मतदान पध्दत

NiluMP's picture
NiluMP in काथ्याकूट
26 Feb 2013 - 1:56 pm
गाभा: 

देशाचे प्रतिनिधित्व राजकारनी करतात हे मान्य पण मतदान करून नेता निवडून देणे ही पध्दत चुक की बरोबर.

माझया मते चुक आहे कारण

१ मतदान पध्दतीमुळे व्होटबॅंक ही समस्या निर्माण झाली
२ व्होटबॅंकमुळे शहरे बकाल झाली आणि अनैतिक धंदे वाढले
३ अनअधिकृत बांधकामे वाढून भ्रष्टाचार वाढला
४ राजकीय घराणेशाही जोर धरू लागली
५ कायदा आणि सुव्यवस्था हतबल झाली

तसेच, टिव्हीवरील रिअल्टी शो आणि मतदान यातील फरक

टिव्हीवरील रिअल्टी शोमध्ये आपण
प्रथम परर्फामन्स पाहतो आणि मग मतदान करतो
आणि मतदान प्रक्रियेत आपण प्रथम मतदान करतो
जेथे परर्फामन्सची काहीच गॅंरंटी नसते

तुम्हाला काय वाटते?

प्रतिक्रिया

नानबा's picture

26 Feb 2013 - 3:53 pm | नानबा

बरं ब्वॉ... मग आपण काय सुधारणा सुचवता?

मित्रा, राजकरण हा माझा प्रांत नाही आहे रे. आणि मी कोण पामर सुधारणा सुचवणारा. तरीही.

http://mr.upakram.org/node/3906

कदाचित तु हे वाचलं असशील.

मिपावर बरेच जाणकार आणि अभ्यासू सभासद आहेत त्यांनी यावर आपले मत नोदवावे. (च्यायला मतदानाला विरोध करतो आणि येथे मीच मत मागतो आहे)

परिकथेतील राजकुमार's picture

26 Feb 2013 - 4:51 pm | परिकथेतील राजकुमार

तरी मी विचार करतोय हा धागा का काढला असावा...

ज्ञानात थोडी भर पडावी आणि झालच तर परिवर्तनाची सुरूवात करावी या हेतुने.

परिकथेतील राजकुमार's picture

26 Feb 2013 - 5:07 pm | परिकथेतील राजकुमार

कसले ज्ञान आणि कुठले मतपरिवर्तन ?

सविस्तर माहिती घ्यायला आवडेल.

दुष्परिणांम सांगीतलेत, उत्तम.
आता चार उपायही सुचवा म्हणजे आमच्या ज्ञानात तेवढीच भर. :)

:)
चार म्हंजे लै झाले वो.. थोडं क्न्सेशन द्या त्यांना ;)
एखादा उपाय सुचवला तरी चालेल.. काय?

एम.जी.'s picture

26 Feb 2013 - 4:02 pm | एम.जी.

भयानक आहे हे सगळं...

आपली अवस्था चक्रव्युहात अडकलेल्या अभिमन्यु सारखी झाली आहे.

हा ना तेच्यायला हुकूमशाही बेष्ट बगा भारताला. सगळे साले सुत्तागत सरळ येतीन. हाकानाका.

NiluMP's picture

26 Feb 2013 - 4:35 pm | NiluMP

नको रे हुकुमशाही नको बाटया. पण त्याचावर Accountability असावी एवढी साधी अपेक्षा आहे.

आपल्याला कस कामात चुक केली की Demotion अशी काहीना काही सजा मिळते आणि हे घोटाळे करून नवा घोटाळा करयाला मोकळे.

नको रे हुकुमशाही नको बाटया.

शुद्धलेखन सुधार की मित्रा. मी बाट्या ऊर्फ बाटलेला आहे का आँ?

Sorry. मी तुझी क्षमा मागतो माझया चुकीबददल.

माझी क्षमा कोण रे? नै म्हटलं मलापण कळू दे =)) असो.

NiluMP's picture

27 Feb 2013 - 3:57 pm | NiluMP

आणि हो हुकुमशाही आली तर असे लेख लिहिणा-यावर आणि त्यावर असे प्रतिसाद देणा-यावर गुन्हा नोदवून त्यांना उलटा टांगून मिर्चाची धुरी देतील ना.
तुझ ठिक आहे तु बॅटमन आहेस तुला उलटा लटकण्याची सवय आहे रे पण आम्हाला नाही ना (हवघे)

NiluMP's picture

27 Feb 2013 - 3:59 pm | NiluMP

आणि हो हुकुमशाही आली तर असे लेख लिहिणा-यावर आणि त्यावर असे प्रतिसाद देणा-यावर गुन्हा नोदवून त्यांना उलटा टांगून मिर्चाची धुरी देतील ना.
तुझ ठिक आहे तु बॅटमॅन आहेस तुला उलटा लटकण्याची सवय आहे रे पण आम्हाला नाही ना (हवघे)

कार्टूनचा अभ्यास वाढव की रे. वटवाघूळ हा प्राणी उलटा लटकतो पण सुपरहीरोमध्ये मात्र स्पायडरमॅन उलटा लटकतो, बॅटमॅनकडे स्वतःचे डोके वगळता अन्य सुपरपॉवर नाही. :)

श्री गावसेना प्रमुख's picture

26 Feb 2013 - 4:26 pm | श्री गावसेना प्रमुख

आतापर्यंत सगळे राजकारणी माकडउड्या मारायाचे आता नाचुन परफॉर्मंस दाखवतील

NiluMP's picture

26 Feb 2013 - 4:36 pm | NiluMP

हा हा हा

ऋषिकेश's picture

26 Feb 2013 - 4:59 pm | ऋषिकेश

जर तुम्हाला तुमचा नेत निवडता येत नसेल तर स्वतः निवडाणूकीला उभे राहणे किंवा मतदान न करणे असे दोन्ही पर्याय तुम्हाला उपलब्ध आहेत. बहुमताची निवड चुकल्यास दर पाच वर्षांनी तुम्ही त्या व्यक्तीला परत बोलवु शकताच...
मग प्रॉब्लेम काय आहे?

NiluMP's picture

26 Feb 2013 - 5:23 pm | NiluMP

प्रॉब्लेम वर दिलेत की राव, अस काय करता.

राहील निवडणूक लढवण्याबददल आणि मतदानाबददल तर तिकडे कोण का निवडूण येउदा माझया आयुष्यावर त्याचा प्रत्यक्ष काहीच फरक पडत नाही मी दोन टाईम मस्त खावून 'पिउन' राहतो पण अप्रत्यक्षरित्या बरेच फरक पडतात कारण पाॅलिसीच (L. I. C नव्हे) हेच लोक बनवतात.

वर जे दिलंय त्याचा आणि मतदान पद्धतीचा संबंध समजला नाही.. म्हणून तर विचारलं प्रॉब्लेम काय आहे?

कोण का निवडूण येउदा माझया आयुष्यावर त्याचा प्रत्यक्ष काहीच फरक पडत नाही

अप्रत्यक्षरित्या बरेच फरक पडतात

राव तुमचा पार बेंबट्या झाला आहे. ;)

मी दोन टाईम मस्त खावून 'पिउन' राहतो

हांगआश्शी.. येवढे सुखात असताना कश्याला वांझोट्या चर्चांवर वेळ दवडताय.
मस्त २ टाईम खा-प्या. लोकांले बी सुखान राहुंद्या. :)

NiluMP's picture

27 Feb 2013 - 3:54 pm | NiluMP

तुमची मुलगी जस बालसुलभ प्रश्न विचारून तुम्हाला अडचणीत टाकते ना तस माझ बालसुलभ मन मला काही प्रश्न विचारत म्हणून हा खटाटोप.

का? मतदान करायच्या वेळी पक्ष कार्यकर्ते दादा/अण्णा/भाउंनी केलेल्या कामाची यादी वाचून दाखवतात की घसा फोडून तुम्हाला आणि ताई,माई,अक्कांना.

हो सांगतात ना, पण त्यांचा भुतकाळातील कामाबददल आणि त्यांनी भुतकाळात काय दिवे लावलेत ते पाहून आम्ही नवीन उमेदवाराला निवडून आणू म्हणतो पण तो काय दिवे लावणार याची शाश्वती नसते ना

मिळाले आहेत कि? इथे एव्हढा अतिखोल विचार करणारे भेटणे मुश्किल आहे.

नाना चेंगट's picture

26 Feb 2013 - 6:09 pm | नाना चेंगट

सहमत आहे. संकेतस्थळाला जसा मालक असतो आणि तो संपादक अथवा सल्लागारांची नेमणूक करतो तसा देशाचा एक मालक बनवावा आणि त्याच्यावर निवडीची प्रकिया सोपवून द्यावी. हाकानाका

यसवायजी's picture

26 Feb 2013 - 6:28 pm | यसवायजी

>>देशाचा एक मालक बनवावा >>
हा मालक कसा बनवायचा? (निवडायचा?)
मतदान करुन? :)

परिकथेतील राजकुमार's picture

26 Feb 2013 - 6:32 pm | परिकथेतील राजकुमार

हा मालक कसा बनवायचा? (निवडायचा?)

चार पाच अनिवासी ह्या देशाचा मालक बनण्याचे प्रयत्न करत आहेत अशी अफवा उठवून द्यायची. मग ज्यांच्या शब्दाला मान आहे, ज्यांना 'जेष्ठ' वैग्रे म्हणवले जाते अशी मंडळी हस्तक्षेप करून कोणा एकाला मालक बनवून टाकतात.

नाना चेंगट's picture

26 Feb 2013 - 6:36 pm | नाना चेंगट

हा हा हा अनिवाशांना तसेही जमिनी घेऊन प्लॉट पाडून विकण्यात लै विंट्रेस्ट असतोच... अनेकांनी तिकडून प्लॉट मिळवून देत असे सांगून लै पैसे गोळा करुन ठेंगा दिल्याची बातमी आहे आतल्या गोटातली ;)

चला हरीदास मुळ पदावर आले पुन्हा.
:)

नाना चेंगट's picture

26 Feb 2013 - 10:33 pm | नाना चेंगट

अरेच्या तुम्ही का "ते" ? ;)