आज 3 महिन्यांनी गुलटेकडी मार्केटयार्डला गेलो (कित्ती सुख वाटलं म्हणून सांगू!? वारकऱ्यांना पंढरपूर, तैसे आम्हा मार्केटयार्ड!) उद्याच्या कामाची फुल फळ घेतली आणि भाजीत-शिरलो.
फळभाज्या 1किलोच्या आत मिळत नाहीत हे खरं आहे. पण पावशेर ते अर्धाकिलोला आपल्या लोकल बाजारातला जो दर पडतो, त्यातच त्या एक किलो येतात आणि फ्रेश येतात.कोलिटी ला 1नंबर! पालेभाज्याही निम्म्या किंवा त्याहून कमी दरात मिळतात.शिवाय ताज्या! मसाला म्हणजे-कोथिंबीर,मिरच्या,आलं,लसूण,कडीपत्ता,लिंबू ,पुदिना हे तर तिप्पट चौपट स्वस्त मिळतं.