मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

Loreak...एक स्पॅनिश चित्रपट.

प्राची अश्विनी ·

सनईचौघडा 31/08/2021 - 18:12
अगदी असाच एक बंगाली चित्रपट मी परवा पाहिला अर्थात हिंदीत त्या मधे पण बायकोला अचानक एक दिवस भेटवस्तु येते. कुरियरवलाअ म्हणतो आम्हाला माहित नाही कोण आणतं ते आणि ते दिवसें दिवस वाढत जातं. तो आणि ती दोघेही आधीच संसारातुन मन उडालेले, फक्त एक मुलगी त्यामुळे गाडा रेटत असतात. अशात मुलीच्या आग्रहाखातर थोडाबदल म्हणुन गावी जातात आणि तिथे ही भेटवस्तु येते पण ….. शेवट तुम्ही स्वतः च बघा.

Loreak - flowers. Directors: Jon Garaño, José María Goenaga दोन स्त्रिया, ऍन आणि lourdes (मनी हाईस्टची राकेल). एकमेकांना न ओळखणा-या. दोघीही चाळीशीच्या आसपास. फुलांच्या एका निनावी बुकेमुळं त्यांच्या मनोविश्वात काय काय स्थित्यंतरं होतात हे तरलपणे दाखवणारा हा स्पॅनिश/ बास्क चित्रपट. दोघींच्या कथा इथं simultaneously उलगडत जातात. पहिलं कपल ऍन आणि तिचा नवरा. लग्नाला अनेक वर्ष झाल्यानंतर पती पत्नीच्या नात्यात येणारं साचलेपण, संवादाचा अभाव इथंही आहे. तिची मेनॉपॉज जवळ आलीय. त्यामुळे काही ना काही शारिरीक तक्रारी आहेतच. एक दिवस तिची डॉक्टर तिला सांगते, एक छोटी सर्जरी करावी लागेल.ऍन घरी येते.

कंदहार.. (इराणी चित्रपट 2001)

प्राची अश्विनी ·

चौथा कोनाडा 21/08/2021 - 17:15
खुप सुंदर ओळख. ही प्रस्तावना वाचून किती थरार अनुभवायला मिळणार हे लक्षात येतंय ! पहायचा म्हटल्यास कुठल्याही वरतून मंचावर (ओटीटी प्लॅटफॉर्मवर) दिसत नाहीय हा सिनेमा. मागे अफगाणिस्तानातील तालीबानी पार्श्वभुमीवरचं अशाच प्रकारचं "शौझिया" हे नाटक पाहिलं होतं त्याची आठवण झाली !

गॉडजिला 21/08/2021 - 19:58
चित्रपट नक्की पाहिल्या जाईल... आपण आपलं स्वातंत्र्य किती सहज गृहीत धरतो हाच भाव मनात पुन्हा पुन्हा येतोय... हे स्वातंत्र्य टिकवल पाहिजे संवेदनशीलता न गमावणे हा त्याचा पाया आहे _/\_

दुर्दैवाने अमेझॉन वर असून भारतासाठी उपलब्ध नाही. सध्या तरी पाहता येईल असे वाटत नाही. पण लेखावरून आपण अती सुदैवी असल्याची खात्री पटते. धन्यवाद

चित्रपटाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. मिळाला तर नक्कीच बघेन. नेटफ्लिक्स, अ‍ॅमॅझॉन प्राईम किंवा इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवर मिळाला नाही. युट्यूबवर पर्शिअन भाषेत आहे आणि सबटायटल्स अरबी की पर्शिअन भाषेत आहेत त्यामुळे त्याचा उपयोग नाही. त्याबरोबरच नॉट विदाऊट माय डॉटर हा चित्रपट पण असाच आहे. मिशिगनमधील एक अमेरिकन स्त्री डिट्रॉईटमध्ये राहणार्‍या एका इराणी डॉक्टरशी लग्न करते. तिचे लग्नानंतरचे अडनाव महमुदी. तिचा नवरा तिला पंधरा दिवसात अमेरिकेला परत येऊ असे आश्वासन देऊन तिला आणि मुलीला इराणला घेऊन जातो आणि दोघी तिथे अडकतात. त्यांचे पुढे काय होते हे चित्रपटातच कळेल.

In reply to by गॉडजिला

चौथा कोनाडा 23/08/2021 - 12:58
पण एकंदरीत बर्‍यापैकी जमून गेला होता. नाना, दिप्ती नवल यांचा अभिनय चांगला होता. करिष्माला वाटलं आपल्या खात्यात "चांगला अभिनय" या नावावर हा सिनेमा जमा होईल, पण हात्तीच्या ..... शारुक आन ऐशच्या आयटम सॉन्गने सिनेमाची पब्लिसिटीच बदलून टाकली. बिचार्‍या करिष्माने लै शिव्या घातल्या ! (माझ्या मते करिश्माच्या जागी दुसरी कोणीतरी हवी होती)

अनिंद्य 21/08/2021 - 22:34
उत्तम परिचय. आणि तुम्ही परफ़ेक्ट जागी थांबलात. स्वातंत्र्य अनमोल आहे हेच खरे. काबूल- तालिबान आणि अरब स्प्रिंगमधून प्रेरणा घेऊन मोहसेननी केलेला ‘द प्रेसीडेंट’ ज़रूर बघा. एका पदच्युत हुकुमशाहाची कथा !

कंजूस 22/08/2021 - 05:16
The kite runner कादंबरी ही अशीच आहे. अगदी आता काय चाललंय हे पाहायचे तर aljazeera dot com site किंवा aljazeera चानेलवर बऱ्याच डॉक्स येत असतात. ( इज्राएल पलेस्टिनवरही असतात.)

Bhakti 25/08/2021 - 15:40
प्रवासभर एका छोट्या वॉकमनवर ती आपले अनुभव, विचार रेकॉर्ड करत रहाते.तिच्या प्रवासाच्या backdropवर तिथलं समाजजीवन दिसत रहातं. असे स्वतः शोधायचे सिनेमा मला आवडतात. मस्त ओळख!

मदनबाण 09/09/2021 - 23:44
आज कंदहार [२००१ ] पाहिला. आयुष्य जगणे किती कठीण असु शकते याची जाणीव हा चित्रपट पाहताना होते. माईन्सवर चुकुन पाय पडल्याने विकलांग झालेले अफगाणी लोक कृत्रिम पायाची जोडी जी पॅरॅशुटने खाली टाकली जाते ती मिळवण्यासाठी धाव घेतात ते दृष्य फारच परिणामकारक आहे. मनुष्याने फार पाप केले की त्याला अफगाणिस्तान मध्ये स्त्रीचा जन्म मिळत असावा ! :( हा चित्रपट सुचवल्या बद्धल आभारी आहे. _/\_

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Ganpati Bappa Lavkar Ya | New Ganpati Song 2021| Pranjal Mandlik

In reply to by चंद्रसूर्यकुमार

मदनबाण 10/09/2021 - 12:37
चित्रपट कुठे बघितला हे सांगता का? नेटफ्लिक्स, प्राईम वगैरेंवर कुठेही मिळाला नाही. मला पण बघायचा आहे. piratebay वर kandahar (2001) 720p DvDRip x264 AC3 5.1 ESub [DDR] ही प्रिंट मिळेल. साईझ :- 2.3 GiB qBittorrent चा वापर केला. हिंदी प्रिंट आहे. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - He Aaradhya Ganpati Song 2021 | Swapnil Bandodkar | Akshay Dabhadkar | Eros Now Music

कंदहार.... आत्ताच्या अफगाणिस्तान मधली परिस्थिती पाहून राहून राहून आठवतोय 2001 साली प्रदर्शित झालेला मोहसीन मखबलाफचा कंदहार हा चित्रपट. हा खरंतर 9/11च्या आधीचा आहे. तालिबान तेव्हाही तिथं होतंच. नफस आपल्या कुटुंबासोबत लहानपणीच अफगाणिस्तान मधून कनडामध्ये पळून आलेली आहे. त्या सगळ्या पळापळीत तिची एक बहीण अफगाणिस्तानमध्येच राहिलीय. नफस सुरक्षित आयुष्य जगतेय खरी पण बहीणीच्या वाट्याला आलेल्या खडतर जीवनाविषयी तिच्या मनात अपराधीपणाची भावना आहे. कधीतरी येणारं एखादं पत्र एवढाच त्यांचा एकमेकांशी संपर्क. एक दिवस नफसला बहिणीचं पत्र येतं की ती येत्या सूर्यग्रहणाच्या दिवशी आत्महत्या करतेय.

'श्रीविठ्ठल: एक महासमन्वय', वाचावेच असे पुस्तक

केदार भिडे ·

गॉडजिला 19/08/2021 - 17:27
विठूमाऊलीच्या उगमा बाबत मनात नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. आजवर मी महाराष्ट्रातील प्रख्यात कानडी दैवत इतकाच समज मनाशी बाळगला होता व विशेष अभ्यासही केला न्हवता आता आजुन रोचक महिती मिळेल असे वाटते, पुस्तकं अवश्य वाचेन. ओळख आवडली _/\_

चौथा कोनाडा 19/08/2021 - 17:44
सुंदर लेख ! पुस्तकाधारित इतके मुद्देसुद महिती आहे की (अर्थात जेव्हढी आटोपशीर तेव्हढीच तपशिलवार) पुस्तक वाचण्याचीही गरज भासू नये ! खुप समर्पक सिनॉप्सिस ! केदार भिडे +१ अश्या प्रकारचे आणखी लेखन वाचायला आवडेल ! _/\_

In reply to by चौथा कोनाडा

केदार भिडे 19/08/2021 - 17:50
रा चिं ढेरे यांचे लेखन समजून घेण्याची पात्रता केवळ माझी. परिचयात्मक लेखाची मूळ लेखनाशी काही तुलनाच नाही. त्यांचे मूळ पुस्तक वाचलेच पाहिजे. :-)

In reply to by केदार भिडे

चौथा कोनाडा 21/08/2021 - 17:41
पुस्तक वाचण्याचीही गरज भासू नये ! असा जो प्रतिसाद लिहिला गेला ती जास्तीची उस्फुर्त दाद होती !
रा चिं ढेरे यांचे लेखन समजून घेण्याची पात्रता केवळ माझी.
असं काही वाटत नाही हा धागा वाचून. असो, आपली "प्रमाणिक भावना" अर्थातच आवडली.

प्रचेतस 24/08/2021 - 09:13
उत्तम लेख आहे. यादवांच्या देवावरून सांगावे वाटते, भिल्लम पाचवा ह्याच्या काळातील विठ्ठलदेवाच्या मंदिराच्या निर्मितीचा शिलालेख उपलब्ध आहे. ज्यात ह्या मंदिराचा उल्लेख 'लान मडू' (लहान देऊळ) असा केलेला आहे. रामदेवरायाच्या कारकिर्दीत ह्या मंदिराचा विकास होऊन भव्य स्वरूप उभे राहिले असावे जे आपल्याला चोऱ्याऐंशीच्या शिलालेखाद्वारे दिसते. रामदेवराय हा विठ्ठलाचा परमभक्त होता. ह्या भक्तीमुळेच महानुभव आणि रामदेवराय यांच्यात कट्टर वैर उत्पन्न झाले.

In reply to by प्रचेतस

केदार भिडे 24/08/2021 - 22:31
एका होयसळ राजाचा शिलालेख देवळात आहेत, ज्यात 'पंडरगे' या ग्रामनामाचा उल्लेख आला आहे. त्यावरून माझा समज झाला की होयसळ राजानेच देऊळ उभारले.

Bhakti 24/08/2021 - 10:02
वाह! आपल्या श्रद्धांची आदिम पाळेमुळे पाहून ‘आपलीच ओळख आपल्याला’ अशी भावना ग्रंथ वाचून झाल्यावर रेंगाळते. उत्कृष्ट लेख आहे.विठ्ठल विठ्ठल!!

नागनिका 25/08/2021 - 13:13
ढेरे यांनी विठ्ठलाला क्षेत्रपाल म्हणले आहे. तसेच दक्षिणेकडील व्यंकटेश हे शैव स्थान असण्याची शक्यता आहे असे ते म्हणतात. तिसरा डोळा झाकण्यासाठीच व्यंकटेशाचे गंध एवढे मोठे लावलेले असते.

In reply to by नागनिका

प्रचेतस 25/08/2021 - 13:32
क्षेत्रपाल ही संज्ञा तशी पटत नाही, क्षेत्रपालांच्या मूर्ती आणि विठ्ठलमूर्ती यांच्यात प्रचंड भिन्नता आढळते. कंधारचा क्षेत्रपाल पहा. किंवा काही ठिकाणी क्षेत्रपाल हे यक्ष, वेताळ, भैरव अशा स्वरूपात देखील दिसतात, सर्वसाधारणतः मोठे डोळे, विचकलेल्या दाढा अशी लक्षणे दिसतात. गुरेढोरांवर देखरेख करणारा , त्यांचा प्रतिपाळ करणारा ह्याअर्थी मात्र विठ्ठलाचे रूप जुळते,

अक्षरनामा मध्ये आलेला लेख (लिंक शेवटी) वाचून मला या पुस्तकाचा परिचय झाला. तेव्हाच हे पुस्तक वाचायचे असे माझ्या मनात नोंदवून ठेवले होते. आमच्या गावात विठ्ठलाचे देऊळ आहे आणि तिथे आषाढ महिन्यात उत्सवही असतो. गेले वर्ष आणि या वर्षी कोविड साथीमुळे त्यावर मर्यादा आल्या आहेत. तरीही आषाढ म्हटले की विठ्ठल हे समीकरण माझ्याच नव्हे तर समस्त मराठी मनात पक्के आहे. त्यामुळे यावर्षी आषाढ महिना जवळ आला तसं या पुस्तकाची मला आठवण आली आणि लगेच खरेदी करून वाचूनही काढले. सर्व पुस्तक आतुरतेने वाचून काढले. त्यातील मला आकलन झालेले काही मुद्दे खालील प्रमाणे.

समूदादाः डोळे पाणवणारी कादंबरी!

वामन देशमुख ·

Bhakti 27/07/2021 - 16:34
फोटो दिसत नाहीये, कादंबरी किती साधी प्रकाशित झाली आहे?

'समूदादा' ही नागेश सू. शेवाळकर यांची बालकादंबरी वाचताना वाचकांना मनापासून आनंद होतो, एक प्रकारचे समाधान होते आणि डोळेही पाणवतात! समीर हा कादंबरीचा नायक आणि इतर बाल पात्रं आज घरोघरी, इमारतींमध्ये, गल्लोगल्ली आणि चाळींमधून निश्चितपणे भेटत असतात. त्यांना पाहताना मनात एक शंका आल्याशिवाय राहत नाही की, आजच्या स्पर्धेच्या युगात आपण बालकांचे बालपण हिरावून घेत आहोत की काय? कारण आज मुल दोन-अडीच वर्षांचे होत नाही तोच त्याची रवानगी 'प्ले ग्रुप' किंवा पाळणाघरात होताना दिसते आहे. समूदादा हे सर्वसामान्य घरामध्ये बागडणाऱ्या बालकांचे प्रतिनिधीत्व करणारे चरित्र आहे.

नवल - पुस्तक परिचय

पाटिल ·

चौथा कोनाडा 25/07/2021 - 11:43
पुस्तकाची समर्पक ओळख ! रसग्रहणाची शैली आवडली ! पूर्वी एकदा ज्ञानेश्वरांची एक ओवी वाचली होती, (जी मला आत्ता आठवत नाहीये, पण) जिचा अर्थ साधारण असा आहे की आपण कधी एकटेच असताना समजा बराच वेळ आरशात पाहून झाल्यावर आपण जेव्हा आरशापासून दूर होतो, तेव्हा सेकंदभर वाटत राहतं की कुणीतरी पाहतंय आपल्याला.. आणि ते नेमकं काय फीलींग असतं ते आपल्याला कुणापर्यंत पोचवता येत नाही, कारण ते शब्दांमध्ये डिफाईनच करता येत नाही.. मग आपण नाद सोडून देतो आणि म्हणतो की जाऊ द्या, आपलं आपल्याला कळलं एवढं पुरेसं आहे... असा प्रकार. व्वा, छानच !

गॉडजिला 25/07/2021 - 15:18
नक्कीच बघावे लागेल पण तूर्त मला पुस्तकं नेमकं काय आहे याचा हवातसा अंदाज आलेला नाही, कदाचित तुमचा भारावलेपणा ओळख किंचीत पुसट करत आहे पण ते एका अर्थाने पुस्तकाचेच यश आहे :)

पाटिल 25/07/2021 - 22:13
आनन्दा, चौथा कोनाडा प्रतिसादाबद्दल धन्यवाद..! गॉडजिला, नेटवर 'नवल' बद्दल आणखी एक लिंक सापडली, त्यावरून कदाचित तुम्हाला आणखी थोडी आयडीया येईल... जरूर वाचून पहा.. https://kolaj.in/published_article.php?v=naval-novel-by-prashant-bagad-reviewed-by-Nitin-PatilUB4959229

Bhakti 26/07/2021 - 09:23
आईशप्पथ..! कसलं सही लिहिलंय यार हे..! तुमच्या या पुस्तक परिचयाबद्दल असेच म्हणते.

सौंदाळा 26/07/2021 - 10:33
लेख छान आहे पुस्तक ओळख वाचुन ' कोसला' ची आठवण झाली. त्या प्रकारचेच पुस्तक आहे का?

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

पाटिल 26/07/2021 - 11:22
धन्यवाद भक्ती, सौंदाळा.. :-) कोसला च्या अर्पणपत्रिकेत म्हटलंय.. 'शंभरातील नव्व्याण्णवांस..' नवल च्या अर्पणपत्रिकेत म्हटलंय... 'एखाद्यास..' काही बाबतीत कोसला आणि नवल तोडीस तोड आहेत... नवल ची शैली, भाषेची जादू थोडी सरसच आहे.. पण अर्थात सोनकुळेची आणि सांगवीकरची जातकुळी/पिंड वेगवेगळा आहे... सांगवीकर ज्याप्रमाणे 'सगळ्या'लाच नकार देत असतो, चिमटे/विसंगती काढत असतो... तसं ह्या सोनकुळेचं नाही.. तो 'माझं मला स्वतःपुरतं राहू द्या.. तुम्ही माझ्याकडे लक्ष देऊ नका' ह्या प्रकारातला आहे...

In reply to by पाटिल

Bhakti 26/07/2021 - 13:15
काही बाबतीत कोसला आणि नवल तोडीस तोड आहेत... नवल ची शैली, भाषेची जादू थोडी सरसच आहे.. सरस असेल तर चांगलं ,कारण मला कोसला फार आवडली नाही.

अनुस्वार 26/11/2022 - 13:36
ओळख अशी करून द्यावी की समोरच्याला भेटीची उत्कंठा लागावी. लवकर वाचेन आता. धन्यवाद.

कंजूस 26/11/2022 - 20:03
बहुतेक मायबोलीकर प्रतिसाद दिला असल्याने इकडे दिला नाही. अशा कादंबऱ्या आपल्याला आवडो वा न आवडो तो एक समाजाच्या वर्तणुकीचा त्या काळच्या इतिहास असतो. कथा नायक ज्या परिस्थितीतून गेलेला असतो त्यातून न गेल्यामुळे थोडी अडचण येते समजण्यात. तरीही वाचलेच पाहिजे असे लेखन. मी कोसला वाचली. समजून घेतली. समीक्षा उत्सुकता वाढवणारी आहेच.

नवल. जानेवारी २०२१ मध्ये प्रकाशित झालेली प्रशान्त बागड यांची ही पहिलीच कादंबरी आहे.. फारा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ते हाती आलं होतं...

अशा सांजवेळी...

श्रीगणेशा ·

गुल्लू दादा 22/07/2021 - 17:20
आजकाल जुबिन चे गाणे आवडायला लागलेत. त्यापैकी सध्या हे ऐकतोय 1. https://youtu.be/Z7XiKx_rj2I ओशो आणि माझा अजून तरी संबंध आला नाहीये. पण त्यासंबंधी हे गाणे ऐकायला आवडते. 2. https://youtu.be/vTnJU7UYSIg ऐश्वर्या मुजुमदार चे हे मॅशअप 3. https://youtu.be/MeUnR29j7Wg भेटले तसे ऍडवत जाईन. धन्यवाद.

एक नवीन मराठी गाणं ऐकण्यात आलं... "अशा सांजवेळी" सुंदर शब्दरचना, सुमधुर संगीत आणि तितकाच सुरेल आवाज. सर्व अगदी जुळून आलं आहे. (संगीतकारांच्याच शब्दात) बासरी आणि मोहनवीणा या वाद्यांच्या मधुर आवाजाने गाण्याची सुंदरता अजूनच बहरली आहे. गाण्याची YouTube लिंक: https://www.youtube.com/watch?v=Stcrt7_mPKY मिपाकरांनो.. एखादं भावलेलं नवीन गाणं ऐकलं असेल तर इथे नक्की सांगा.

डोक्याला शॉट [षष्ठी]

गड्डा झब्बू ·

कंजूस 17/07/2021 - 06:28
पण १८८ म्हणजे स्वातंत्र्य दिनानंतर तीनच दिवसांनी अवतार घेतलेले बाबा आहेत ते.

डॅनी ओशन 17/07/2021 - 16:16
प्रभू _/\_ प्रभूंच्या महतीवर लिखान हामी आवडीने वाचतो. आम्ही सुद्धा तुमच्या सर्व गुरूंचे फ्याण हाहोत

चौथा कोनाडा 17/07/2021 - 20:26
च्यामारी, लैच खत्रनाक लिव्हलंय ! १८८ च्या सतत उल्लेखाने हळवं व्हायला झालं ! आम्च्य १८८ दिवस जुन्या असलेल्या पुर्वाश्रमीच्या गुरुंची ८वण झाली ! बा़की टॅगचा बाजार उठवल्यामुळे बाजारात हल्लकल्लोळ माजणार हे नक्की !
भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!

😂

विशेष सूचना पुढचा धागा प्रसवण्यासाठि आप्ल्या डोक्याला लवकरात लवकर शॉट लागो ही सदगुरू चरणी ओल्ड मॉन्क प्रार्थना.

In reply to by चौथा कोनाडा

गड्डा झब्बू 19/07/2021 - 11:59
पुढचा धागा प्रसवण्यासाठि आप्ल्या डोक्याला लवकरात लवकर शॉट लागो ही सदगुरू चरणी ओल्ड मॉन्क प्रार्थना.
सदगुरूंनी तसा आदेश आम्हास दिला आहे _/\_ जय गुरूदेव! जय गुरूमैया!!

Howdy मिपाकर्स आज पुन्हा आवाक झालात ना मी तुम्हाला प्रेम भावनेने नमस्कार मिपाकर्स किंवा तुच्छ भावनेने हॅलो फुल्स वगैरे वगैरे न म्हणता एकदम Howdy मिपाकर्स म्हणालो म्हणुन? येस्स... मला खात्रीच होती की तुम्हाला असा प्रश्न पडेल म्हणून. तर त्याचं काय आहे मंडळी ती एक मोट्ठी रहस्यमय ष्टोरी आहे आणि ती रहस्यमय ष्टोरी सांगायलाच आज मी तुमच्यासमोर पुन्हा आलो आहे. आता मी लोकल वरून एकदम ग्लोबल झालो आहे. माझी भाषा सुद्धा थोडी बदलल्याचे तुमच्या चाणाक्ष नजरेतुन सुटणार नाही, आणि त्याला कारणीभूत आहेत मला लाभलेल्या नवीन गुरुमैया! एकमुखाने बोला….. जय हो गुरुमैया की!

अनुवादित पुस्तकं

पाटिल ·

कॉमी 11/07/2021 - 23:08
विस्तृत यादी, छानच. (आफ्टर द क्वेक माझे खूप आवडते पुस्तक आहे.) काही वाढ- शेरलॉक होम्स कथा- भालबा केळकर आणि गजानन क्षीरसागर दोन्ही मस्त. (क्षीरसागर संपूर्ण आहे.) चौघीजणी- (लिटल वुमन आणि गुड वाईव्हज- लुईसा मी अल्कॉट)- शांता शेळके बर्टनचे अनुवादित अरेबियन नाईट्स- गौरी देशपांडे

In reply to by कॉमी

पाटिल 12/07/2021 - 08:08
चौघीजणी' बद्दल ऐकलं आहे बरंच.. आता बघायला पाहिजे.. अरेबियन नाईट्स चे अनुवाद पाहिले होते एकदा अक्षरधारा मध्ये, पण ते सगळे दहा-बारा खंड एकाच वेळी घ्यायला लागतील असं त्यांनी सांगितलं, म्हणून राहून गेलं ते.. तुम्ही सुचविलेली पुस्तकं विश लिस्ट मध्ये टाकतोय.. यादीत भर टाकल्याबद्दल धन्यवाद.. :-)

साहना 12/07/2021 - 03:48
मादाम बोवारी- गुस्ताव फ्लॉबेर (अनु. जयंत धुपकर) हे आवडते पुस्तके आहे. ह्यावर शाहरुख खान दीप साही ह्यांचा माया मेमसाब हा जबरदस्त चित्रपट येऊन गेलाय. हटके आहे आणि दीपा आणि शाहरुख दोघांनीही ह्यांत अनावृत्त सीन्स केले आहेत.

In reply to by साहना

गॉडजिला 12/07/2021 - 08:51
सगळेच बिचारीची मजा घेतात :( फक्त शारुक न्हवे हा चित्रपट पाहिल्यावर मी दीपा साहिचे बरेच चित्रपट बघून काढले ज्यात शारुकचा ओ डार्लिंग ये हे इंडिया, अन जॅकीचा आर या पार मस्त वाटले इतरही अनेक चित्रपटात दीपा छान दिसली आहे पण चित्रपट डावे नितंब या केटेगारीतील असल्याने मला तसे भावले न्हवते... पण दीपाने दिल जित लिया था हे नक्की

कंजूस 12/07/2021 - 05:14
पण मूळ पुस्तकंच / किंवा इंग्रजी अनुवाद वाचणार. तेच बरे नसेल तर अनुवाद काय कामाचा. ॲना कॅरेनिना-कंटाळवाणे वाटले होते. ककोल्ड चांगले आहे. रावणा आणि एडी पहिला भाग चांगला आहे. एक्सट्रा फार लांबवल्यासारखा वाटला. २१ व्या शतकासाठी २१ धडे आणि अगोदरचे पुस्तक मानवाचा इतिहास कंटाळवाणे वाटले पण इंडिका हे दुसऱ्या एका लेखकाचे चांगले वाटले. काईट रनर कुणी अनुवादले का? ते आवडलेले। ( माझी आवड)

In reply to by कंजूस

कॉमी 12/07/2021 - 08:17
काईट रनर नक्कीच अनुवादलेलं आहे. पाहिलं आहे. अनुवादकाचे नाव माहीत नाही. मी पण इंग्रजीत वाचतो बऱ्याचदा पण काही अनुवाद जास्त छान वाटतात. खास करून जुन्या वळणाची इंग्रजी फार नाटकी वाटते. ती अनुवादित असली की बरी वाटते.

कंजूस 12/07/2021 - 05:20
मूळ पुस्तकात कधीकधी उत्तम चित्रे असतात ,ती अनुवादक घेतात का?/ घेतली आहेत का? माझा आवडता लेखक विल्यम डर्लिंपल. त्याच्या व्हाईट मुघल्स, लास्ट मुघल या पुस्तकांत चित्रे आहेत. ती म्युझिअममधून मिळवली आहेत. ती रंगीत चित्रे घेतली नाहीत अनुवादांत तर गंमत जाईल.

डेझर्टर हे विजय देवधरांनी अनुवादित केलेले पुस्तक माझे आवडते पुस्तक. दुसरे आवडते म्हणजे रवींद्र गुर्जरांनी अनुवाद केलेले पॅपिलॉन (या पुस्तकात एक चूक मला नुकतीच सापडली. Splitting the money चे भाषांतर नोटांचे तुकडे करून वाटून घेतले असे केले आहे. असो.). ज्या अनुवादनात चुका असतात तो अनुवादक आणि ते पुस्तक माझ्या मनातून पूर्ण उतरते. काही काही पुस्तके घाईघाईत पाट्या टाकल्यासारखी अनुवादित केलेली आढळतात. अर्थात बरेच वाचक इंग्रजी वाचण्यासाठी असमर्थ असल्यामुळे त्यांना हे कळतच नाही, पण तरी वाचताना खडा आल्यासारखं वाटून वाचक गोंधळात पडतातच.

Bhakti 12/07/2021 - 11:19
वाह छान सांगितले. मी फक्त चारचौघी आणि पॅपिलॉन वाचलंय,तेही नीट आठवत नाही. आठवतं फक्त एकच 'द दा विंची कोड' मग Dan Brown चे. अजून एक toxin / poise वाचलं होतं..चांगल होते. मस्त यादी आहे.

प्रचेतस 12/07/2021 - 11:28
लेखाचा सुर डिटेक्टिव्ह, थ्रिलर प्रकारच्या कादंबर्‍यांना तुच्छ लेखण्याकडे दिसतोय. वास्तविक इंग्रजी साहित्यात अशा प्रकारच्या कादंबर्‍यांनी मोलाची भर घातलेली आहे. डॅन ब्राऊनचे दा विन्ची कोड, एन्जल्स अ‍ॅण्ड डिमन्स, फ्रेडरिक फोरसिथची द फिस्ट ऑफ गॉड, द निगोशियेटर. जेफ्री आर्चरची केन अ‍ॅण्ड अ‍ॅबल, द प्रिझनर ऑफ द बर्थ, सिडने शेल्डनचे द मास्टर ऑफ द गेम, ब्लडलाइन, अ‍ॅलिस्टर मॅक्लिनच्या द गन्स ऑफ नॅव्हरोन, व्हेअर इगल्स डेअर ह्यांच्या इतर आणि इतरही अनेक लेखकांच्या कादंबर्‍यांना वाचकांबरोबरच समिक्षकांची उदंड लोकप्रियता मिळालेली आहे. अगाथा ख्रिस्ती, सर आर्थर कॉनन डॉईल हे तर आज अभिजात गणले जातात. ब्रॅम स्टोकरची ड्रॅक्युला, मेरी शेलीची फ्रॅन्केनस्टाईन, एमिली ब्रॉन्टेची वुदरिंग हाईट्स ह्या थ्रिलर/हॉरर कादंबर्‍या आज अभिजात कादंबर्‍या म्हणून समजल्या जातात. डिटेक्टिव्ह/थ्रिलर कादंबर्‍यांचे सरसकटीकरण करुन त्यांना उकिरडा म्हणून हिणवणे योग्य नव्हे. काही जणांना आयर्न रॅंडचे ठोकळे रटाळ वाटू शकतील किंवा किरण नगरकरांच्या कादंबर्‍या अगम्य वाटू शकतात.

In reply to by प्रचेतस

सौंदाळा 12/07/2021 - 12:24
+१ पुर्वी मिपावर वाचलेली सुशि आणि जीए यांची तुलना आठवली. जीए वाचणारे प्रगल्भ, दर्दी वाचक आणि सुशि वाचणारे उथळ वगैरे असा चर्चेचा सुर होता

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

गॉडजिला 13/07/2021 - 00:12
जीए वाचणारे प्रगल्भ, दर्दी वाचक आणि सुशि वाचणारे उथळ वगैरे असा चर्चेचा सुर होता
तसं नाहीये... खरं तर जीए समजू शकणारे प्रगल्भ, दर्दी वाचक वगैरे असतात... सुशीना समजून घेण्याची वेळ येण्यासाठी DNAमधे समजूतदारपणा संथ करणारे बदल आवश्यक आहेत असे प्रांजळ मत आहे.

रंगीला रतन 13/07/2021 - 02:06
जीए वाचणारे प्रगल्भ, दर्दी वाचक त्यात चुकीचं काहीच नाही. वाचायला घेताच सरदर्दी सुरू होइल असे लेखन वाचायची प्रगल्भता दाखवतात ते दर्दी वाचक. नोबेल विजेते,गुरूदेव वगैरे वगैरे रविंद्रनाथ टागोरांच्या लेवलचे दुसरे पकाउ लेखक जीए असे माझे प्रांजळ मत. सुशि वाचणारे उथळ इथे उथळ शब्द जींदादिल अशा अर्थी अभिप्रेत असावा. क्युंकी मुर्दादिल क्या खाक सुशि पढेंगे.

In reply to by रंगीला रतन

कंजूस 13/07/2021 - 13:52
असं बंगाली लेखकच म्हणतात. पण असं बोललं तर लगेच या़ंंना पोटदुखी आहे हा शेराही मिळतो. जिएंनी किती उचललं ?

In reply to by कंजूस

गॉडजिला 13/07/2021 - 18:24
जिएंनी किती उचललं ?
माहीत नाही काही मोजके लिखाण सोडून इतर काही वाचले नाही, टागोरांबाबत विधानात थोडेफार नक्की तथ्य भासते

In reply to by प्रचेतस

पाटिल 12/07/2021 - 13:29
गन्स ऑफ नॅव्हरोन, वुदरींग हाईट्स आणि फोरसिथची पुस्तकं हे काही सन्माननीय अपवाद आहेत.. _/\_ इतर ज्या लेखकांचा तुम्ही उल्लेख केलेला आहे, त्यांची पुस्तकं एकदा वाचून झाल्यावर पुन्हा पुन्हा वाचण्यासारखं त्यात काही आहे, असं मला वाटलं नाही.. अर्थात ही यादी माझ्या आवडी निवडींवर बेतलेली असल्यामुळे त्यात प्लस मायनस असं असणारच आहे... शिवाय डीटेक्टीव्ह/थ्रिलरच नाही तर आणखी बऱ्याच प्रकारची पुस्तकं आहेत, जी मला एकेकाळी आवडायची पण आता नाहीत आवडत... आणि ह्या आवडण्या/ न आवडण्याला काही इलाज नसतो.. :-) असं असलं तरीही, उकीरडा हा शब्द थोडा जास्तच झालेला आहे, आणि मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो.. लिहिण्याच्या ओघात ते होऊन गेलं... तसा काही उद्देश नव्हता माझा.. :-))

कंजूस 12/07/2021 - 12:16
सहमत. पण अनुवादित पुस्तकांची यादी आहे. ओके. ----------- वाचनीय पुस्तके ( थोडक्यात गाभ्यासह) यादी असा लेख कुणी सुरू करा. इंडिया टुडे, टाइम्स आणि इंडिअन एक्सप्रेस मध्ये बुक रिव्यू वाचून मला पुस्तक निवडायला सोपे जाते. मध्यंतरी ब्याटमनने रिव्यू केलेले द हॉर्स वाचायला घेतले. आवडले.

चौथा कोनाडा 12/07/2021 - 12:25
द रेल्वे मॅन ( एरीक लोमॅक्स) ही उदय बुवा अनुवादित कांदबरीबद्दल नुकतीच माहिती मिळाली. https://www.mehtapublishinghouse.com/book-details/THE-RAILWAY-MAN/3324.aspx मलाया-सियामच्या निबिड जंगलात जपान्यांनी बलाढ्य ब्रिटिश सैन्याला शह दिला. अतिशय दुष्टप्राप्य खडतर अशा रेल्वे मार्गाच्या उभारणीचा चंग जपानी सैन्याने बांधला व त्यासाठी तब्बल २,००,००० दोस्त राष्ट्रांच्या ब्रिटिश, ऑस्ट्रेलियन व कॅनेडियन सैनिकांना युद्धबंदी बनवून त्यांच्याकडून हया रेल्वेमार्गाची उभारणी केली. वैयक्तिक पातळीवर ही अमानुषता अनुभवलेल्या एका सैनिकाची ही प्रथमपुरुषी कहाणी, परंतु एका विशिष्ट कालखंडाच्या इतिहासाचे दर्शन घडविणारी अद्भुत कथा.

In reply to by टर्मीनेटर

चौथा कोनाडा 17/07/2021 - 20:29
टर्मीनेटर, त्या सिनेमा संदर्भात काही तपशील मिळाले तर जरूर पोस्टावे. मी शोधले पण सापडले नाहीत !

In reply to by चौथा कोनाडा

सुमो 18/07/2021 - 10:39
पोस्टरच मेहता पब्लिशिंगने पुस्तकाचं मुखपृष्ठ म्हणून वापरलंय. कॉलिन फर्थ आणि निकोल किडमन अभिनित हा सिनेमा इंटरनेट आर्काइव्हज वर बघण्या / डा लो करण्यासाठी उपलब्ध आहे.

In reply to by चौथा कोनाडा

टर्मीनेटर 19/07/2021 - 15:16
युट्युबवर ट्रेलर आहे. https://youtu.be/px04904hm88 IMDB ची लिंक. https://m.imdb.com/title/tt2058107/?ref_=ext_shr_lnk टोरंटवर हिंदी डब्ड त्यावेळी मिळाला होता, आता आहे की नाही ते बघावे लागेल.

विजुभाऊ 12/07/2021 - 16:53
"थ्री कप्स ऑफ टी" हे ग्रेग मोर्टेनसन लिखीत पुस्तक मेहता प्रकाशनाचे अनुवादीत उपलब्ध केले आहे. खरोखरच वाचनीय आहे. शिक्षणामुळे काय चमत्कार घडतो हे अनुभवण्यासारखे आहे.

टर्मीनेटर 12/07/2021 - 18:18
छान आहे यादी, ह्यातली फार थोडी पुस्तके वाचली आहेत! हॅमिश मॅकडोनाल्ड यांच्या अंबानी & सन्स ह्या इंग्रजी पुस्तकाचा मराठीत अनुवाद कोणी केलाय त्यांचे नाव आता विसरलो पण उठसूट रिलायन्स आणि अंबानींना शिव्या घालणाऱ्यांनी नक्की वाचावे असे हे पुस्तक आहे. समोर वाडीयांसारखा तुलनेने महाबलाढ्य प्रस्थापित प्रतिस्पर्धी, गोएंकांसारखा माध्यमातील मातब्बर विरोधक, सरकारची विचित्र उद्योगविषयक धोरणे, लायसन्स राज आणि भ्रष्ट बाबुशाही अशा प्रतिकूल परिस्थितीवर आपल्या जिद्दीने व अक्कलहुषारीने मात करुन आपला व्यवसाय भरभराटीला आणणाऱ्या धीरूभाई अंबानींची यशोगाथा वाचण्या सारखी आहे. ambani

Nitin Palkar 12/07/2021 - 22:03
मी वाचलेले (आणि लक्षात असलेले) काही अनुवाद: चिपर बाय द डझन - फ्रँक बंकर गिलब्रेथ (ज्यू) अनु मंगला निगुडकर लव मेडिसीन अँड miracle - बरनी सिगल अनू. डॉ. शुभदा राठी (हे पुस्तक तीस वर्षांपूर्वी इंग्रजी वाचले होते अलीकडे काही वर्षांपूर्वी अनुवाद वाचला ). 'गाव', 'शिवार'- (अनु. जी ए कुलकर्णी) या आधीचे कॉनराड रिक्टरचेच 'रान' (अनु. जी ए कुलकर्णी) ही तिन्ही पुस्तके अफलातून आहेत . 'द इयरलिंग' चा राम पटवरधनांनी केलेला 'पाडस' हा अनुवाद . भा. रा. भागवतांनी केलेले ज्युल व्हर्न चे अनुवाद. 'born free ' 'लिविंग फ्री' आणि 'forever फ्री' या जॉय Adomson च्या पुस्तकांचे अनुवाद साप डले नाहीत (इंग्रजीतूनच वाचली) पण तिच्या 'पिपा द चित्ता'या पुस्तकाचा मराठी अनुवाद वाचला. जीम corbet च्या अनेक पुस्तकांचे अनुवाद पैकी एकाचा अनुवाद सुभाष bhende नी केल्याचे आठवते. टारझनचे सर्व भाग बहुतेक कृष्ण कुमारी शेरतूकडे यांनी अनुवाद केलेल. इंद्रजाल कॉमिक्स ची खूपशी कॉमिक्स (मराठी) विजय देवधरांची अनेक पुस्तके.

इंग्रजीतून भाषांतरित मराठी पुस्तके वाचायला आवडत नाही. प्रचेतस यांच्या प्रतिसादाशी सहमत. डॅन ब्राऊन आणि सिडने शेल्डन हे माझे आवडते लेखक. दोघांची झाडून सगळी पुस्तके वाचली आहेत. डिजिटल फॉर्ट्रेस, दा विंची कोड, एंजल्स अँड डेमंस तर अनेकदा. तसेच समग्र शेरलॉक होम्स सुद्धा अनेकदा वाचलंय. त्यातली व्हिक्टोरियन इंग्रजी भाषा एकदम भारी वाटते वाचायला. (तसं इंग्रजी मॅट्रिक्स रीलोडेड मधला आर्किटेक्ट बोलतो. :D) हॅरी पॉटर ची पुस्तके आणि चित्रपट तोंडपाठ होईपर्यंत पारायणे केलीत. मागच्या महिन्यात प्रचेतस यांच्याच सुचवणीवरून आधी लॉर्ड of द रिंग्ज चित्रपट पाहिले, नंतर पुस्तक वाचलं. आता हॉबिट पहायचं व वाचायचं आहे. मायकल क्रायटन यांची ज्युरासिक पार्क आणि प्रे ही पुस्तके आवडली होती. पुस्तके चांगली आहेतच. पण स्टीवन स्पीलबर्ग यांनी पिक्चर इतका भव्य बनवला आहे की हे चांगलं पुस्तक सुद्धा फिके वाटते. रॉबर्ट कुक यांची काही मेडिकल थ्रिलर वाचली आहेत. कोमा, ब्रेन, फीवर, ब्लाइंड साईट. ब्लाइंड साईट छान आहे. बरीच वाचायची राहिली आहेत. नॉन फिक्शन फारसे आवडत नाही. मात्र मित्तल यांनी आर्सेलर विकत घेतली त्याची कहाणी सांगणारे कोल्ड स्टील आवडले होते.

In reply to by तुषार काळभोर

कॉमी 13/07/2021 - 11:40
मी पण. इंग्लिश मध्येच वाचतो. पण पाडस आणि चौघीजणी वैगेरे अनुवाद फारच छान, मराठीत वाचणे पर्वणी आहे.

सौन्दर्य 12/07/2021 - 23:07
नॉट विदाउट माय डॉटर - मूळ लेखिका बेट्टी मेहमूदी, मराठी भाषान्तर लीना सोहोनी. हे देखील उत्तम पुस्तक आहे. ह्या कथेसारखीच 'काबुलीवाल्याची बायको' ही कथा आहे पण ह्या दोन्ही कथेतील महत्त्वाचा फरक म्हणजे बेट्टी मेहमूदी आपल्या जीवावर खेळून आपल्या मुलीला घेऊन इराण मधून निसटली तर काबुलीवाल्याची बायको आपल्या मुलीला अफगाणिस्तानतच ठेऊनच बांगलादेशला परतते.

गॉडजिला 13/07/2021 - 09:13
कादंबऱ्यांचा उकिरडा उपसून,
हा शब्दप्रयोग फार आवडला अन तो वास्तवही आहे... काही मोजके वाचनीय सोडले अन आपण वाहवत गेलो की मग आपण कादंबऱ्यांचा उकिरडा उपसत आहोत हे समजायला फार वेळ अन पैसा निघून गेलेला असतो

लॉर्ड ऑफ द फ्लाईज चं जीएं नी केलेलं भाषांतर फार लहानपणी वाचलं होतं. सध्या ते शोधतोय, पण कुठे मिळत नाहीये (म्हणजे फ्री ऑनलाइन मिळत नाहीये). पण विकत घ्यायचे म्हटले तरी अगदी बुकगंगा वर पण त्याचे नाव दिसत नाही.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

पाटिल 13/07/2021 - 11:07
लॉर्ड ऑफ फ्लाईजचा अनुवाद खूप जुना आहे.. बहुदा तो आऊट ऑफ प्रिंट असणार.. मला लायब्ररीमध्ये मिळाला होता..

In reply to by पाटिल

सध्या स्कॅन करून अपलोड करणारे सज्जन लोक ही आहेत, पण बहुधा हे पुस्तक सुद्धा फार जणांना ठाऊक नसावे.

अमर विश्वास 13/07/2021 - 10:44
विजय देवधर आणि लीना सोहोनी ही अनुवादित पुस्तकातील दोन महत्वाची नवे फ्रेडरिक फोरसिथ , सिडने शेल्डन, रॉबर्ट कुक यांच्या अनेक कादंबऱ्या मराठीत आणण्याचे काम यांनी केलय

In reply to by गॉडजिला

राघव 13/07/2021 - 18:02
ओह.. :-( त्याचा पुढला भागही त्यानं लिहिला होता बहुदा.. नाव आठवत नाहीये.

In reply to by राघव

गॉडजिला 13/07/2021 - 18:10
अनुवादकाची त्यात पपी बदल्याचा विचार सोडून दे फलाना फलाना तुला स्त्री खूप सुखी ठेवेल इथेच रहा अशी काही वाक्यरचना वाचल्याचे स्मरते. मला काहींच त्या वाक्याचा अर्थ समजायचा नाही... तसही बदल्यासाठी इतकी साहसे पळापळ केल्यावर पपी त्याच्या अन्यायाचा बदला न घेताच सेटल होतो हे जाणून कपाळावर हात ठेवला होता...

जागु 13/07/2021 - 12:58
वा हे खुप उपयोगी पडेल. सध्या मी स्टोरी टेल अ‌ॅप वरुन पुस्तके वाचत असते. किचनची कामे उरकताना ते बर पडत. चारचौघी मी अधी वाचल आहे. मला आवडलेल. छानच आहे.

राघव 13/07/2021 - 18:01
माझीही थोडीशी भरः "दु:ख पर्वताएवढे": भा रा भागवतांनी केलेला विक्टर ह्युगोच्या ला मिझरेबल्सचा अनुवाद. "मला निसटलंच पाहिजे!": श्रीकांत लागू यांनी केलेला स्लावोमीर राविझच्या द लाँग वॉक चा अनुवाद

अनुवादित पुस्तकांच्या यादीत एस भैरप्पा यांच्या उमा कुलकर्णी यांनी अनुवादीत केलेल्या पुस्तकांचा उल्लेख जरुर असला पाहिजे यादीत सगळ्यात पहिले आणि महत्वाचे पुस्तक म्हणजे "आवरण" त्या नंतर या यादीत त्यांच्या "पर्व", "तंतू", "मंद्र", "वंशवृक्ष ", "सार्थ" या कादंबर्‍या येतात. वर उल्लेख झालेल्या पुस्तकांशिवाय मॅक्स्झिम गॉर्की यांचे "आई" , चार्लस डिकिन्स यांचे "टेल ऑफ टू सिटीज" पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

दोन्ही एकदम भारी. विशेष म्हणजे उमा.कुलकर्णी यांनीदेखील भाषांतर असल्याचं जाणवू न देता लिहिलंय.

साबु 01/08/2021 - 19:43
वल्लि उर्फ प्रचेतसशी सहमत. मल आवडलेले अनुवाद : पपिलोन, डेझर्टेर, कोमा, सेवेन्थ सिक्रेट, फिस्ट ओफ गौड, सेकन्ड लेडि,कन्टेजन.

वाचनाच्या मर्यादेत, मला आवडलेल्या आणि आठवतायत तशा क्रमाने काही अनुवादित पुस्तकांची यादी करतो आहे. हा उद्योग करण्याचा हेतू असा की फार पूर्वी माझ्याबाबतीत प्रॉब्लेम असा झाला होता की मराठीतलं जे जे वाचायला पाहिजे होतं, ते आता वाचून झालेलं आहे, असं वाटण्याचा एक काळ आला होता.. आणि मग त्यातून 'अजून किती काळ तेच तेच वाचून मन रिझवून घ्यायचं', असा वैतागही..‌ पण मग डायरेक्ट इंग्रजी क्लासिक्सकडं जायचं तर त्यात एक प्रकारची 'दचक' होती की ती पल्लेदार भाषा आपल्याला झेपतेय की नाही वगैरे..

हे वाचा: येस, आय ॲम् गिल्टी!

अनुस्वार ·

गॉडजिला 30/06/2021 - 21:37
विचार सखोल व रॅशनल बनतात पण हे स्मशानवैराग्य इतर वेळी कुठे असते ? म्हणूनच माझी यातील कोणाबाबत कसलीच सहानुभूती तयार होणार नाही... जगाला वास्तव मार्गदर्शनपर लेखन जरी अशावेळी घडले तरी... मी स्वतः काही अंशी वरवर अमेजिंग असणारे सखोल तत्वज्ञान मांडून लोकांना भारावून सोडणारे लोक अनुभवले आहेत पण जेंव्हा बाह्य गोष्टीवर उत्कृष्ट प्रभुत्व साधलेले हे लोक आपल्याच आतील क्षुलकशा बाबी समोर हात टेकतात प्रसंगी कमालीचे हतबल ठरतात तेंव्हा खरे वाईट वाटते पण वेळ गेलेली असते आणि सर्व तत्त्वज्ञानही मातीमोल ठरते

सौन्दर्य 30/06/2021 - 23:21
स्मशान वैराग्य हे फक्त स्मशानांतच येते. समोर चितेवर व्यक्ती जळत असता, पैसा, अडका, माया, लोभ, प्रेम किती क्षणभंगुर आहे ह्याची प्रचिती येते. इतर वेळी मात्र ह्याच गोष्टींसाठी माणूस 'वाटेल ते' करायला तयार होतो. माझी देखील अश्या पश्चात तत्वज्ञान सांगणाऱ्या विषयी जरा देखील अनुकंपा नाही.

मनो 01/07/2021 - 03:19
श्याम भूतकर यांनी याविषयी स्वतःच्या आठवणीतून लिहिलेला लेख खाली देतो आहे, या प्रकरणाची नवीन बाजू समजेल. https://filebin.net/g5cateuuk5tc7frr/pg_shyam_bhutkar.pdf

In reply to by मनो

इतक्या भयानक घटनांच्या सानिध्यात श्याम भुतकर होते. पण नियतीने त्या घटना व भूतकर यांच्यामध्ये जणू पडदा धरला होता. एकावेळी सर्वांची आयुष्ये, घटना एकमेकांना समांतर सुरू होत्या. अभिनवचे तेव्हाचे सर्वच विद्यार्थी. विचित्र अवस्थेतून गेले असतील सर्वच.

In reply to by मनो

गुल्लू दादा 02/07/2021 - 11:06
मनो pdf दिल्याबद्दल खूप आभारी आहे. एका दमात वाचून काढली. कधीकधी आपली चूक नसताना पण दुसऱ्याच्या चुकांचे ओझे आपल्याला आयुष्यभर मिरवावे लागणे यासारखे दुःखच नाही.

In reply to by मनो

चौथा कोनाडा 15/07/2021 - 18:44
मनो, ते पुस्तक तिथं दिसत नाहीय ! This bin is no longer available. असा त्रुटी सन्देश दिसतोय ! (मी हे वाचलेलं आहे ! ) इथं तो " श्यामची गोष्ट्" हा त्यांनी लिहिलेला लेख "बोभाटा" या साईटवर बुक फॉरमॅट मध्ये वाचायला मिळेल ! हा लेख मुळतः "“चिन्ह” २०१२ च्या अंकात छापून आला होता ! चिन्ह हे कला विषयाला वाहिलेले प्रख्यात नियतकालीक आहे, आणि श्याम भुतकर हे नेपथ्यकार असल्यामुळे कलेचा संदर्भ अर्थातच आहे ! लेख आवर्जून वाचण्यासारखा आहे ! https://www.bobhata.com/lifestyle/story-joshi-abhyankar-serial-murders-2992?fbclid=IwAR1EPC9K_L9q_ZwyoiSxu6GGCEE2Jgg87N-anOB_MgY09ZWAQscDmkgOZ5E

बहुतेक त्यांना फाशी देण्याच्या आधी हे पुस्तक प्रकाशित झाले होते, त्या नंतर मात्र या पुस्तकावर बंदी घालण्यात आली होती. पेपर मधे या हत्याकांडा विषयी सारखे वाचून या चौकडी बद्दल एक मत बनले होते त्यामुळे असेल कदाचित पण त्यावेळी तरी अजिबात आवडले नव्हते. या पुस्तकाच्या सहा आवृत्त्या निघाल्या आहेत हे माहित नव्हते. पुन्हा एकदा वाचावे लागेल. पैजारबुवा,

श्रीगुरुजी 01/07/2021 - 08:44
हे पुस्तक प्रसिद्ध झाले तेव्हाच वाचले होते. साळसूदपणाचा आव आणून आपण सज्जन असूनही मित्रांच्या नादाला लागून दुर्दैवाने या हत्याकांडात अडकलो असा आव आणला आहे.

आणि तुमच्या सारखे/आमच्यासारखे लोक असलं तत्वज्ञान (?) वाचुन त्यांचं उदत्तीकरण करतात. अश्या माणसांनी लिहीलेली पुस्तके वाचण्याची इच्छा झालीच कशी ? असेच लोक मग संजय दत्त, अफ़्झल गुरु अश्यांना नंतर सहानुभूती दर्शवतात...... आणि त्यांना चूप करण्या ऐवजी आपण चर्चा करतो.

In reply to by सामान्यनागरिक

अनुस्वार 01/07/2021 - 16:20
दोन्हींची सरमिसळ नको. ऋग्वेदात 'आमच्याकडे सर्व दिशांनी ज्ञान यावे' अशी प्रार्थना आहे. विचार व्यक्त करणे कुणालाच निषिद्ध असू शकत नाही.

यांच्या प्रतिसादांशी सहमत. करून सवरून तत्वज्ञान सांगायला काही जात नाही. अशी पुस्तके आवडणे-न आवडणे ही वैयक्तिक आवड झाली. मात्र, अशा व्यक्तींनी पुस्तके लिहूच नयेत, ही बळजबरी नको. दुसरी बाजू, कितीही अयोग्य, चुकीची असली तरी ती उपलब्ध होणे काही अयोग्य नाही.

स्पार्टाकस 01/07/2021 - 19:09
मुनव्वर शहाचं हे पुस्तक म्हणजे स्वत:च्या कृत्याचं समर्थन करण्याचा निर्रगल प्रयत्न आहे. या केसमागचं सत्य जाणून घ्यायचं असेल तर नारायण पुरोहित यांचं 'ओ. के. बॉस' हे पुस्तक वाचा.

5 Paanch (English: Five) is an 2003 Indian crime thriller film written and directed by Anurag Kashyap and starring Kay Kay Menon, Aditya Srivastava, Vijay Maurya, Joy Fernandes and Tejaswini Kolhapure. The film is "loosely" based on the 1976–77 Joshi-Abhyankar serial murders in Pune.

In reply to by आंद्रे वडापाव

गॉडजिला 02/07/2021 - 15:57
म्हणुनच या सिनेमाला सेन्सोरने परवानगी नाकारली होती मग कश्यपने स्वताच हा चित्रपट ओनलाइन लिक केला. यातील केके मेननचे मै खुदा गाणे अफलातुन रॉक आहे. कश्यपने परत याच चित्रपटाचा शैतान नामक रिमेक केला होता... पण माफिचा साक्षिदार हा चित्रपट वास्तवतेच्या ज्यास्त जवळ जातो.

In reply to by गॉडजिला

अनुस्वार 06/07/2021 - 23:02
नुकताच 'माफीचा साक्षीदार' आणि 'पांच' पाहिला. दोन्ही चित्रपट जबरदस्त आहेत. माफीचा साक्षीदार जवळपास पूर्णपणे जक्कलच्या टोळीवर आधारित आहे. पांच तर या प्रकरणाशी अजिबात संबंधित वाटला नाही. आणि हो, "मै खुदा.." अफलातून गाणे आहे.

गामा पैलवान 15/07/2021 - 19:21
अनुस्वार, पुस्तकपरिचय करवून दिल्याबद्दल आभार. पुस्तक वाचतांना ते घडलेल्या घटनांचं वर्णनात्मक स्पष्टीकरण म्हणून वाचलं पाहिजे, समर्थन म्हणून नव्हे. असं एकंदरीत वाटतं चर्चा वाचून. आ.न., -गा.पै.

कटाक्ष- लेखक: मुनव्वर शाह संपादन: शुभदा गोगटे प्रकाशन: शुभदा-सारस्वत प्रकाशन प्रथमावृत्ती: फेब्रुवारी १९८३, सध्या सहावी (जून २००७) पृष्ठ संख्या: २०० किंमत: ₹१०० ओळख- १९७६-१९७७ च्या दरम्यान पुणे शहर दहा हत्याकांडांनी हादरले. महाराष्ट्रात जोशी-अभ्यंकर हत्याकांड या नावाने या गुन्ह्यांची दखल घेतली गेली. ‌मोठा धक्का होता तो म्हणजे या हत्याकांडात आरोपी म्हणून पकडले गेलेल्या पाच तरुणांची पंचविशीच्या आतली वये. मुनव्वर शहा हा त्या पाचांतला एक. वयाच्या अवघ्या एकविशीत पाच जणांच्या हत्येत प्रत्यक्ष सहभाग घेणारा.