मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ती वेळ

सिध्दार्थ · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
ती वेळ मंद वाऱ्याची शब्द असे वितळावे दुरून परतीच्या माझ्या वाटेवर तुझे डोळे लागावे... तुझ्या नेत्रात सरोवरे का सखे दुष्काळ तिथे शोभे गडद अबोल सावळी झाडे सरणावर प्राण उगाच उभे.... ऊरला तुकडा नभाचा होते वादळ कधी तिथे मिटल्या सावल्या अंधाराच्या जसा सूर्य दूर मंद उगवे... अखंड घुमतो पाउस देवळापलीकडे नक्षत्रांची ओंजळ पदरात तुझ्या दु:खात तू सावित्री माझ्या अन तरी घालतेस देवास साकडे...

वाचने 1135 वाचनखूण प्रतिक्रिया 1