मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिफारस

सलीम मन्सुरांचा मुस्लीम सत्यशोध

माहितगार ·
लेखनप्रकार
सलीम मंसूर हे भारतीय वंशाचे कॅनेडियन प्राध्यापक आहेत. राज्यशास्त्र आणि इस्लाम आणि मुस्लीम सत्यशोध आणि प्रबोधनाच्या दिशा हा त्यांच्या लेखन आणि व्याख्यानांचा मुख्य विषय आहे. त्यांची सर्वच मते मला पटली असे नाही पण भारतीयांना त्याबाबत मनन आणि चर्चा करणे आवडू शकेल असे वाटते. या पेक्षा अधिक माहिती देण्या पेक्षा युट्यूब लिंक्स देतो. त्यातील ११ मार्च २०१८ ची युट्यूबवरील मुलाखतच प्रथम पहावी.

अ का पेला - A cappella

राघवेंद्र ·
अ का पेला - A cappella हे नाव तसे जुनेच म्हणजे १५ व्या शतका पासून अस्तित्वात आहे. इटालियन भाषेतील हे नाव म्हणजे प्रार्थनेचे गाणे कुठल्याही वाद्याशिवाय एकटयाने किंवा समूहाने म्हणायचे असते. तसेही आपल्या संस्कृती मध्ये प्रार्थनेचे पाठ कुठल्याही वाद्याशिवाय म्हणले जातात. २० व्या शतकाच्या सुरुवातीला अमेरिकेत नव्या पद्धतीने हा प्रकार प्रचलित झाले. या मध्ये शाळा -कॉलेजमधील विदयार्थी समुहात गाणी म्हणु लागली. वाद्याऐवजी टाळ्या, पायाचा ठेका याचा वापर सुरु झाला.

आंतरजालावरचा वावर अधिक सुलभ, आनंददायी व उत्पादक बनवणार्‍या उप-प्रणाल्या (एक्सटेन्शन्स व अ‍ॅप्स)

डॉ सुहास म्हात्रे ·
लेखनविषय:
आजच्या जीवनावश्यक गोष्टींची यादी केली तर त्यात आंतरजालाची निवड नक्कीच होईल, असे म्हणतात. यातला विनोदाचा भाग सोडला तरी आंतरजालाने आपल्या जीवनात फार महत्वाचे स्थान बनवले आहे आणि त्याच्याशिवाय जगण्याची कल्पना आपल्याला सहन होणार नाही, यात संशय नाही. खानपानच्या वेळांमध्ये तीन-चार तासांचा अवधी आपण सहजपणे पेलतो पण "तेवढा सलग वेळ डेस्कटॉप-लॅपटॉप-टॅब-मोबाईल इत्यादीमध्ये तोंड न खुपसता घालवल्याला किती दिवस झाले? " या प्रश्नाचे उत्तर सहजा-सहजी देता येणार नाही, नाही का?!

राजी -' छा '-लिया

विअर्ड विक्स ·
लेखनविषय:
हेर पट म्हटला कि आपल्यासमोर बॉण्ड पट वा टायगर पट डोळ्यासमोर उभे राहतात. मुख्यतः हेर पट हे नायक प्रधान चित्रपट असतात, या अंगाने राझी चे वेगळेपण उठून दिसते. हा चित्रपट हरिंदर सिक्का यांच्या " सेहमत कॉलिंग " या कथेवर आधारित आहे. या चित्रपटातील कथा १९७१ च्या युद्ध काळातील आहे. हिदायत खान ( रजत कपूर ) व बायको तेजी खान ( सोनी राझदान - आलियाची खरी आई ) ( तेजीच्या कपाळावर सिंदूर दाखवला आहे याचे कारण कळले नाही ) काश्मिरात वास्तव्य असते व पाकिस्तान काश्मिरात त्यांचे व्यापारानिमित्त येणेजाणे होत असते . हिदायत खान हे भारतासाठी डबल एजन्ट ( मराठी शब्द ?

आऊटलँडर

एमी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
. . Sing me a song of a lass that is gone, Say, could that lass be I? Merry of soul she sailed on a day Over the sea to Skye. Billow and breeze, islands and seas, Mountains of rain and sun, All that was good, all that was fair, All that was me is gone. . . वर्ल्डवॉर २ मधे कॉम्बॅट नर्स म्हणून काम केलेली क्लेअर आपल्या इतिहासतज्ञ नवर्यासोबत (फ्रॅंक) स्कॉटलंड फिरायला आली आहे. नवर्याचा पुर्वज जॅक रँडलबद्दल अधिक माहिती जमा करणे आणि दुसरा हनिमून असे दुहेरी उघड उद्देश या ट्रिपमागे आहेत.

पुस्तक परीक्षण: "असा होता सिकंदर"

निमिष सोनार ·
पुस्तक परीक्षण: "असा होता सिकंदर" लेखिका: इंद्रायणी सावकार रिया पब्लिकेशन अजब डीस्ट्रीब्युटर्स सूचना: अलेक्झांडर = सिकंदर पोरस = पुरू = पुरुषोत्तम = पौरव देशाचा राजा चाणक्य = कौटिल्य = विष्णुगुप्त परीक्षण: नुकतेच "असा होता सिकंदर" हे पुस्तक मी वाचून पूर्ण केले. लेखिका "इंद्रायणी सावकार" यांची "लेखनशैली" काय वर्णावी? एकदम अद्भुत अशी शैली! कठीण आणि क्लिष्ट असलेला इतिहास विषय आणि त्यातल्या त्यात अलेक्झांडर सारख्या जगप्रसिद्ध प्राचीन ग्रीक व्यक्तिमत्वाबद्दल लिहायचे म्हणजे एक आव्हान होते पण इंद्रायणी यांनी कमाल केली आहे.

आता ई-बुक मोडी लिपीतही! जाणून घ्या पहिल्या मोडी ई-बुक निर्मिती मागची धडपड

कौशिक लेले ·
नुकतेच मी मराठी भाषेतील पण मोडी लिपीतील जगातील पहिलेच ईबुक वाचले. जयसिंगराव पवार लिखित "राजर्षी शाहू छत्रपती महाराज" हे पुस्तक नवीनकुमार माळी यांनी मोडी लिपीत लिप्यंतरित करून ईबुक स्वरूपात सादर केले आहे. ई-बुक वाचून पूर्ण केले आणि नेहमीप्रमाणे माझ्या पुस्तक परिक्षणाच्या ब्लॉगवर त्याबद्दल लिहिले. नेहमी पुस्तक परीक्षणाबद्दल मिपावर लिहीत नाही पण नेहमीच्या पुस्तकांपेक्षा हे वेगळं आहे म्हणून म्हटलं चोखंदळ मिपाकरांना या बद्दल सांगावं.

बदलाच्या गतिचे नवे नियम मांडणारा: 'न्युटन'

पुंबा ·
भारत बदलतो आहे, सत्तर वर्षांच्या प्रवासात असंख्य खाचखळग्यांतून, काट्याकुट्यातून वाट काढताना, जुन्या समस्यांवर विजय मिळवत नव्या समस्यांना तोंड देताना सतत कात टाकून नविन रुपडे घेतोय. काही बदल इतके क्रांतीकारी की त्यांच्याशी जुळवून घ्यायलाच शक्तिचा अफाट व्यय होतो अन काही इतके धीमे की 'काही होतंच नाही' अशी निराशा व्हावी. कित्येक प्रामाणिक लोक व्यवस्थेला आव्हान देता देता थकून जाऊन परत व्यवस्थेचाच भाग होऊन राहतात अश्या वेळेला धीमी पण आश्वासक पावले टाकत काही शिलेदार मात्र आपल्या परीने लढत राहतात. न्युटन ही अश्याच एका शिलेदाराची कथा आहे.

मान गए पंतवैद्य...

टर्मीनेटर ·
लेखनविषय:
काल रात्री युट्युब वर नेहमीप्रमाणे कथाकथनांचे व्हिडीओज बघत असताना Up next मध्ये व.पु.काळेंचा 'पंतवैद्य' हा व्हिडीओ दिसला.

(why is there nothing rather than something ???????)

मुक्त विहारि ·
लेखनविषय:
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.