काही दिवसांपूर्वी आपण माझ्या बरोबर काही आयटी वाल्यांच्या सवयीचा आस्वाद घेतलात. आता अजुन काही जमातीं कडे आपण पहाणार आहोत.
सर्वात पहिले : उच्चभ्रू !! (आंतरजालीय भाषेत या जमातीच्या लोकांना हुच्चभ्रू असे ही म्हटल्या जाते.)
आमचे कट्टर शत्रुत्व असलेली ही जमात, आपल्याला गल्ली-बोळात सहजासहजी सापडणार नाही, मात्र शनिवारी-रविवारी एखाद्या मॉल मध्ये आरामशीर सापडेल. अंगात , आंग्लभाषेत, आय एम अश्या ऍटिट्यूड धारी अक्षराने सुरु होणारं , अथवा एखादं प्रवचनीय वाक्य असलेले राऊंड नेक चे टी-शर्ट असेल.