मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शिफारस

निफा वायनरी - नाशिक

vcdatrange ·
ज्योत्स्ना आणि अशोक या उच्चशिक्षित शेतकरी जोडप्याची भेट मनाला अन पोटाला देखील आनंद देणारी ठरली. नाशिक निफाड रस्त्यावर पिंपळस रामाचे या गावी सुरवडे परिवाराची निफा वायनरी हे कौटुंबिक युनिट आहे. स्वतःच्या शेतात स्वतः पिकवलेल्या द्राक्षापासून स्वतःच वाइन बनवायची आणि या छोटेखानी फार्म कम आउटलेट मध्ये उपलब्ध करून द्यायची DIY हा अशोकाचा मंत्र. अगदी वेब पेज देखील त्याने स्वतःच बनवलय. दक्षिण ध्रुवावर जाऊन आलेल्या अशोक सोबत निवांत गप्पा झाल्या. स्व विनायकदादा पाटील या समान धाग्याने सुरू झालेल्या गप्पा Sustainable Solution या समवायि विषयात सहजी रमल्या.

पुष्पा २: द रूल् - संक्षिप्त ओळख वगैरे

वामन देशमुख ·
एकाच आठवड्यात हा सिनेमा मी दोनदा पाहीला. पहिल्यांदा कुटुंबीयांसमवेत हिंदीत एका थेटरात; चार दिवसांनी मित्रांसमवेत तेलुगूत दुसऱ्या एका थेटरात. पुष्पा १: द राइज् आवडलेला होताच. पुष्पा २: द रूल् अधिकच आवडला. इतर कोणत्याही लोकप्रिय तेलुगु सिनेमातल्यासारखाच या सिनेमातही प्रचंड मसाला आहे.

सहज सुचलं म्हणून

कंजूस ·
सहज सुचलं म्हणून ( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी) इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे. * आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो.

माचीवरला बुधा

श्रीगणेशा ·
लेखनप्रकार
माचीवरला बुधा ही गोनिदांची कादंबरी, त्यावर आधारित विजयदत्त यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट, आणि त्या चित्रपटासाठी धनंजय धुमाळ यांनी संगीतबद्ध केलेलं एक पक्ष्यांचं संगीत.

दिवाळी विशेष - ‘सागरी पक्ष्यां’चं संग्रहालय

पराग१२२६३ ·
गोवा जवळ असूनही जाऊ-जाऊ करत राहतच होतं. गोव्यात नौदलाच्या हवाई शाखेचं संग्रहालय असल्याचं बऱ्याच वर्षांपूर्वी वाचनात आलं होतं. त्यातच नौदलाच्या हवाई शाखेबद्दल आणि त्यातही विमानवाहू जहाजांबद्दल आकर्षण असल्यामुळं ते संग्रहालय पाहावं अशी खूप इच्छा होती.

दिवाळी सुटीत डोक्याला खुराक

vcdatrange ·
लेखनविषय:
दिवाळीच्या सुटीत डोक्याला खुराक हवा असेल तर दोन हटके मुवीज् सुचवतोय. . THE PLATFORM (2019) सामाजिक संदेशासोबत वेगळ्या संकल्पनेवर बनलेला हा अनोखा आणि थोडासा मन हेलावणारा चित्रपट आहे. सुमारे 300 मजल्यांची इमारत असून, तिला इमारत म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात एक तडीपार कारागृह आहे. जिथे कैदी स्वतः शिक्षा भोगण्यासाठी प्रवेशतात. त्या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर प्रत्येक खोलीत दोन कैदी राहतात. आता असे होते की दिवसातून एकदाच एक प्लॅटफॉर्म त्या खोलीच्या मध्यातुन वरपासून खालपर्यंत जातो.

हे वाचा: बगळा

अनुस्वार ·
Bagla कटाक्ष- लेखक: प्रसाद कुमठेकर प्रकाशन: पार पब्लिकेशन्स पहिली आवृत्ती: २०१६ पृष्ठे: १५८ किंमत: ₹३०० ओळख- चिंतामणप्रसाद पुरुषोत्तम सरदेशमुख, पाचवी 'क'.

हे‌ वाचा: शीतयुद्ध सदानंद

अनुस्वार ·
लेखनविषय:
 कटाक्ष: लेखक - श्याम मनोहर प्रकाशक - पॉप्युलर प्रकाशन प्रथम आवृत्ती - १९८७, सध्या दुसरी आवृत्ती (२००७) (पुनर्मुद्रण २०२३) पृष्ठ संख्या - १२२ किंमत - ₹१७५ ओळख: या लघु-कादंबरीला अर्पणपत्रिका नाही तसेच प्रस्तावनाही नाही.

मदत हवी आहे - दिल्ली, मथुरा, वृदांवन, आग्रा येथे राहण्यास जागा

Trump ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
दिल्ली, मथुरा, वृदांवन, आग्रा येथे पर्यटनासाठी जायचे योजत आहेत. सदर प्रवास हा हिप्पी आणि कमनियोजीत (कमीत कमी नियोजीत), कमीत कमी खर्चात अशा प्रकारचा करायचा आहे. त्यामुळे हॉटेल हा शेवटचा पर्याय आहे. कृपया राहण्यासाठी ठिकाणे सुचवा. १. सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेपासुन जवळ असावे. २. जेवण स्वतः बनवण्याची मोकळीक असावी. ३. ठिकाण सुरक्षित असावे, मालक प्रामाणिक असावा. दिलेले कपडे, बिछाणे, भांडी स्वच्छ असावीत. आपत्कालीन व्यवस्था असावी. ४. जवळ तयार जेवणाची व्यवस्था असावी, गरज पडल्या विकत घेता येईल. किराणा मालाचे दुकान जवळ असावे. ५. भाडे खोलीवर आधारीत असावे, माणसांवर नसावे. ६.