Skip to main content

चारोळ्या

आठवणींच्या चारोळ्या

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शुक्रवार, 17/06/2011 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
१. मनाच्या गाभा-यातून घोंघावतेय आठवणींचे वादळ थरथरणा-या पापण्यांतून ओघळतायत आनंदाश्रू नितळ
२. एकदा त्याच किनार्‍यावर एक स्वैर लाट भेटली त्या लाटेवर झालेली स्वार एक आठवण घेऊन आदळली
३. गंधुली अंगणातील रातराणीची सांजवेळीच मोहरून पसरली छोटुली कळी तुझ्या आठवणीची अवेळीच बहरून उमलली
४. तुझ्या आठवणींशी हृदयाची पहिल्या प्रहरी झडली चकमक जिंकता जिंकता हरलो मी राहिली अनंत वेदनेची तगमग

वेडे मन

लेखक प्रिया ब यांनी शुक्रवार, 17/06/2011 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
का नकळत एखाद्यात इतकं गुंतत जातो? त्या एका कटाक्षासाठी इतकं झुरत राह्तो? तो मात्र धुंद असतो त्याच्याच विश्वात तुम्हाला टिचभर जागा नसते त्याच्या जीवनात का हे अशक्य स्वप्न उराशी मी बाळगले? खरया परिस्थितीला सामोर जाण अवघड वाटू लागले हरवलेल्या मनाची मीच समजूत काढत राहिले.. कंठ दाटून आला आणि डोळे पाणावले!!!

घेऊ कसा उखाणा (तिकडम)

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 13/06/2011 19:55 या दिवशी प्रकाशित केले.
तिकडम सगळे जण आग्रह करतात लवकर नाव घ्याना तोंडात लाडुचा बकाणा घेऊ कसा उखाणा? . , . . शिकावू डेंटीस्टने- ढिली बनवली कवळी दात वाजती टणाणा मधे अडकून जीभ- करतेय नुस्ता ठणाणा घेऊ कसा उखाणा? . . . . पहिल्यांदा पडली टाळी, दुसऱ्याचा झाला हशा तिसरा सपशेल उताणा चौथ्याचा जिकर केला, तर लोक म्हणले हाणा घेऊ कसा उखाणा? ..........................................................
काव्यरस

मन

लेखक सामान्य वाचक यांनी गुरुवार, 09/06/2011 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
आता माझा छान वेळ जातो मनाशी खेळ्ण्यात, ते दडी मारुन बसले की त्याला शोधून काढण्यात

झाडे

लेखक सामान्य वाचक यांनी गुरुवार, 09/06/2011 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्यालाही जमायला हवं झाडांसारखं वागायला मातीत पाय रोवूनसुद्धा वार्‍याबरोबर खेळायला