विराट कोहली: फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज पर्मनंट
यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई आणि चेन्नई संघांच्या अपयशानंतर सर्वात जास्त चर्चा झाली ती म्हणजे विराट कोहलीच्या फॉर्मची ...२०२२ च्या आयपीएल मध्ये कोहली पहिल्या १३ सामन्यांमध्ये ५ वेळा १० पेक्षा कमी धावा काढून बाद झाला, ३ सामन्यात तर तो पहिल्याच चेंडूवर एकही धाव न काढता पॅव्हेलियन मध्ये परतला. तेरा सामन्यांत त्याने १९.६७ च्या सरासरीने २३६ धावा काढल्या. यादरम्यान तो एकदाच अर्धशतकी पल्ला गाठू शकला. हे सर्व आकडे विराट कोहलीने गेल्या १०-१२ वर्षात जे काही पराक्रम केलेत त्यापुढे एकदम तुच्छ वाटत होते. माजी खेळाडू, क्रीडा पत्रकार, क्रिकेटप्रेमी असे सर्वचजण कोहलीला विश्रांतीचा सल्ला देत होते.