Skip to main content

kathaa

दी टायगर्स असोसिएशन - रहस्यकथा भाग ४

लेखक शब्दानुज यांनी बुधवार, 15/08/2018 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग 2 भाग 3 सावंतांनी एकदाचा निर्णय घेतला. बाबांना ते म्हणाले , " देशमुख साहेब यावेळी मी तुमच्यावर विश्वास ठेवतो. ही सगळी कागदे इथे राहू देत. मला सगळ्या गोष्टीचा विचार करायला वेळ लागेल. तोपर्यंत तुम्ही हे शहर सोडून जाऊ शकत नाही. काही वेगळी बातमी कळाली तर मला कळवत रहा. पुढे काय करावे हे समजतच नव्हते.

मी (शतशब्दकथा )

लेखक शब्दानुज यांनी बुधवार, 14/03/2018 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
"चहा झालाय का ग ? " आल्या आल्या श्रीरंग मधूरावर ओरडला "अोरडायला काय झाल ? 'मी' तुमचच कपाट लावत होते. काय तो पसारा ..'मी' आहे म्हणून काय ते घर टिकलयं..नाहीतर उकीरडा करुन ठेवला असता सगळा ." "जास्त बोलू नको आता.. आधीच ऑफिसच टेंशन.. तिथे सगळेजण टिपूनच बसलेत 'मी' केलेल्या कामाचं क्रेडिट घ्यायला. .." "पप्पा तुम्हाला ना घरी कसं वागायच काहीच कळत नाही. ऑफिसचा राग घरी का आणता? " राघव श्रीरंगला म्हणाला " वा..'मी' तुला या जगात आणलो आणि मला अक्कल शिकवतो ?

डायरी

लेखक चेतन०२०१२ यांनी शुक्रवार, 02/03/2018 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
हे कस काय शक्य आहे? मला अजूनही विश्वास बसत नाहीये. पण मग मी आत्ता १५ मिनिटांपूर्वी पाहिलं ते काय होत? But today it’s been 10 years. म्हणून काय झाल, याचा अर्थ असा नक्कीच होत नाही की मी जे पाहिलं ते खोट आहे. माझ्याच डोक्यात चाललेली ही कालवाकालव माझाच अंत पाहते आहे. खर सांगू मला काहीच कळत नाहीये की मी खुश व्हायला हव की अचंबित. अरे After bloody 10 years I just saw her with my own two eyes. मला शहानिशा करन भागच होत की मी आत्ता जे पाहिलं ते खर होत की फक्त माझ्या मनाचे खेळ होते. मी आत्ता हा इथे उभा होतो. काय करत होतो बर ??? हा बिल भरत होतो. कसलं बर?? आईला ह्या पोरीने वेड लावलाय.

लव्हगुरू

लेखक बोबो यांनी सोमवार, 29/01/2018 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
कंपनीच्या बसमध्ये फोनवर हळू आवाजात बोलत असताना आपल्या शेजारी बसलेल्या ऑफिसच्या सहकारी पूजा आणि रिया दोघी आपल्याकडे पाहात हसताहेत, हे अमितला जाणवलं आणि तो अस्वस्थ झाला. त्याने फोन ठेवला, तसं त्यांनी लगेच विचारलं,"काय मग काय म्हणत होती गर्लफ्रेंड?" "क...क...क...कोण...गर्लफ्रेंड? नुसती मैत्रीण होती एक." "अरे लाजू नकोस आम्हाला सांगायला?आम्ही तुला मदतच करू?" क्षणभर अमित विचारात पडला. "तुम्ही मदत करणार?" त्याने विचारलं. "अर्थात,"रिया हसून म्हणाली,"अरे ही पूजा तर तुला एकसे बढकर एक टिप्स देईल. लव्हगुरू आहे ती. तिच्या टिप्स पाळल्यास तर गर्लफ्रेंड पटलीच पाहिजे." "असं असेल तर पूजा, प्लिज.

स्टोरीज ऑफ युअर लाईफ अँड अदर्स-पुस्तक परिचय

लेखक पिशी अबोली यांनी शुक्रवार, 05/01/2018 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या वर्षात अनेक पुस्तकं अर्धवट वाचून सोडून दिली, काही तीच तीच पुन्हा पुन्हा वाचली, अगदी मोजकी पूर्ण केली. त्या पूर्ण केलेल्यातलं एक 'स्टोरीज ऑफ युअर लाईफ अँड अदर्स'. हे पुस्तक वाचायला निमित्त झालं ते याच्याही आधीच्या वर्षात आलेल्या 'अरायव्हल' चित्रपटाचं. या पुस्तकातील एका लघुकथेवर आधारलेला हा चित्रपट बराच नावाजला गेला. पण हे निमित्ताचं अवांतर आवरून नेहमीसारखं आवडलेलं नोंदवण्यापुरतं पुस्तकाबद्दल लिहिलेलं हे थोडंसं. टेड चियांग या लेखकाच्या ठिकठिकाणी प्रकाशित झालेल्या आठ वेगवेगळ्या लघुकथांचा हा संग्रह आहे.

अण्णा

लेखक बोबो यांनी सोमवार, 20/11/2017 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णा --------- एम.बी.बी.एस. झाल्यावर मी निर्णय घेतला आता आपण प्रॅक्टिस करायची ती एखाद्या खेडेगावात. माझ्या या निर्णयाचं सगळ्यांना आश्चर्य वाटलं. पण मी माझ्या निश्चयावर ठाम होतो. आणि त्यानुसार कोकणातल्या त्या निसर्गरम्य खेड्यात मी डॉक्टरकीला सुरुवात केली. पैसा अर्थातच भरपूर नव्हता. पण पोटापुरतं मिळत होतं. पण विशेष म्हणजे शहराची धावपळ नव्हती. स्वस्थ निवांत आयुष्य चाललं होतं. अशात एके दिवशी क्लिनिकवर रंगा बोलवायला आला. शेजारच्या वाडीत कुणीतरी वृद्ध गृहस्थ आजारी होते. मी नाव विचारलं. “अण्णा दळवी”,रंगा म्हणाला. “अण्णा दळवी?” मला नाव ओळखीचं वाटलं. “अण्णा दळवी म्हणजे ते प्रसिद्ध लेखक 'श्री.ना.

सनी दिवानी, आबा बंगाली आणि सदा' या कथेतील एक अंश.

लेखक बोबो यांनी मंगळवार, 07/11/2017 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
"चला तर सदाशेठ. तुम्हाला अजिबात ताटकळत न ठेवता लवकरात लवकर तुमची इच्छा मी पूर्ण करून टाकतो." आपल्या छातीचे ठोके जोरजोरात पडताहेत हे सदाला जाणवलं. सनी दिवानी - मादक सौंदर्याचा ऍटमबॉम्ब, मदनिका, पूर्वाश्रमीची मादकपटांची नायिका व आताची चित्रपट अभिनेत्री.  सनी दिवानी, जिने संपूर्ण जगभरातील तरुणांची हृदयं आणि जिच्या मादक व्हिडीओजनी त्यांच्या मोबाईलमधली मेमरी आणि कॉप्युटर्समधली हार्ड डिस्क व्यापली होती, ती सनी दिवानी.  तिला भेटण्याच्या कल्पनेने सदाची अशी अवस्था झाली होती, त्यात नवल ते काय? जादूगाराने सदाला पुरुषभर उंचीच्या बंदिस्त अशा एका लाकडी खोक्याजवळ नेलं.

दिवाळी अंक 2017

लेखक बोबो यांनी शुक्रवार, 03/11/2017 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी !! कळविण्यास आनंद होतो की, यावर्षी खालील आठ दिवाळी अंकांमध्ये माझ्या कथा प्रकाशित झाल्या आहेत. १. आवाज - 'सनी दिवानी, आबा बंगाली आणि सदा' ही हलकीफुलकी कथा २. जत्रा - 'मिसळ खाणारी मुलगी' ही खुसखुशीत प्रेमकथा ३. धनंजय - 'पॉईंग' ही मनोरंजक विज्ञान कथा ४. मेहता मराठी ग्रंथजगत - 'सूड नावाची डिश' ही रहस्यकथा ५. सा. वार्तासूत्र (मराठी साहित्य परिषदेच्या कथास्पर्धेतील पारितोषिक विजेती कथा) - 'देखी जमाने की यारी' ही प्रेमकथा ६. वर्ल्ड सामना - 'नियतीचा संकेत' ही हलकीफुलकी प्रेमकथा ७.

फसलेल्या उपवासाची कहाणी

लेखक OBAMA80 यांनी सोमवार, 02/10/2017 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
तर हा काळ आहे साधारण २००५ मधील, जेव्हा अस्मादिक आयआयटी खरगपूरमध्ये उच्चशिक्षणासाठी दाखल झाले होते. मार्च महिन्यातला पहिला/दुसरा मंगळवार होता. होमसिकनेसमुळे घरापासून लांब रहाण्याचा एक दिवस संपला, याचा आनंद मी दर दुपारी जेवण करून वसतीगृहाच्या खोलीत टांगलेल्या कालनिर्णयच्या त्या दिवसाच्या चौकोनावर लाल फुली मारून साजरा करायचो. याबद्दल माझा रूममेट मला “रेड क्रॉस XXX” या नावाने चिडवायचा देखील. सावरकर अंदमानात असताना भिंतीवर रेघा मारून दिवसाची सुरूवात करत असे कुठेतरी वाचले होते.

डंकर्क... भाग - २

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 24/09/2017 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
डंकर्क भाग -२ Simple, Free Image and File Hosting at MediaFire हिटलर त्याच्या जनरल बरोबर चर्चा करताना. सर्व जनरल्स..कायटेल, फॉन बॉक व गुडेरियन या अशा महाकाय सेनेसमोर कोण उभे ठाकले होते तेही बघुया एकदा. दोस्तराष्ट्रांच्या सेनेत फ्रेंच आर्मी ग्रुप-१ च्या ५१ डिव्हिजन होत्या ज्याचे नेतृत्व करत होता जनरल बिलोट्टे. या ५१ डिव्हिजनमधे ब्रिटीशांच्या एक्सपिडिशनरी फोर्सच्या ९ डिव्हिजन होत्या.