Persephone :
Daughter of Demeter and Zeus. She is Greek Goddess of Spring and also the Queen of the Underworld. Her story is one of abduction, love, grief, and celebration.
===
ओसाड रस्ते, रिकामे मॉल, ग्राफिटी केलेल्या भिंती, तुरळक कुठेतरी दिसणारी, वारा घेत बसलेली एखाददुसरी व्यक्ती. अशा सुनसान गावातुन दोन लहान मुली स्केटिंग करत चालल्या आहेत. एक टॉमबॉईश आहे हॉटपॅन्ट-टीशर्ट, छोटेछोटे केस. दुसरी अगदी तिच्या उलट, नाजूक फुलासारखी, फिकट रंगाचा फ्रॉक, दोन बो वगैरे. ती विचारते "आपण घराबाहेर हुंदडत फिरतोय हे आईच्या लक्षात नाही ना येणार?".