Skip to main content

शिफारस

पुणे मिपाकट्टा सप्टेंबर २०२२ वृत्तांत: मिपाकट्टा संपन्न झाला

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 17/09/2022 या दिवशी प्रकाशित केले.
आज दिनांक : १७ सप्टेंबर, शनिवार रोजी सकाळी १० ते दु. २ च्या दरम्यान ठिकाण पाताळेश्वर लेणी, जंगली महाराज मंदिराशेजारी, जंगली महाराज रोड, शिवाजी नगर, पुणे - 411005 येथे अत्यंत उत्साहात साजरा झाला. एकूण सतरा (१७) मिपाकर, मिपा मालकांसहीत उपस्थित होते. त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.

पुस्तक परिचय: मनात -- भाग २ -- फ्रॉइड आणि मनोविश्लेषण

लेखक श्रीगणेशा यांनी रविवार, 04/09/2022 या दिवशी प्रकाशित केले.
---- वाचण्यापूर्वी: हा लेख "मनात" पुस्तकातील लिखाणावर आधारित असला, तरी, खरं म्हणजे वाचकांना "सिग्मंड फ्रॉइड" वाचायला प्रेरित करावं, म्हणून लिहिला आहे. आणि त्यासाठी "मनात" पुस्तकातून सुरुवात करायला हरकत नाही. लेखमालेतील याआधीचा लेख: पुस्तक परिचय: मनात -- भाग १ ----

मिपाकट्टा २०२२: पावसाळी भेट - मोहाडी

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 11/08/2022 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक १५ ऑगस्ट २०२२, सोमवार मिपाकट्टा - पावसाळी भेट मोहाडी, ता दिंडोरी, जिल्हा नाशिक येथे आयोजित केली आहे. अष्टबाहू गोपाळकृष्ण मंदीर (लाकडी बांधकाम. रंगकाम एक नंबर) गोसावी समाज साधू मंदीर नवनाथ मंदीर मोहाडेश्वर मंदीर अहिल्यादेवी बारव मोहाडमल्ल देवस्थान सोमवंशी वाडा ग्रामपंचायत कार्यालय सह्याद्री फार्म कारखाना भेट व तेथेच जेवण (जेवणाचा हेडकाऊंट आधीच सांगावा लागेल) परततांना नाशिक एअरपोर्ट पाहता येईल. तरी ज्यांना शक्य आहे त्यांनी सकाळी १० वाजेपर्यंत मोहाडी येथे जमावे. नाशिक सीबीएस सीबीएस वरून सीटीलींक बसने ( किंवा एसटी बसने) १०वा मैल स्टॉप. (ओझर, पिंपळगाव लोकल बस पकडा.

पुस्तक परिचय - कोकणच्या आख्यायिका

लेखक चिमी यांनी शुक्रवार, 29/07/2022 या दिवशी प्रकाशित केले.
कोकणच्या आख्यायिका हे अफाट भारी पुस्तक वाचून पूर्ण झाले. Arthur Crawford (हो, हा म्हणजे मुंबईचे क्रॉफर्ड मार्केट ज्याच्या नावावर आहे ना, तोच हा) मुंबईचा पहिला Municipal Commissioner .. याने आपल्या कोकणातल्या वास्तव्यामध्ये एका भटजीबुवांबरोबर मैत्री केली. या भटजीबुवांकडे एक पोथी-पुराणांचे बाड होते. या पोथ्यांमध्ये लिहिलेल्या होत्या कित्येक वर्षांपूर्वीच्या गोष्टी.

पुस्तक परिचय - काबुलीवाल्याची बंगाली बायको

लेखक चिमी यांनी बुधवार, 20/07/2022 या दिवशी प्रकाशित केले.
आता ऑफिस सुरु होणार म्हणून एकदा घरी जाऊन येऊ म्हणलं आणि गेले त्याच्या दुसऱ्याच दिवशी पाय खूप वाईट मुरगळला. आईच्या शब्दात “आल्या आल्या घेतलं का तंगडं मोडून?” तिची कामामुळे होणारी दगदग पाहून खूप वाईट वाटत होतं पण आता गप एका जागेवर बसून राहण्याशिवाय पर्याय नव्हता. घरी गेल्यावर मोबाईलला हातपण लावायचा नाही असा ठरवलं होतं पण एका जागी बसून दुसरं करणार तरी काय? म्हणून मग किंडलवर “काबुलीवाल्याची बंगाली बायको” वाचायला सुरु केलं. सुश्मिता बॅनर्जी यांनी लिहिलेल्या या मूळ बंगाली सत्यकथेचा मराठीमध्ये अनुवाद केला आहे मृणालिनी गडकरी यांनी.

हे पाहा: माय ऑक्टोपस टीचर

लेखक अनुस्वार यांनी गुरुवार, 09/06/2022 या दिवशी प्रकाशित केले.
कटाक्ष- नेटफ्लिक्स माहितीपट वेळ - ८५ मिनिटे भाषा- इंग्रजी ओळख- क्रेग फॉस्टर हा दक्षिण आफ्रिकेच्या किनाऱ्यावर राहणारा चित्रपट निर्माता 'माय ऑक्टोपस टीचर' या माहितीपटाचा निवेदक आणि ऑक्टोपस सोबत विभागून मुख्य पात्र आहे. अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावरच जडणघडण झालेली असल्यामुळे क्रेगसाठी समुद्र नवा नाही. स्वतःची चित्रपटांशी संबंधित कारकिर्द एका निराशेच्या कालखंडातून जात असताना क्रेगची पावले बालपण ज्या समुद्रात तासनतास डुंबत घालवले तिकडे वळतात.

हे वाचा: शेष प्रश्न

लेखक अनुस्वार यांनी मंगळवार, 15/03/2022 या दिवशी प्रकाशित केले.
कटाक्ष: भाषा- हिंदी (मूळ बंगाली) लेखक- शरच्चंद्र चट्टोपाध्याय प्रकाशन- डायमंड बुक्स प्रथमावृत्ती- १९३१ पृष्ठसंख्या- २०८ किंमत- ₹१५० ISBN : 978-81-7182-917-1 ओळख: कहाणीचा काळ स्वातंत्र्यपूर्व, वीसाव्या शतकाचा पूर्वार्ध. सगळे कथानक आग्र्यातल्या बंगाली वस्तीत घडते. आशु बाबु, अविनाश, हरेन्द्र, अक्षय आणि इतर ही बंगाली भद्र मंडळी. संस्कृतीचे पाईक आणि पूजक अशा या मंडळींची गाठ पडते कथेची नायिका कमल हिच्याशी (कथेला नायक नाही!). कमल आणि तिचा गायक पती शिवनाथ यांच्या विवाहाची वैधता ते कमलचे कुळ, जात इ.

हे वाचा: चित्रलेखा

लेखक अनुस्वार यांनी मंगळवार, 01/03/2022 या दिवशी प्रकाशित केले.
कटाक्ष: भाषा- हिंदी लेखक- भगवतीचरण वर्मा प्रकाशन- राजकमल प्रकाशन (द्वारा प्रथम प्रकाशित १९९३) प्रथमावृत्ती- १९३४ सध्याची आवृत्ती- २६ वी पृष्ठसंख्या- २०० किंमत- ₹२५० ISBN : 978-81-267-1585-5 ओळख: एका गुरूच्या दोन शिष्यांना 'पाप म्हणजे काय?' असा प्रश्न पडतो. त्याचे निराकरण करण्यासाठी त्यांचे गुरु एका शिष्याला योग्याकडे तर दुसऱ्याला ऐषोरामात आकंठ बुडालेल्या सरदाराच्या संगतीत राहण्याची आज्ञा देतात. या दोन शिष्यांसोबत जीवनाच्या दोन टोकांवर हिंदोळे खात वाचक जे अनुभव घेतो त्यांचा थरार 'गेम ऑफ थ्रोन्स'पेक्षा कमी वाटत नाही.

***हरिश्चंद्रगडावरचं खरेपणं***

लेखक लेखनवाला यांनी रविवार, 10/10/2021 या दिवशी प्रकाशित केले.
*******

मागच्या दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली पिकनिक यंदा हरिश्चंद्रगडाला जाऊन पूर्ण होणार होती. ही सगळी कामावर गट्टी जमलेली दोस्तीयारीतली माणसं. सगळ्यांचं एकत्र असं मागच्या कित्येक काळापासून भेटणं झालचं नव्हतं. पिकनिक कमी आणि ट्रेक जास्त होता.

प्रोपगंडा (Propaganda)

लेखक टर्मीनेटर यांनी शनिवार, 09/10/2021 या दिवशी प्रकाशित केले.
a {text-decoration:none;} body { font-family: 'Noto Sans', sans-serif; font-size: 16px; } .quoted {font-size: 16px;}

प्रोपगंडा (Propaganda)