मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कृष्णमुर्ती

मी विलायती ‘नीट’ घेणे टाळतो

ज्ञानोबाचे पैजार ·
डॉक्टर साहेबांची माफी मागुन आपले काव्य पुष्प मी मिपारसिकांच्या चरणी सविनय सादर करतो. या अज्ञबालकाचे चार तोडके मोडके बोबडे बोल तुम्ही गोड मानून घ्याल ही आशा करतो वेळ संध्याकाळची मी पाळतो मी विलायती ‘नीट’ घेणे टाळतो फारसे चखणे नसावे वाटीतही मी उगाचच मेन्युकार्डही चाळतो ही मळलेली वाट आहे पण इथे परताना मी किती ठेचकाळतो कोणते असतात ग्रेव्हीत हे कलर रंग शर्टाचा कसा डागाळतो केवढे जडशीळ झाले हे नयन देव जाणे कसा तोल सांभाळतो चालला असता अजुनही एक स्मॉल मी कुठे मोजून मापून ढोसतो पैजारबुवा,

कॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))

कॅप्टन जॅक स्पॅरो ·
म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत.

घोस्टहंटर- पायरेट ऑफ़ अरेबिया ३

DEADPOOL ·
क्रेकन द मॉन्स्तर! क्रेकनने त्याला गिळले. आणि तो एका अंधार पोकळीत घुसला! अंधार आणि फक्त अंधार! डोळ्यात बोट घातले तरी कळणार नाही. "आलास तू?" त्या पोकळीतून धीरगंभीर आवाज आला. "हो" अरब म्हणाला. "शैतानाची कलमे लक्षात आहेत?" "हो" "वागशील त्यानुसार?" "हो" "चांगलं की वाईट?" "वाईट" "नाग की गरुड़?" "नाग" "बकरा की गाय?" "बकरा" "स्वर्ग की नरक?" "नरक" "प्रेम की द्वेष?" "द्वेष" तो हसला! "शेवटचा प्रश्न जमीन की समुद्र?" "जमीन!" "नाग आणि बकरे तुला मदत करतील." तो अंधार पोकळीतून बाहेर आला. समोर पूर्ण वाळवंट! वाळवंटात एक जहाज बाहेर येत होती. त्याच्या कानात आवाज घुमला 'तू जमीन निवडलीस' पायरेट ऑफ़ डेज़र्ट! पायरेट

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया २

DEADPOOL ·
घोस्टहंटर-१ www.misalpav.com/node/34123 घोस्टहंटर-२ www.misalpav.com/node/34140 घोस्टहंटर-३ www.misalpav.com/node/34145 घोस्टहंटर-४ www.misalpav.com/node/34161 घोस्टहंटर-५ www.misalpav.com/node/34185 घोस्टहंटरच्या निमित्ताने! www.misalpav.com/node/34200 घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया १ www.misalpav.com/node/34204 'मॉन्टेग्रो!' घोस्टहंटर सोसायटीतला अत्यंत प्रतिष्ठित हॉल ऑफ़ फेम मधील पहिल्या क्रमांकावर असलेला घोस्टहंटर! ------------------- स्लीपी होलोव! शिर नसलेल्या घोडेस्वाराचे खेडे! मात्र १९७६ मध्येच मॉन्टेग्रोने त्याचा अंत केला! एक व्यक्ति आज घोड्यावर बसून खेड्यात आली होती. "माफ करा महाशय,

हवाबाणहरडेचघळ

ज्ञानोबाचे पैजार ·
पेरणेमधल्या हळूवार भावना या कवितेतही जपायचा प्रयत्न केला गेल्या आहे. तरी सुध्दा अतिसंवेदनाशील वाचकांनी कृपया खालील काव्य वाचू नये. होणार्‍या परीणामास मंडळ जबाबदार रहाणार नाही.

आला आला जिलबीवाला

स्वामी संकेतानंद ·
काव्यरस
आला आला जिलबीवाला आला आला जिलब्यांचा धगधगता घाणा अन् पेटविला साधी जिलबी मावा जिलबी पण आहे पंजाबी की राजस्थानी देऊ बोला चांदनि चौकाची फेमस जिलबी सांगू पण भेसळमालाची देऊ खाण्याला आम्ही पाडू ती जिलबी गुपचुप खावी नाहीतर करता तुम्ही झिंगालाला जिलबीला माझ्या नावे ठेविति कोणी स्वादच नाही 'स्वामी' त्यांच्या जीभेला - स्वामी संकेतानंद जलेबीवाले

"जय" हो "श्री" "खंडुबाकी"

कॅप्टन जॅक स्पॅरो ·
*ढिस्क्लेमर* १. अस्मादिक टिव्ही नेहेमी पाहात नाही. २. ऐन दिवाळीच्या कधी नव्हे ते सलग दोन दिवस आणि एक विकांत असणार्या सुट्टीमधे दोन दिवस भेसेणेलने माती खाल्ल्यामुळे ब्रॉडबँड बंद असल्याने सोफ्यावर निर्विकारपणे बसलेलो असताना हा दुरचित्रवाणीय मानसिक अत्याचार आमच्यावर करण्यात आलेला आहे. तस्मात तु टी.व्ही. बघतोस का असा कुत्सित स्वरात विचारलेला प्रश्ण फाट्यावर मारण्यात येईल. (असे प्रश्ण टपालाने पाठवायचा पत्ता: पौड फाटा: ड्रॉपबॉक्स क्रमांक ४२० (अ)(प)ल्याडची पुण्यनगरी). ३. फालतु वाद घालणार्याच्या घरच्या स्त्रीवर्गास हे एपिसोड्स डाउनलोड करुन डीव्हीडी/ पेन ड्राईव्ह मार्गे पुरवुन बदला घेणेत येईल. ४.

पुणे कट्टा वृत्तांत- ४ ऑक्टोबर २०१५

कॅप्टन जॅक स्पॅरो ·
आमचे पेर्णास्त्रोतः भव्य आवाहन ~ दिव्य आवाहन ~ दो सोनार की इक लोहार की २४ सप्टेंबर २०१५ (ख्रिस्तपुर्व लिहायचा मोह आवरला) मिपावरचं एक भव्य (?) दिव्य (नमस्कार माझा तया दिव्यश्रीला) वॅक्टीमॅट्व श्री.स्त्री.दी.भव्यश्री ह्यांनी युरोपखंडे जर्मनदेशे नामक भुभागावरुन भारतामधल्या पुण्यभुमीमधे एक समस्तं मिपाकरांचा एक कट्टा व्हावा असा डाव्या पायातला बुट काढला.

पुणे कट्टा- ४ ऑक्टोबर २०१५,

कॅप्टन जॅक स्पॅरो ·
दिव्यश्रींच्या धाग्यावर जरा जास्तचं मारामारी झाली. असो. कट्टा फायनालाईझ झालेला आहे. कट्टा खालीलप्रमाणे होईल. तारिख पे तारिखः ४ ऑक्टोबर २०१५ वेळः रविवारी पहाटे ११.०० वाजता स्थळः पुण्यनगरीमधली पाताळेश्वर ही पावन जागा कार्यक्रम: भेटणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे आणि टवाळक्या करणे फायनान्स डिटेल्सः टी.टी.एम.एम. कोण कोण येणारे ते इथे कन्फर्म करा. म्हणजे भोजनास कुठे जायचे हे ठरवता येईल. दुर्वांकुरला जायचं का? (संपादकांना विनंती-४ तारखेनंतर धाग्यास हेवनवासी करावे. धाग्याकर्त्याला नको) धन्यवाद.

णवसदस्य आणि जगप्रसिद्ध संस्थळ

ज्ञानोबाचे पैजार ·
पेरणा एका जगप्रसिध्द संस्थळावर, नव्याने आलेल्या एका स्वयंघोषित प्रेशिताच्या मागे इतर सदस्य लागलेले असतात. त्या प्रेशिताला त्या संस्थळाचे संपादकही सहानुभूतीने सांभाळून घ्यायचा प्रयत्न करतात. त्याला व इतरांना सबुरीने घ्यायचा सल्ला देतात. काही नाठाळ सदस्यांना कानपिचक्याही देतात. त्यामुळे इतर सदस्य निराश होउन या प्रेशिताडे दुर्लक्ष करु लागतात. थोड्या दिवसांनी तो स्वयंघोषित प्रेशित संपादकांवरच विखारी टिका करायला लागतो. त्यांच्यावरच कंपुबाजीचे व पक्षपाताचे आरोप करायला लागतो.