मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिफारस

छपाकसे पेहेचान ले गया...

शा वि कु ·
दीपिकाच्या जेएनयु वारी मुळे मोकळ्या थिएटरची अपेक्षा होती. आणि अपेक्षेप्रमाणे तिकीटघरापाशी तानाजीसाठी हिssss मोठ्ठी रांग, आणि छपाक साठी अगदी तुरळक लोग. पण खुर्च्यांमध्ये स्थानापन्न झाल्यावर हळूहळू गर्दी वाढली. सिनेमाच्या पहिल्या पाच मिनिटांमध्ये थिएटर सम्पूर्ण भरलं. अगदी बरं वाटलं. हा सिनेमा पाहायचा हे तर सिनेमा जाहीर झाल्यावरच ठरवलेलं, बऱ्याच कारणांमुळे- 1) मेघना गुलजार- मेघना गुलजार ही अगदी आवडती दिग्दर्शिका. तलवार भयानक म्हणजे भयानक आवडला होता. राझी तलवार इतका नाही आवडला, पण तरी दिगदर्शिकेवरचा विश्वास तसाच टिकून राहिला.

एपिक चॅनेल वरील एक उल्लेखनीय मालिका

मालविका ·
एपिक चॅनेल वरील एक उल्लेखनीय मालिका कलियुग - एक आरंभ दिनांक १८ नोव्हेंबर पासून एपिक या चॅनेल वर रात्री ८.३०वाजता "कलयुग - एक आरंभ " या नावाची अतिशय उत्तम मालिका सुरु झाली आहे. मालिका ऍनिमेशन प्रकारात मोडत असली तरी लहानांसोबत मोठ्यांनीही आवर्जून बघावी अशी हि मालिका आहे. उलट मोठ्यांना त्यातले संदर्भ पटकन कळतील. आम्ही देखील जरा उशिराच हि मालिका बघायला सुरवात केली. पण आता मात्र सर्वाना हि मालिका बघण्याची विनंती करतो. महाभारतावर आधारित अशी हि मालिका आपल्याला अनेक विचार करायला भाग पाडते.

Kingआख्यान 2: फायरस्टार्टर

शा वि कु ·
Kingआख्यान 1:- डोलोरस क्लेबोर्न टेलिकायनेसीस, टेलीपथी किंगच्या आवडत्या कथा आहेत. किंगची पहिली प्रकाशित कादंबरी "कॅरी" (Carrie- 1974) पण एका टेलिकायनेटिक शक्ती असणाऱ्या तरुण मुलीची गोष्ट होती. अपरिमित जीवितहानी करण्याइतपत शक्ती असलेली, पण बुजरी आणि एकलकोंडी असणारी एक teenage मुलगी, धर्मांध आणि वेडसर असलेली तिची आई, आणि याउप्पर कडी करायला तिला त्रास द्यायला टपलेल्या मुलामुलींचं टोळकं. या सगळ्यांच्या मिलापातून किंग विनाशाचं एक थरारक आणि तितकंच ह्रदयद्रावक तांडव रचतो.

प्रवासात लागणार्‍या वस्तूंची यादी

पाषाणभेद ·
मागे मिपावर प्रथमोपचार पेटी - First Aid Box असा धागा काढला होता. त्याचा कितपत अन कुणाला उपयोग झाला ते माहीत नाही पण मराठीत असा शब्द शोधतांना किंवा मराठीत चर्चा करतांना याचा उपयोग झाला असावा. होते काय की कायप्पावर लिहीलेले कायमचे राहत नाही. म्हणून कुठेतरी कायमस्वरूपी असण्यासाठी मिपावर लेखन असावे असे वाटते. कायप्पावर झालेल्या चर्चेचा धागा व्हावा असे वाटत असल्याने येथे लिहीतो आहे. तर आपण नेहमी किंवा अधेमधे, सतत किंवा कधीकधी प्रवास करतो. तो प्रवास अगदी काही तासांपासून काही दिवसांपर्यंतचा असू शकतो.

द फॉगी माउंट्न बॉईज उर्फ (जाने कैसे सपनों में खो गई अखियाँ...)

पहाटवारा ·
आपल्याला मेलं त्या संगीतातलं काही कळत नाही. एक सरगम सोडली तर रागांच्या सुरावटी कळत नाहीत, आरोह-अवरोह कळत नाही, आॅर्केस्ट्रेशनच्या ज्ञानाचीही बोंबच पण आपल्याला गाणी ऐकायला आवडतात.

radio ga ga

क्षितिज जयकर ·
RADIO GA GA……………… ह्या लेखाचं शीर्षक जरी इंग्लिश मधून असलं तरी ते मराठीत सुद्धा तितकंच सार्थ आहे. रेडिओ गा!!!!! गा!!!!. १९८४ साली QUEEN ह्या ब्रिटिश वाद्यवृंदाने हे गाणं रचनाबद्ध केलं , ते आज इतक्या वर्षांनंतर सुद्धा आपल्याला रेडिओ वर हमखास ऐकायला मिळतं. मला हा लेख लिहिण्यासाठी जी स्फूर्ती मिळाली ती ह्याच गीतावरून. त्यामुळे सर्वप्रथम ह्या गाण्याबद्दल थोडीशी माहिती देतो. मगाशी लिहिल्याप्रमाणे QUEEN ह्या वाद्यवृंदाचा DRUMMER (त्याला ढोल वादक म्हणणं माझ्या जीवावर येतं) रॉजर टेलर याने ते १९८३ साली प्रथम ते रचनाबद्ध केलं , आणि मग १९८४ साली ते स्वरबद्ध करून सर्वत्र प्रसिद्ध करण्यात आलं.

द सियालकोट सागा

महासंग्राम ·
असतो मा सद्‌गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मामृतम् गमय बृहदारण्यकोपनिषद् 1.3.28 म्हणजेच मला असत्याकडून सत्याकडे ने अंधाराकडून प्रकाशाकडे ने मृत्यूकडून अमरत्वाकडे ने अगदी प्राचीन काळापासून मर्त्य मानव कायमच अमरत्वाच्या शोधात फिरत होता, रामायण महाभारतामध्ये सुद्धा अमरत्वाचा उल्लेख आहे. माणसाला अमर कसं होता येईल यासाठी योग, ध्यान, विविध औषधी वनस्पतीचे प्रयोग करत आला आहे. पण सुदैवाने म्हणा अथवा दुर्दैवाने त्याला अजून त्यात यश मिळालं नाहीये अश्विन सांघीची सियालकोट गाथेचा गाभा सुद्धा हेच अमरत्व आहे. सम्राट अशोकाच्या ऐतिहासिक साम्राज्यापासून सुरु झालेली हि कथा थेट येते ती फाळणीच्या काळात.

मिसळपाववरचं शिफारस करण्यायोग्य साहित्य

इरामयी ·
गेले काही दिवस मिसळपाव धुंडाळत असताना असं लक्षात आलं की मिसळपाववर केवढं वैविध्यपूर्ण आणि सुंदर लेखन झालेलं आहे! आज २०१९ मध्ये पूर्वीचं चांगलं लेखन हुडकून काढणं हे खूप कठीण आहे. या ट्रायल अँड एरर पद्धतीने शोधताना बरेच उत्तम लेख, काव्य, मालिका निसटून जाण्याचीच शक्यताच जास्त. त्यामुळे हा नवा धागा. मिसळपाववर पूर्वी प्रसिद्ध झालेल्या लोकप्रिय लेखनाची एका ठिकाणी यादी करता येऊ शकेल का?

पुस्तक परिचय : सुनीताबाई - लेखिका मंगला गोडबोले (अरुणा ढेरे याच्या स्वतंत्र लेखासह )

मालविका ·
सुनीताबाई - लेखिका मंगला गोडबोले (अरुणा ढेरे याच्या स्वतंत्र लेखासह ) काही दिवसांपूर्वी मैत्रीण अस्मिता चितळे हिच्या कपाटात पुस्तक दिसलं. पुस्तक हातात घेतल कि मी पाठच पान बघते. साधारण पुस्तकाचा आशय लक्षात येतो. या पुस्तकावरही पाठच्या पानावर थोडक्यात ओळख दिलेली आहे."आप्तेष्टांच्या आठवणींचा आणि स्वतः सुनीताबाईंच्या लेखनाचा आधार घेऊन केलेली हि स्मरणयात्रा", असंच पुस्तकाचं वर्णन केलेलं आहे. पु लं हे आधीच जिव्हाळयाचा विषय आणि त्यांची बायको म्हणून कदाचित सुनीताबाई सुद्धा. लगेचच अस्मिता कडून पुस्तक उधारीवर घेतलं. तरीही घरी येऊन महिनाभर पुस्तक नुसतं पडून होत.

चित्रपट: The Descendants!

लई भारी ·
हॉटस्टार वर काहीतरी शोधत असताना ह्या चित्रपटाबद्दल कळलं. शक्यतो मी गुगल करून अंदाज घेतल्याशिवाय चित्रपट बघत नाही. त्यात 'जॉर्ज क्लूनी(की क्लोनी)' आहे म्हटल्यावर बघायचं ठरवलं. त्याचे थोडेच चित्रपट बघितलेत पण त्याचा अभिनय, संवादफेक प्रचंड आवडलीय. तस चित्रपटात नाट्य खूप नाही आहे आणि बऱ्यापैकी संथ वाटू शकतो. पण त्याच वेळी एकदम तरल आणि मनाला स्पर्शून जाणारा वाटला. हवाई बेटांवर राहणार कुटुंब. नायकाच्या ३-४ पिढ्या आधी हवाई बेटांपैकी एका मुख्य भूभागाचे बऱ्यापैकी अधिकार नायकाच्या(मॅट) पूर्वजांकडे असतात. राजघराणे म्हणा ना. त्यायोगे आताच्या विस्तारलेल्या भल्या मोठ्या कुटुंबाकडे प्रचंड मोठी जमीन असते.