Skip to main content

चारोळ्या

चार चारोळ्या

लेखक स्वप्नयोगी यांनी शुक्रवार, 29/05/2009 18:37 या दिवशी प्रकाशित केले.

तुझ्या आठवणींना कधीच
माझ्या वेदनांची नसते
गालावरच्या आसवांना मात्र
तुझ्या आठवणींची सय असते.

******

तो ढग बघ कसा
बरसण्यासाठी आतुरलाय
तुझ्या चिंब गालावरुन ओघळला
म्हणुन थेंबसुद्धा आनंदलाय

******

सुंदर गुलाबांना तुडवत
माणसं नाकासमोर चालतात
पण घरात शोभेसाठी
तीच माणसं 'कॅक्टस' लावतात.

******

निळंशार आकाश
चमचमत्या चांदण्या
आकाशात चंद्रसुद्धा
तुझ्यासाठी थांबलेला

अवांतर:- ही चारोळी नाही
आता चार दिवस सुट्टी
घरी चाललोय!!!!!!!!!!!!!!

अर्थ

लेखक स्वप्नयोगी यांनी शुक्रवार, 22/05/2009 18:16 या दिवशी प्रकाशित केले.

माझ्या शब्दांना अजुन तरी
काहीच अर्थ नाही.
जोपर्यंत त्या गीताला
तुझ्या ओठांचा स्पर्श नाही.

क्षितिज

लेखक स्वप्नयोगी यांनी गुरुवार, 21/05/2009 18:23 या दिवशी प्रकाशित केले.

तुझ्यात अन् माझ्यात फक्त
एका क्षितिजाचं अंतर आहे,
'जवळ असून दूर अन्
दूर असूनही जवळ आहे.'

गजरा.....

लेखक उदय सप्रे यांनी गुरुवार, 21/05/2009 11:47 या दिवशी प्रकाशित केले.

गजरा.....

लांब वेणी * उदास वाटते (* किंवा मोकळे केस उदास वाटतात)
केसांत फुले माळ गं जरा !
चेहेर्‍यामागेही सौन्दर्य आहे
डोकावून हळूच सांगेल गजरा !

यातना

लेखक स्वप्नयोगी यांनी बुधवार, 20/05/2009 19:47 या दिवशी प्रकाशित केले.

ओठावर हळूच येणारे शब्द
जेंव्हा माघारी वळतात
खरं सांगतो तुला मी
तेव्हा मनाला फार यातना होतात

कविता

लेखक स्वप्नयोगी यांनी मंगळवार, 19/05/2009 18:30 या दिवशी प्रकाशित केले.

तुझी आठवण
माझी कविता,
नजरेसमोर तू
शब्द गुंफताना.

कळ्या

लेखक स्वप्नयोगी यांनी सोमवार, 18/05/2009 19:07 या दिवशी प्रकाशित केले.

तुझी आठवण कधी
पाउल न वाजवता येते,
कधी थैमान घालते तर
कधी कळ्या फुलवते येथे.

श्रेय

लेखक स्वप्नयोगी यांनी रविवार, 17/05/2009 09:10 या दिवशी प्रकाशित केले.

माझ्या या कवितेचे
सारे श्रेय तुझे
कवितेचा आशय तू
शब्द मात्र माझे

ओझं

लेखक स्वप्नयोगी यांनी शनिवार, 16/05/2009 19:28 या दिवशी प्रकाशित केले.

चालण्यासाठी वाट असते
वाटेसाठी चालणं नसतं,
उंच भरारी घेणार्‍याला
आभाळाचं ओझं नसतं.

काव्य

लेखक स्वप्नयोगी यांनी शुक्रवार, 15/05/2009 18:24 या दिवशी प्रकाशित केले.

प्रीतीच्या ओसंडलेल्या पेल्यातुन
थोडी प्रीत खाली सांडते
मी तरी काय करु ?
त्यालाच जग काव्य म्हणते.