'तारे जमींन पर'!
सावधान: खालील मजकुरात कथानक उघड केलेले असण्याची शक्यता आहे.
आमिरखानचा 'तारे जमींन पर' नुकताच प्रदर्शित झालाय. मी चक्क हा चित्रपट नजीकच्या चित्रपटगृहात लागलीच जाऊन पाहिला! (एरवी चित्रपट प्रदर्शित होऊन, अनेक दिवस लोटून तो व्यवस्थित जुना झाल्यावर आणि तोपर्यंत चारी दिशांनी त्याच्याविषयीची मतं कानावर आदळल्यावर मग आरामात बघणार्यांपैकी मी एक!:)) पण 'तारे..' च्या आधीपासून झळकणार्या झलका हा चित्रपट लगेच पाहायचा निर्णय घ्यायला पुरेश्या ठरल्या!
मिसळपाव