लेख

शनिवारवाडा (भाग १) : इतिहास

सव्यसाची's picture
सव्यसाची in जनातलं, मनातलं
21 Feb 2013 - 8:37 am

काही वर्षांपूर्वी ग.ह.खरे लिखित 'शनिवारवाडा' हे पुस्तक वाचनात आले. शनिवारवाड्याची कादंबऱ्यांमधून केलेली वर्णने त्या लेखकांनी कुठून मिळवली हा एक प्रश्न मला सतावत होता. या प्रश्नाचे उत्तर पुस्तकातून मिळाले. ग.ह.खरे यांनी पेशवे दफ्तरातील सात रुमाल वाचून शनिवारवाड्यावरील हे पुस्तक तयार केले होते. त्यांच्यानुसार हे काम अजूनही पूर्ण झालेले नाही. या पुस्तकात इतिहास आणि अवशेष वर्णन यांचा समावेश आहे. शनिवारवाड्याचा प्लानचे छायाचित्र जर मिळाले तर अवशेषवर्णन ही आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन.

इतिहासराहती जागालेखमाहिती

भारतीय लोकशाही, ६५ च युद्ध, कारगिल आणि शत्रूचा पण पॉइण्ट ऑफ व्ह्यू

पिंपातला उंदीर's picture
पिंपातला उंदीर in काथ्याकूट
20 Feb 2013 - 4:09 pm

पिलू मोदी हे नाव आज कुणाच्या फारस स्मरणात नाही. पण पेशाने स्थापत्य विशारद असणार्‍या या अष्टपैलु माणसाने भारतीय राजकारणावर पण काही काळ आपला ठसा उमटवला होता. पिलू मोदी हे त्यांचे समकालीन राजकारणी व तत्कालीन पाकिस्तानी बडे प्रस्थ झुल्फीकार अली भुट्टो यांचे जवळचे मित्र होते. त्यानी कॉलेज मध्ये एक्त्रच प्रवेश घेतला होता इतकेच नव्हे तर ते रूम मेट्स म्हणून पण एकत्र राहीले होते. अशा या त्यांच्या घनिष्ट मित्राला जनरल ज़ीया यानी लष्करी उठाव करून तुरुंगात टाकले व स्वताहा त्या देशाचे सर्वेसर्वा बनले. लष्करी हुकुमशाहाना कायम च जनाधार असणार्‍या नेत्याचे भय असते.

युद्धकथा -६ न पुसला जाणारा कलंक! (१)

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
19 Feb 2013 - 2:00 pm

न पुसला जाणारा कलंक!
१९३९-१९४५
गॅसचेंबरकडे..............
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

हे ठिकाणलेखमाहिती

शिवजयंती विशेष लेख - शिवकालीन शस्त्रभांडार

मालोजीराव's picture
मालोजीराव in जनातलं, मनातलं
17 Feb 2013 - 3:45 am

शिवकाळामध्ये शस्त्रांचे महत्व असामान्य होतं. शिवराय आणि संभाजी राजांनी दारुगोळा कोठारे आणि शस्त्र निर्मिती कारखाने उभारले...मोगल,आदिलशहा हे उच्च प्रतीचा दारुगोळा मिळवण्यासाठी इंग्रज,पोर्तुगीज,डच यांच्यावर अवलंबून होते,ती वेळ येऊ नये म्हणून वेळीच दूरदृष्टी दोन्ही छत्रपतींनी दाखवली.पायदळ,घोडदळ,आरमार यांच्यासाठी वेगवेगळी शस्त्रे निर्मिली गेली किंवा त्यात बदल केले गेले.

इतिहासछायाचित्रणप्रकटनविचारलेखमाहिती

प्रेम दुसरं काय...!!!

उर्जिता's picture
उर्जिता in जनातलं, मनातलं
14 Feb 2013 - 8:25 pm

yes..! माझं प्रेम आहे..! म्हणजे माझं, प्रेम या कल्पनेवर आणि सतत प्रेमाच्याच प्रेमात पडुन आयुष्यभर प्रेमात डुंबुन राहण्यावर प्रेम आहे.प्रेम हे खरंतर नकळत ,आणि अगदी क्षणार्धापेक्षा कमी वेळामधे घडून जाणारं, आणि नंतर खोल खोल रुजत जाऊन प्रत्येक क्षण भारवून टाकणारं कोडं. त्याला कोडं म्हणा किंवा गणित(गणिताईतकी नीरस उपमा का देतात देव जाणे..! )ते सोडवण्यापेक्षा त्याच्या हातात हात घालून आयुष्यभर त्याच्या धुंदीत जगण्याईतकं सूख कशातच नाही.

साहित्यिकलेख

ट्रोजन युद्ध भाग २.१- इलियड: बहिरंगपरीक्षण आणि संक्षिप्त कथा.

बॅटमॅन's picture
बॅटमॅन in जनातलं, मनातलं
14 Feb 2013 - 12:34 am

ट्रोजन युद्ध पहिला भाग.

ट्रॉयच्या मोहिमेला निघाल्यावर ८ वर्षे भरकटण्यात आणि त्यानंतरची ९ वर्षे इतर चकमकींत गेल्यावर मग लोक जागे झाले. तद्वतच पहिल्या आणि दुसर्‍या लेखात लै अंतर आहे, पण इथून पुढचे लेख जरा लौकर येतील हे नक्की. :)

इलियडच्या आधीची अतिसंक्षिप्त पूर्वपीठिका:

इतिहासलेख

आणखी एक टायटॅनिक

लॉरी टांगटूंगकर's picture
लॉरी टांगटूंगकर in जनातलं, मनातलं
12 Feb 2013 - 11:15 am

मागच्या वर्षीची गोष्ट आहे, जानेवारीचा दुसरा पंधरवडा.. मुळचा मुंबईचा रहिवासी असलेला केविन रिबेलो समुद्रात अर्धवट बुडालेल्या अजस्त्र धुडाकडे आशेने बघत बसला होता...कोणत्याही क्षणी रेस्क्यू टीम आपल्या भावाला , रसेल ला घेऊन येईल या आशेत गेला आठवडा तसाच काढला होता.”या क्रुझ असाइनमेंट मधून चांगले पैसे मिळतील, थोड्याच वेळचा प्रश्न आहे” असे त्याच्या भावाचे क्रुझवर जाण्याच्या आधीचे शब्द त्याला आठवत असावेत...रेस्क्यू टीमला आता कोणी जिवंत असण्याची शक्यता वाटत नव्हती...

भूगोलदेशांतरविज्ञानमौजमजालेखमतमाहिती

अखेर मला यावच लागल!

सुपरमॅन's picture
सुपरमॅन in काथ्याकूट
11 Feb 2013 - 11:22 pm

नमस्कार मिसळपावकर!

मी तसा जुनाच फक्त चोरुन चोरुन सगळयान्चे लेख वाचायचो :)

पण आता दमलो क्रमश: क्रमश: वाचुन..पुढचे भाग येतच नहीत राव :( मग म्हणल खबर घेऊ आता क्रमश: करुन पुढचे भाग न टाकनार्या मिसळपावकरान्ची.. :)

तसे भ्ररपुर लेख वाचलेत मिसळपावचे मेम्बर नसताना..

स्पा च्या भन्नाट थरारक "ते" मधे "ते-६" नन्तर क्रमश: असुन पुढचे भाग आलेच नहित..थोडी निराशा झाली पण असो..

सुबोध खरे चा नवीन "४८ तास" वाचला, एकदम झकास आहे!

किसन शिंदे, टारझन चे काहि लई भारि लेख वाचले होते(शिर्षक आठवत नाही त्याबदद्ल दिलगीरी)

रंगरेखा कलेचे-( Graphics) चे जग असते कसे ?

चौकटराजा's picture
चौकटराजा in जनातलं, मनातलं
10 Feb 2013 - 7:14 pm

मानवी देहाला पांच संवेदना इंद्रिये आहेत त्यात त्चचेखालोखाल डोळा हे महत्वाचे संवेदना इंद्रिय आहे. कारण याने पाठविलेले संदेश ग्रहण मेंदूने करून बर्‍याच गोष्टीचे आकलन आपल्याला होत असते. डोळया पेक्षा त्चचेचे स्थान महत्वाचे असायचे कारण परिसराची अधिक महत्वाची माहिती उदा. तापमान त्वचा करून देते हे होय. ज्ञानासाठी मात्र डोळयाचे महत्व अनन्य असे आहे.

मांडणीकलातंत्रमौजमजाछायाचित्रणरेखाटनस्थिरचित्रआस्वादमाध्यमवेधलेखअनुभवमाहिती

हे' शास्त्रीय संगीत ' हाय तरी काय राव ? भाग ३

चौकटराजा's picture
चौकटराजा in जनातलं, मनातलं
9 Feb 2013 - 3:35 pm

भारत देशात अभिजात संगीताच्या दोन शैली प्रामुख्याने आढळतात. त्यात हिन्दुस्थानी शैली व कर्नाटक शैली असे दोन प्रकार आहेत.वापरले जाणारे ताल, साथीसंगतीची वाद्ये व सादरीकरण ( यात आवाजाचा लगाव,. तान क्रिया ई चा समावेश ) यात मूलभूत फरक आहे. रागांचे वर्गीकरण करण्याचीही पद्धत वेगवेगळी आहे. पण या गुंतागुन्तीच्या विषयात आपल्याला शिरायचे नाही.कारण ऐकले तर आवडते पण का आवडते हे समजत नाही अशी अवस्था असलेल्या रसिकाला समोर ठेवून ही मालिका लिहिली जात आहे.

मांडणीकलासंगीतआस्वादलेखमाहिती