मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिफारस

"The Kerala Story" - एक उत्तम कलाकृती!

टर्मीनेटर ·
मी सहसा बायोपिक्स, सत्यघटना/प्रसंगांवर आधारित असल्याचा दावा करणारे डॉक्युमेंटरी टाईप सिनेमे चित्रपटगृहातच काय OTT किंवा युट्युब वर देखील पहात नाही, ती माझी आवडच नाही. बायकोची इच्छा होती म्हणून OTT वर बघायला घेतलेला 'The Tashkent Files' हा अत्यंत रटाळ सिनेमा तिलाही एक चतुर्थांश देखील बघवला नव्हता, आणि तो अनुभव गाठीशी असल्याने त्याच दिग्दर्शकाचा 'The Kashmir Files' हा सिनेमा देखील आम्ही अद्याप बघितलेला नाही.

कलासक्त, संगीतप्रेमी, सौंदर्यासक्त रसिकांना 'बघण्याजोगे' बरेच काही... (भाग १)

चित्रगुप्त ·
काही काळापासून चित्रकला, संगीत, प्राचीन वास्तुरचना वगैरेंबद्दल यूट्यूबवर अनेक उत्तमोत्तम विडियो मी बघत आलेलो आहे. रसिकांकांसाठी ते हळूहळू इथे देत रहाण्यासाठी हा धागाप्रपंच करीत आहे. रसिक मिपाकरांनी त्यात आपापली भर टाकत राहून हा धागा समृद्ध करत रहावे, अशी विनंती करतो. सुरुवात पंडित मुकुल शिवपुत्र यांनी गायलेल्या 'जमुना किनारे मेरो गाव' या पारंपारिक रचनेने (ठुमरी ?) करतो. पं. कुमार गंधर्व, प्रभा अत्रे, राहुल/वसंतराव देशपांडे इ.

पुस्तक परिचय: The Art of Living: भाग ३ -- कुटुंब

श्रीगणेशा ·
---- संदर्भ ही लेखमाला "The Art of Living" या पुस्तकाचा परिचय/भाषांतर म्हणून लिहिली आहे.

पुस्तक परिचय: The Art of Living: भाग २ -- लग्न

श्रीगणेशा ·
---- संदर्भ ही लेखमाला "The Art of Living" या पुस्तकाचा परिचय/भाषांतर म्हणून लिहिली आहे. ते इंग्रजी भाषेतील पुस्तक इथे PDF स्वरूपात वाचता येईल: The Art of Living या लेखमालेतील आधीचा लेख: पुस्तक परिचय: The Art of Living: भाग १ -- प्रेम ---- लग्न लग्नबंधन मग ते लवचिक असो वा जाचक, लग्न समारंभ किंवा कायदेशीर संमतीपत्र हे सर्वत्र स्वीकारले गेले आहे.

Kooman The Night Rider (कुमान द‌ नाईट रायडर)

अनुस्वार ·
कटाक्ष: मल्याळम इंग्रजी उपनामांसाहित २ तास ३३ मिनिटे गुन्हा, थरार, रहस्य अमेझॉन प्राईम . ओळख- ही गोष्ट आहे गिरीशंकर या केरळ पोलीस दलातील CPO (सिविल पोलीस ऑफिसर) ची. एका विशिष्ट कारणामुळे गिरीशंकर प्रचंड स्वाभिमानी, अहंकारी आणि अत्यंत चालाख पोलीस अधिकारी असतो.

पुस्तक परिचय: The Art of Living: भाग १ -- प्रेम

श्रीगणेशा ·
---- संदर्भ ही लेखमाला "The Art of Living" या पुस्तकाचा परिचय/भाषांतर म्हणून लिहिली आहे. ते इंग्रजी भाषेतील पुस्तक इथे PDF स्वरूपात वाचता येईल: The Art of Living The Art of Living ---- पूर्वचित्र (flashback) कॉलेजचे दिवस. रविवार संध्याकाळ. मेसला सुट्टी.

भाषा घडतांना

मनो ·
लेखक श्री. अविनाश बिनीवाले, त्यांच्या परवानगीने पुस्तकाचे प्रास्तविक आणि त्यातील दोन किस्से इथे मराठी वाचकांसाठी टाकतो आहे. मूळ पुस्तक: भाषा घडतांना संकल्पना-संशोधन-लेखन: श्री. अविनाश बिनीवाले गौतमी प्रकाशन किंमत: १३० रुपये प्रास्तविक भाषा म्हणजे बोली, लोकांकडून बोलली जाणारी भाषा ह्या अर्थानं भाषेचा विचार केला तर जगातल्या कोणत्याही भाषेत हळू हळू पण सातत्यानं बदल होत असतात.

कांतारा ए लेजेंड

अनुस्वार ·
कटाक्ष - मुळ‌ कन्नड चित्रपट नाट्य, थरारपट वेळ - २ तास ३० मिनिटे हिंदी परभाषीकरण (डबिंग) ओळख - नावातल्या 'ए लेजेंड' नुसार चित्रपटाची कथा एका आख्यायिकेवर बेतलेली आहे. कर्नाटकातील काही ग्रामीण लोकसंस्कृतींमध्ये आढळणाऱ्या 'भूता कोला' या परंपरेशी संबंधित ही आख्यायिका सांगून चित्रपटाची सुरुवात होते. चित्रपटात या परंपरेचा केवळ 'कोला' असा उल्लेख असून या कार्यक्रमाच्या उत्सव मुर्तीला 'देव' म्हणतात. हे देव गावातील कुणीही व्यक्ती असू शकते. एरवी सामान्य माणूस म्हणून जगणाऱ्या या व्यक्तीच्या शरीरात 'कोला'च्या वेळी वनदेव संचारतात अशी मान्यता असते.

POWDER (पावडर) - शानदार, जबरदस्त, जिंदाबाद!

अनुस्वार ·
कटाक्ष- गुन्हेगारी नाट्य. २०१० मध्ये सोनी टीव्हीवर प्रदर्शित. प्रत्येकी ४० मिनिटांचे २६ भाग. भाषा- हिंदी. ओळख- गोष्ट ओळखीची आहे- पोलीस विरूद्ध अमली पदार्थांचा तस्कर (अन्सारी - पंकज त्रिपाठी). अगदी पहिल्याच भागाच्या शेवटी ही मालिका नेहमीचा चोर-पोलीस खेळ नाही याची खात्री पटते.

मला आवडली (न समजार्‍या) इतर भाषेतील गाणी

Trump ·
मिपावरील (खफवरील) पुरंदर चर्चेवरुन गाडी कधी आ आंटेवर पोचली आणि मन अगदी जुन्या आठवणीत निघुन गेले. महाराष्ट्रात अगदी न समजार्‍या गाण्यांनी धुमाकुळ माजवला होता, आणि अजुनही आहे.