाकातून परत रक्त यायला लागलं. मी खिशातल्या रूमालाने नाक पुसलं. कमाल आहे, यावेळचं रक्त लालऐवजी काळपट दिसत होतं. कदाचित रस्त्यावरच्या उघडझाप होणाऱ्या दिव्यांमुळे तसं दिसत असावं. “मुव्ही आवडला का रे?” प्लियानीने आपला रेशमी हात माझ्या गळ्यात टाकत विचारलं. ती माझ्या इतकी जवळ असूनसुद्धा तिचा सहवास मला जाणवत नव्हता. पण परफ्युमचा मंद मोहक चंदनी सुगंध मात्र मनाला मोहवून टाकत होता. हा सुगंध मला पृथ्वीची आठवण करून देतो. “तुला मुव्ही आवडला का ?” तिने परत विचारलं. “हो.