मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कविता माझी

.बनलेही असते राधा, मज कृष्ण भेटला नाही ..

प्राची अश्विनी ·
लेखनविषय:
काव्यरस
चहु दिशांत पसरे कीर्ती, जग तुझिया पायावरती पण अवखळ गोकुळवासी, मज कृष्ण भेटला नाही ....... किती काळ उलटला राधे ,नित नवीन दिसशी तूही ....... जरी रूप बदलले त्याचे, तो कृष्ण वेगळा नाही तो परतून आला तरीही, माझा ना उरला काही दमले मी शोधून त्याला , मज कृष्ण भेटला नाही ....... उमगता मोल नात्याचे गेलेला परतून येई ....... समजून तयाला घे तू , तो कृष्ण वेगळा नाही सर्वस्व वाहिले त्याला , काही ना बाकी उरले मी स्वत:स हरवून बसले , मज कृष्ण भेटला नाही .........इतुके न कुणाला द्यावे, की भार तयाचा व्हावा ........

कणा , हिंदी भावांतरण

कैलासवासी सोन्याबापु ·
लेखनविषय:
काव्यरस
कुसमग्रजांची "कणा" हिंदीत भावांतरित करायचा एक प्रयत्न केलाय, कसा वाटतो नक्की सांगा पहचाने क्या गुरूजी हमको?’ भिगत आये कोय, कपडे उसके कसमसायें, बालों में था तोय. एक क्षण बैठा फिर वो हँसता बोलत ऊपर देख, ‘गंगामैय्या आवत घरपे, अतिथी बने रहैक’. मैहर उसका पाते ही वो चहार दिवार में नाची, खाली हात जाती कैसे, गृहलक्ष्मी बस बची. दीवार टूटी, चूल्हा बुझा, ले गई चल अचल, प्रसादरूप अब तो है बस नैनन में थोडा जल. गृहलक्ष्मी को लेकर संग सर अब हम लढे है टूटी दिवार बांध रहे है, कीचड़ मिट्टी फांद रहे है. जेब में हात जाते देख हसतां हुआ सीधा खड़ा ‘पैसेवैसे नहियो चाही, बस अकेलासा लगा'. टूट पडा मोरा घर प

ती वेळ

सिध्दार्थ ·
लेखनविषय:
काव्यरस
ती वेळ मंद वाऱ्याची शब्द असे वितळावे दुरून परतीच्या माझ्या वाटेवर तुझे डोळे लागावे... तुझ्या नेत्रात सरोवरे का सखे दुष्काळ तिथे शोभे गडद अबोल सावळी झाडे सरणावर प्राण उगाच उभे.... ऊरला तुकडा नभाचा होते वादळ कधी तिथे मिटल्या सावल्या अंधाराच्या जसा सूर्य दूर मंद उगवे... अखंड घुमतो पाउस देवळापलीकडे नक्षत्रांची ओंजळ पदरात तुझ्या दु:खात तू सावित्री माझ्या अन तरी घालतेस देवास साकडे...

<विडंबनः नसतेच मिपा हे जेव्हा...>

एस ·
(मिपा बंद असताना मिपाला चरफडत खूप शिव्या दिल्या. अर्थात प्रेमाने! मग शनिवारी रात्री हे विडंबन सुचले आणि खफवर सोमवारी मिपा परत आल्यावर टाकले. तिथल्या आमच्या हितचिंतकांनी -कोण म्हणाले रे कंपू कंपू ते! - वा वा! वा वा! बोर्डावर पण टाकून बाकीच्यांनाही छळा, असे आम्हांस भरीला पाडल्याने - दू दू कुठले - खफवरच्या पुरात वाहून गेलेली आमची रचना महत्प्रयासाने वर काढली आणि इथे डकवायचे धारिष्ट्य करत आहे...

कळी

आनंदमयी ·
लेखनविषय:
काव्यरस
वसंत आला, नटली धरती, सुखे बहरल्या तरु-वेली पानांआडून अवघडलेली एक कळी का रुसलेली ? हर्ष बहरतो फुलांफुलांवर सुगंध उधळीत बेभान सतरंगी ही फूलपाखरे गाती गंधित मधुगान सोन सकाळी ह्या वेलींवर भृंग गुंफती सूर किती.. पानांवरती होवुन मोती दवबिंदू हे लखलखती देव उभ्या ह्या दिव्यत्वाला तेज अर्पितो सोनसळी, आणिक येथे बावरलेली झुरते का ही एक कळी?