Skip to main content

कविता माझी

एक कविता मनाची.......

लेखक मयुरMK यांनी रविवार, 22/11/2015 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
एक कविता मनाची एक कविता जनाची मना वाटते, राजा मी व्हावे जन म्हणती, तू रंकचि रहावे- एक कविता स्वप्नाची एक कविता सत्याची स्वप्न म्हणे, गगनात विहरावे सत्य म्हणे, कदर्मी तू कुजावे - एक कविता नात्याची एक कविता जातीची नाते म्हणे, आमचाच हां स्वकीय जात म्हणे, कोण हां परकीय- एक कविता प्रश्नाची एक कविता क्षणाची प्रश्न म्हणे,मी कधी संपणार नाही क्षण म्हणे, मी कधी थांबणार नाही- ही कविता जीवनाची ही कविता मरणाची जीवन म्हणे, ना मी कुणाची मालमत्ता मरण म्हणे, इथे तर आहे माझीच सत्ता -
काव्यरस

गॅलरी .....

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 21/11/2015 23:07 या दिवशी प्रकाशित केले.
एक हात कठड्यावर ठेऊन, अन दुसरा उगाच पाठीमागे घेऊन, मी उभा आहे गॅलरीत! तुझ्या झुलत्या अक्षरां बरोबर मन रमून गेले फार! इथेच बसून नाही का लावत तुझ्या शब्दांचे अत्तर मनाला! नाही.....वेडा नव्हतोच कधी समंजस होतो खूप म्हणून गॅलरी नाही ओलांडत आजही! मला नाही जमत लिहायला, तुझ्या अंत:करणापर्यंत पोहोचायला! इतकं जग पाहूनही प्रेमबीम पण नाही कळत मला! पण....तू तिथे कुस बदललीस कि इथे माझी झोपमोड होते, एवढेच बारीक जाणवते! अन, अवेळी उठून मी एक हात कठड्यावर ठेऊन उभा राहतो गॅलरीत कुणी हाक मारेपर्यंत.....!

मी तुझा

लेखक माहीराज यांनी बुधवार, 18/11/2015 21:14 या दिवशी प्रकाशित केले.
या नभातील तारका तू मी तुझा गं चांदवा सावली माझी जणू तू मी तुझ्यातील गारवा ।। रंग हे तारांगणीचे रंगले नयनी तुझ्या छंद माझे गंध होऊन दंगले स्वप्नी तुझ्या तू असे आकार माझा मी गुलाबी ही हवा सावली माझी जणू तू मी तुझ्यातील गारवा ।। अंतरीचे ते चिरंतर स्वप्न तु जे पाहीले तेच माझ्या या मनाच्या अंतरीही रंगले तुच सारी राञ माझी मी नशीला काजवा सावली माझी जणू तू मी तुझ्यातील गारवा ।।   
काव्यरस

शौ(चौ) र्यनिखारे

लेखक मोगा यांनी बुधवार, 11/11/2015 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
पुणेरी बाजीरावाने माझी कविता पळवली तेव्हां काव्यगुरु निकाळजे शनवार वाड्यावर गजला करत उभा होता बाजी बोलला जमवायचं कसं ? त्यावर तो शून्यात नजर लावून म्हणाला सगळंच विझलंय अगदी गझल कार्यशाळेचीही राख झाली आता मायबोली सर्चमधून तेच तेच जुने मतले काढून राजकारणाचे धागे पेटवण्याचा प्रयत्न करतो. ... मात्र उजवीकडून येणारा याकुबचा जनाजा म्हणाला भगविच्या , बघतोच तुला ! एव्हढ्य़ाचसाठी रोखून धरलेलं कधीचं एका काफियासाठी प्राण डोळ्यात आले असताना पन्नास हजार हिरवे कानात कुजबुजले तुझ्या सम्मेलनात इतकी माणसं जमतात का? मतले आणि काफिये फुकटात देइन उर्दू साहित्यातून. बाजी बोलला...

तिथली दिवाळी.....

लेखक शिव कन्या यांनी सोमवार, 09/11/2015 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
तिथली दिवाळी..... तीरकामठा रंगीत कागद चिखलमाती अर्धा किल्ला.... शिवाजीच्या मावळ्यांहाती, परत फराळ ठेवशील का? पहाट झोपेत हळूच उठवून घमघमणारी आंघोळ घालून, फुलबाजांची हजार फुले परत हातात ठेवशील का? रांगोळीतील हुकले ठिपके रेषांमधील नाजूक वळणे, तुळशीमाईचे लगीन लटके परत दणक्यात लावशील का? किणकिण बांगड्या काचेच्या घिरघीर झालरी पोरींच्या! सुरसूर बत्त्या, चुटक्या टिकल्या परत उडवण्या येशील का? तिथली दिवाळी धमाल मजा इथली दिवाळी शांत सजा!! आठवणींचे व्याकुळ दिवे परत घरी पोचतील का?

अस्तनीतले पत्रनिखारे

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी गुरुवार, 05/11/2015 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
याकुबने माझे पेपर चोरले त्याच वेळी कलामांना गाडले जात होते बातम्यांच्या ढिगात पुस्तकातल्या जॉर्ज बर्नार्ड शॉला मी विचारलं यांच्या लेखी कोण मोठा?
काव्यरस

नवकविता - ट्रॅफिक जॅम

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 05/11/2015 12:58 या दिवशी प्रकाशित केले.
नवकविता ब-याच वाचनात येतायत आजकाल. माझाही प्रयत्न. :D विडंबन वगैरे समजू नये. मनावर सततच्या होणा-या वारांमुळे अविरत चिघळत रहाणारी जी जखम आहे त्यातून स्त्रवलेलं हे काव्य आहे. प्लीज रिस्पेक्ट दॅट.

भय इथले संपत नाही.....

लेखक डॉ. एस. पी. दोरुगडे यांनी मंगळवार, 03/11/2015 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
कोरड्याठण्ण विहिरीच्या तळाशी- गर्द वडाच्या पारंब्याना लोंबकळते- पडक्या वाड्याच्या ची-याची-यांतून- काळ्याकपारीमध्ये दडलेले- काहीतरी...... जे आहे फार प्राचीन जे आहेदुष्ट क्रूर अन वखवखलेले ज्याचा आहे स्पर्श दाहक ज्याचा विचारही भिववणारा इथला आसमंत भारलेला इथे कशाचीतरी हुकुमत इथली शांताताही असहय इथले आवाज तसेच भयानक इथल्या सावल्या हलतात इथली झाडे कुजबुजतात इथले खडकही शहारतात सततचे नाट्य इथले थांबत नाही भय.....भय इथले संपत नाही.....

कवितेवर केलेली कविता

लेखक निलम बुचडे यांनी सोमवार, 02/11/2015 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
*****कविता***** कविता म्हणजे कवीजीवनाचे पहिले पान कविता म्हणजे कल्पनांचे सोनेरी रान कविता म्हणजे मनःचक्षूंचे प्रतिबींब कविता म्हणजे उगवणारे सूर्यबिंंब कविता म्हणजे हरवत जाणारी वाट कविता म्हणजे सुविचारांची पहाट कविता म्हणजे तृणातील इवले फूल कविता म्हणजे शब्दांची सोनेरी झूल कविता म्हणजे प्रतिभेचा मधुर मेवा कविता म्हणजे कवीचा अनमोल ठेवा... - निलम बुचडे.
काव्यरस

तुझ्याशिवाय...

लेखक निलम बुचडे यांनी रविवार, 01/11/2015 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
**तुझ्याशिवाय ** तुझ्याशिवाय , मन वेडे होऊनी झुलते, उगीच का भरकटते! स्वप्न-कळ्यांच्या उमलण्याची, वाट पाहत बसते!! सागरतीरी एकाकी, का उदास होऊनी बसते! खळखळणार्या लाटांच्या, नादामध्ये विरते!! स्वप्न असो वा सत्य, मन तुजपाशीच रमते! त्या ईश्वरचरणी रात्रंदिनी, तुझी कामना करते!! - निलम बुचडे.