लेखकस्वप्नयोगीयांनी रविवार, 10/05/2009 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
येणारा दिवस कधीच
तुझ्या आठवणीशिवाय जात नाही
दिवस जरी गेला तरी
तुझी आठवण जात नाही.
पंखांना क्षितीज नसते,
त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत मावणारे
आभाळ असते.
लेखकगोगट्यांचा समीरयांनी गुरुवार, 07/05/2009 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
ती , अल्लड ,अवखळ ,चंचल सरिता
ती, अद्भुत, अनोखी नव परिकथा ,
ती , सुन्दर,सोज्वळ,गौर रूपगर्विता,
ती ,आसमन्ती, अकस्मात झलके विद्युल्लता
ती माझी कविता, तीच माझी कविता ॥
लेखकप्राजुयांनी बुधवार, 01/04/2009 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
सहज या दोन ओळी सुचल्या.. कोणाला ही कविता पूर्ण करावी वाटली तर जरूर करावी. कोणाला दुसरे कडवे सुचले तर लिहावे.
ही कविता पूर्ण करण्यांस मदत करावी.
या गर्द नील नयनी, दाटून मेघ आले
का मोर पापण्यांचे मिटवून पंख बसले..?
- प्राजु