मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिफारस

Loreak...एक स्पॅनिश चित्रपट.

प्राची अश्विनी ·
Loreak - flowers. Directors: Jon Garaño, José María Goenaga दोन स्त्रिया, ऍन आणि lourdes (मनी हाईस्टची राकेल). एकमेकांना न ओळखणा-या. दोघीही चाळीशीच्या आसपास. फुलांच्या एका निनावी बुकेमुळं त्यांच्या मनोविश्वात काय काय स्थित्यंतरं होतात हे तरलपणे दाखवणारा हा स्पॅनिश/ बास्क चित्रपट. दोघींच्या कथा इथं simultaneously उलगडत जातात. पहिलं कपल ऍन आणि तिचा नवरा. लग्नाला अनेक वर्ष झाल्यानंतर पती पत्नीच्या नात्यात येणारं साचलेपण, संवादाचा अभाव इथंही आहे. तिची मेनॉपॉज जवळ आलीय. त्यामुळे काही ना काही शारिरीक तक्रारी आहेतच. एक दिवस तिची डॉक्टर तिला सांगते, एक छोटी सर्जरी करावी लागेल.ऍन घरी येते.

कंदहार.. (इराणी चित्रपट 2001)

प्राची अश्विनी ·
कंदहार.... आत्ताच्या अफगाणिस्तान मधली परिस्थिती पाहून राहून राहून आठवतोय 2001 साली प्रदर्शित झालेला मोहसीन मखबलाफचा कंदहार हा चित्रपट. हा खरंतर 9/11च्या आधीचा आहे. तालिबान तेव्हाही तिथं होतंच. नफस आपल्या कुटुंबासोबत लहानपणीच अफगाणिस्तान मधून कनडामध्ये पळून आलेली आहे. त्या सगळ्या पळापळीत तिची एक बहीण अफगाणिस्तानमध्येच राहिलीय. नफस सुरक्षित आयुष्य जगतेय खरी पण बहीणीच्या वाट्याला आलेल्या खडतर जीवनाविषयी तिच्या मनात अपराधीपणाची भावना आहे. कधीतरी येणारं एखादं पत्र एवढाच त्यांचा एकमेकांशी संपर्क. एक दिवस नफसला बहिणीचं पत्र येतं की ती येत्या सूर्यग्रहणाच्या दिवशी आत्महत्या करतेय.

'श्रीविठ्ठल: एक महासमन्वय', वाचावेच असे पुस्तक

केदार भिडे ·
अक्षरनामा मध्ये आलेला लेख (लिंक शेवटी) वाचून मला या पुस्तकाचा परिचय झाला. तेव्हाच हे पुस्तक वाचायचे असे माझ्या मनात नोंदवून ठेवले होते. आमच्या गावात विठ्ठलाचे देऊळ आहे आणि तिथे आषाढ महिन्यात उत्सवही असतो. गेले वर्ष आणि या वर्षी कोविड साथीमुळे त्यावर मर्यादा आल्या आहेत. तरीही आषाढ म्हटले की विठ्ठल हे समीकरण माझ्याच नव्हे तर समस्त मराठी मनात पक्के आहे. त्यामुळे यावर्षी आषाढ महिना जवळ आला तसं या पुस्तकाची मला आठवण आली आणि लगेच खरेदी करून वाचूनही काढले. सर्व पुस्तक आतुरतेने वाचून काढले. त्यातील मला आकलन झालेले काही मुद्दे खालील प्रमाणे.

समूदादाः डोळे पाणवणारी कादंबरी!

वामन देशमुख ·
'समूदादा' ही नागेश सू. शेवाळकर यांची बालकादंबरी वाचताना वाचकांना मनापासून आनंद होतो, एक प्रकारचे समाधान होते आणि डोळेही पाणवतात! समीर हा कादंबरीचा नायक आणि इतर बाल पात्रं आज घरोघरी, इमारतींमध्ये, गल्लोगल्ली आणि चाळींमधून निश्चितपणे भेटत असतात. त्यांना पाहताना मनात एक शंका आल्याशिवाय राहत नाही की, आजच्या स्पर्धेच्या युगात आपण बालकांचे बालपण हिरावून घेत आहोत की काय? कारण आज मुल दोन-अडीच वर्षांचे होत नाही तोच त्याची रवानगी 'प्ले ग्रुप' किंवा पाळणाघरात होताना दिसते आहे. समूदादा हे सर्वसामान्य घरामध्ये बागडणाऱ्या बालकांचे प्रतिनिधीत्व करणारे चरित्र आहे.

नवल - पुस्तक परिचय

पाटिल ·
नवल. जानेवारी २०२१ मध्ये प्रकाशित झालेली प्रशान्त बागड यांची ही पहिलीच कादंबरी आहे.. फारा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ते हाती आलं होतं...

अशा सांजवेळी...

श्रीगणेशा ·
एक नवीन मराठी गाणं ऐकण्यात आलं... "अशा सांजवेळी" सुंदर शब्दरचना, सुमधुर संगीत आणि तितकाच सुरेल आवाज. सर्व अगदी जुळून आलं आहे. (संगीतकारांच्याच शब्दात) बासरी आणि मोहनवीणा या वाद्यांच्या मधुर आवाजाने गाण्याची सुंदरता अजूनच बहरली आहे. गाण्याची YouTube लिंक: https://www.youtube.com/watch?v=Stcrt7_mPKY मिपाकरांनो.. एखादं भावलेलं नवीन गाणं ऐकलं असेल तर इथे नक्की सांगा.

डोक्याला शॉट [षष्ठी]

गड्डा झब्बू ·
Howdy मिपाकर्स आज पुन्हा आवाक झालात ना मी तुम्हाला प्रेम भावनेने नमस्कार मिपाकर्स किंवा तुच्छ भावनेने हॅलो फुल्स वगैरे वगैरे न म्हणता एकदम Howdy मिपाकर्स म्हणालो म्हणुन? येस्स... मला खात्रीच होती की तुम्हाला असा प्रश्न पडेल म्हणून. तर त्याचं काय आहे मंडळी ती एक मोट्ठी रहस्यमय ष्टोरी आहे आणि ती रहस्यमय ष्टोरी सांगायलाच आज मी तुमच्यासमोर पुन्हा आलो आहे. आता मी लोकल वरून एकदम ग्लोबल झालो आहे. माझी भाषा सुद्धा थोडी बदलल्याचे तुमच्या चाणाक्ष नजरेतुन सुटणार नाही, आणि त्याला कारणीभूत आहेत मला लाभलेल्या नवीन गुरुमैया! एकमुखाने बोला….. जय हो गुरुमैया की!

डोक्याला शॉट [षष्ठी]

गड्डा झब्बू ·
Howdy मिपाकर्स आज पुन्हा आवाक झालात ना मी तुम्हाला प्रेम भावनेने नमस्कार मिपाकर्स किंवा तुच्छ भावनेने हॅलो फुल्स वगैरे वगैरे न म्हणता एकदम Howdy मिपाकर्स म्हणालो म्हणुन? येस्स... मला खात्रीच होती की तुम्हाला असा प्रश्न पडेल म्हणून. तर त्याचं काय आहे मंडळी ती एक मोट्ठी रहस्यमय ष्टोरी आहे आणि ती रहस्यमय ष्टोरी सांगायलाच आज मी तुमच्यासमोर पुन्हा आलो आहे. आता मी लोकल वरून एकदम ग्लोबल झालो आहे. माझी भाषा सुद्धा थोडी बदलल्याचे तुमच्या चाणाक्ष नजरेतुन सुटणार नाही, आणि त्याला कारणीभूत आहेत मला लाभलेल्या नवीन गुरुमैया! एकमुखाने बोला….. जय हो गुरुमैया की!

अनुवादित पुस्तकं

पाटिल ·
वाचनाच्या मर्यादेत, मला आवडलेल्या आणि आठवतायत तशा क्रमाने काही अनुवादित पुस्तकांची यादी करतो आहे. हा उद्योग करण्याचा हेतू असा की फार पूर्वी माझ्याबाबतीत प्रॉब्लेम असा झाला होता की मराठीतलं जे जे वाचायला पाहिजे होतं, ते आता वाचून झालेलं आहे, असं वाटण्याचा एक काळ आला होता.. आणि मग त्यातून 'अजून किती काळ तेच तेच वाचून मन रिझवून घ्यायचं', असा वैतागही..‌ पण मग डायरेक्ट इंग्रजी क्लासिक्सकडं जायचं तर त्यात एक प्रकारची 'दचक' होती की ती पल्लेदार भाषा आपल्याला झेपतेय की नाही वगैरे..

हे वाचा: येस, आय ॲम् गिल्टी!

अनुस्वार ·
कटाक्ष- लेखक: मुनव्वर शाह संपादन: शुभदा गोगटे प्रकाशन: शुभदा-सारस्वत प्रकाशन प्रथमावृत्ती: फेब्रुवारी १९८३, सध्या सहावी (जून २००७) पृष्ठ संख्या: २०० किंमत: ₹१०० ओळख- १९७६-१९७७ च्या दरम्यान पुणे शहर दहा हत्याकांडांनी हादरले. महाराष्ट्रात जोशी-अभ्यंकर हत्याकांड या नावाने या गुन्ह्यांची दखल घेतली गेली. ‌मोठा धक्का होता तो म्हणजे या हत्याकांडात आरोपी म्हणून पकडले गेलेल्या पाच तरुणांची पंचविशीच्या आतली वये. मुनव्वर शहा हा त्या पाचांतला एक. वयाच्या अवघ्या एकविशीत पाच जणांच्या हत्येत प्रत्यक्ष सहभाग घेणारा.