मराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा : निकाल आणि स्पर्धकांची ओळख
लेखनविषय:
- Read more about मराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा : निकाल आणि स्पर्धकांची ओळख
- 53 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
नमस्कार मिपाकरहो,
मराठी भाषा दिन २०१९ च्या निमित्ताने मिपावर आयोजित केलेल्या
'शतशब्दकथा' या मिपावरील लोकप्रिय संकल्पनेवर आधारित स्पर्धेचं हे निकालपत्रक. अनेक उत्कृष्ठ कथा या निमित्ताने मिपावर वाचायला मिळाल्या. लेखक, वाचक दोघांचाही भरघोस प्रतिसाद या स्पर्धेला लाभला. आकडेवारीतच वर्णन करायचं म्हटलं तर एकूण ६३ कथा आणि १५००+ प्रतिसाद असं करता येईल.
पण आकड्यांच्या पलीकडे पाहिलं तर इतके विविध विषय लेखकांनी हाताळले, की वाचकांसाठी ही एक मेजवानीच होती.

