Skip to main content

kathaa

ऐक..दरवाजा उघडू नकोस! (गूढकथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी सोमवार, 12/09/2022 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
ऐक.. दरवाजा उघडू नकोस! (गूढकथा) सायंकाळचा संधिप्रकाश आता, गडद जाणवायला लागला होता. अंधाराच्या छटा आता, अवतीभोवती विखुरल्या जात होत्या. त्या अंधाराच्या गडद छायेत एक एक वस्तू, अदृश्य होत होती. शेवटच्या गल्लीतला सगळ्यात पाठीमागचा तेरा नंबरचा बंगला, जो गल्लीच्या एकदम मागच्या टोकाला होता, तोही आता या अंधारात दिसेनासा झाला होता. जसा जसा अंधार वर चढू लागला, तसतशी भीती संथ गतीने माझ्या अंतर्मनात शिरत होती. या अशा बंगल्यात मी एकटीच होते.अगदी एकटीच.

सायन्स फिक्शन - तिकडची आणि इथली

लेखक अनुनाद यांनी रविवार, 04/09/2022 21:09 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. नारायण धारप ह्यांच्यावर भयकथा लेखक हा शिक्का बसला आणि मराठीमधे अतिशय उत्कृष्ट व काळाच्या पुढच्या विज्ञानकथा लिहीणाऱ्या लेखकाची ही बाजू वाचकांसमोर कधीही आली नाही. मराठीत विज्ञानकथा रुजली नाही याला लेखकाची प्रतिभा नव्हे तर वाचकांचं अज्ञान कारणीभूत होतं. कौटुंबिक सिरीयल्सचा तोच तो चोथा चघळणारे प्रेक्षक आणि जीर्णशीर्ण लव्हस्टोरीज पलिकडे न जाणारं बाॅलिवूड यामुळे मायदेशात सायन्सफिक्शन रूळली नाही पण तरीही धारप लिहीतच राहीले... X-men (मालिकेतील पहीला चित्रपट) जुलै २००० मधे release झाला.

भिंतीवरचा चिवट पिंपळ

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी बुधवार, 30/03/2022 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
भिंतीवरचा चिवट पिंपळ ----------------------------------------------------------------------------------------------------------- रेश्मा कण्हली. तिने अस्वस्थपणे कूस बदलली . तिच्या अंगात कणकण होती. तिचे दाट, काळेभोर रेशमासारखे केस मोकळेच होते. ते आता अगदीच गबाळेपणाने कसेही पसरले होते. परत तिला ग्लानी आली. त्यात तिला काहीबाही आठवत राहिलं. तिला तिचं लहानपण आठवलं . गावातलं. कित्ती छान होतं ते ! गरिबी असली तरी. तिचा बाप मोलमजुरी करायचा . तिची आई बाळंतपणातच दगावली होती. त्यामुळे बाप आणि आजी त्या आईविना पोरीला जास्तच जीव लावत. ते एका झोपडीत रहात. समोर लांबवर डोंगर होता. बाप दिवसभर कामाला.

डिटेक्टी्व पी.रामराव

लेखक भागो यांनी सोमवार, 21/03/2022 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
पी रामराव. जगप्रसिद्ध प्रायव्हेट डिटेक्टिव. (एफ आर एस डी) बाय अपॉइटमेंट ओन्ली. ही दरवाज्यावरील पाटी वाचून टरकून जायची मुळीच गरज नाही. ह्या क्षणी रामराव ऑफिसमध्ये टेबलावर पाय टाकून आपली नखे साफ करण्यात गुंतले होते. बेकार डिटेक्टिव दुसरे काय करणार? ‘ह्या क्षणी’ अस म्हणण्यातही काही अर्थ नव्हता. रामराव द ग्रेट गेले दोन अडीच तीन महिने दररोज नखे साफ करत होते. डोक्यात तुंबलेल्या बिलांचा विचार चालू होता. बँक बॅलंस अॅबसोल्युट मिनिमम लेवेलला आला होता. बँक आता फाईन लावणार अशी परिस्थिती झाली होती. दुष्काळात तेरावा महिना. दोन महिन्यांचे ऑफिसचे भाडे तुंबले होते.

एका (शैक्षणिक) सहलीची सांगता

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 16/01/2022 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
महाविद्यालयाची अधिकृत सहल गेल्याच महिन्यात झाली. माथेरानला. बरोबर प्राध्यापक, प्राध्यापिका आणि विद्यार्थिनीसुद्धा. धमाल आली. या सहलीच्या गमती जमती वेगळ्या. चमचमीत तर्रीदार मिसळ नेहेमीच खातो, पण कधीतरी घरी आ‌ईने केलेल्या मटकीच्या उसळीत फ़रसाण, कांदा घालुन लिंबू पिळुन ती मिसळ घरच्यांबरोबर खाण्यात एक वेग्ळी मजा असते, तशी. असो. विषयांतर नको, त्या सहलीचा वृतांत पुन्हा कधीतरी. तर सांगायची गोष्ट अशी की सहलीची खुमखुमी सर्वांना आली. नुकतीच सहल हो‌ऊन गेल्यामुळे पुन्हा सहलीला घरचे पाठवणं शक्य नव्हतं. मग काय करणार? ना‌ईलाजानं शैक्षणिक सहल आयोजित करावी लागली. कार्य सिद्धीस नेण्यास सदस्य उत्सुक होतेच.

समूदादाः डोळे पाणवणारी कादंबरी!

लेखक वामन देशमुख यांनी सोमवार, 26/07/2021 22:11 या दिवशी प्रकाशित केले.
'समूदादा' ही नागेश सू. शेवाळकर यांची बालकादंबरी वाचताना वाचकांना मनापासून आनंद होतो, एक प्रकारचे समाधान होते आणि डोळेही पाणवतात! समीर हा कादंबरीचा नायक आणि इतर बाल पात्रं आज घरोघरी, इमारतींमध्ये, गल्लोगल्ली आणि चाळींमधून निश्चितपणे भेटत असतात. त्यांना पाहताना मनात एक शंका आल्याशिवाय राहत नाही की, आजच्या स्पर्धेच्या युगात आपण बालकांचे बालपण हिरावून घेत आहोत की काय? कारण आज मुल दोन-अडीच वर्षांचे होत नाही तोच त्याची रवानगी 'प्ले ग्रुप' किंवा पाळणाघरात होताना दिसते आहे. समूदादा हे सर्वसामान्य घरामध्ये बागडणाऱ्या बालकांचे प्रतिनिधीत्व करणारे चरित्र आहे.

अनाकलनीय

लेखक Pradip kale यांनी बुधवार, 23/06/2021 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
सुरूवात कुठून करावी कळत नाहीये. परंतु हे सगळं जे माझ्या बाबतीत घडतयं याची नोंद हवी. त्यापेक्षाही महत्वाचं हे कुणाला तरी सांगायला हवं, पण ऐकल्यानंतर समोरच्याने समजून घेण्यापेक्षा वेड्यात काढण्याचीच शक्यता जास्त. म्हणून हे लिहुन ठेवायचं ठरवलं आहे. पण खरंच नक्की सांगायचं कुठुन; कारण याची सुरुवात कधी झाली ते माहीत नाही. की...? माझ्या बाबतीत असं घडतंय हे मला समजलं तेव्हापासून सांगु? खरंतर तुमचा विश्वास बसणार नाही, माझाच बसला नव्हता.पण शेवटी हे सगळं माझ्याच सोबत घडतंय, आणि पुन्हापुन्हा घडतंय.

.

लेखक एस.बी यांनी गुरुवार, 17/06/2021 12:04 या दिवशी प्रकाशित केले.

.

लेखक एस.बी यांनी मंगळवार, 15/06/2021 14:12 या दिवशी प्रकाशित केले.

पाऊस

लेखक VRINDA MOGHE यांनी रविवार, 11/10/2020 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
                      पाऊस               हवेतला उकाडा भयंकर वाढला होता. धरती उन्हाच्या सततच्या मा-याने प्रमाणा बाहेर तापली होती. सारी सृष्टी पहिल्या पावसाची चातकासारखी वाट पहात होती. अखेर त्याची येण्याची चाहुल लागली.  दुपारपासूनच मळभ दाटून अंधारून आल होतं.  हळुहळु गार वारा सुटला.. पाचोळा, केर सैरावैरा पळू लागले. झाडं आधी हळुच मग वा-याच्या रेट्याने जोरजोराने डुलू लागली.