क्रीडा

आनंद - कार्लसन - डाव २

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
10 Nov 2013 - 3:29 pm

माफ करा मंडळी, यायला उशीर झाला. आज झोपेनं दगा दिला आणि वाजलेल्या गजरावर मात केली!
असो डावाकडे वळतो.

बाप रे यावेळी डावाने केवळ १५ मिनिटात भन्नाट प्रगती केली आहे. कार्लसनने भलतीच तयारी केली आहे, त्याच्या घड्याळात १४ खेळ्यांसाठी केवळ ६ मिनिटे झाली आहेत!

समाजक्रीडाआस्वाद

आनंद - कार्लसन सामना - डाव १

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
9 Nov 2013 - 2:59 pm

शनिवार, दि, ९ नोवेंबर २०१३
आज बुद्धीबळ विश्वविजेतेपदाचा पहिला सामना सुरु होतोय. प्रचंड प्रसिद्धी मिळालेल्या या शतकातल्या सामन्याला सुरुवात होते आहे. चला आस्वाद घेऊयात!

कार्लसन येऊन बसलाय आनंद अजून आलेला नाही. एकच मिनिट राहिलं आहे. कार्लसन कोणती मूव खेळणार?
प्रत्येक डावात वेगळी पहिली मूव खेळण्यासाठी तो प्रसिद्ध आहे!

समाजक्रीडाआस्वाद

देवासाठी काय करावे बरे

देशपांडे विनायक's picture
देशपांडे विनायक in जनातलं, मनातलं
28 Oct 2013 - 8:46 am

सचिन तेंडूलकर शेवटच्या रणजी सामन्यात ५ वर त्रिफळा चीत झाले
डॉन ब्राड्मन शेवटच्या सामन्यात ० वर बाद झाले
सचिनचा प्रवास त्या दिशेने चालू झाला असे वाटू लागले म्हणून विचारतो कि या देवासाठी भक्तगण तर भरपूर आहे पण त्यांची प्रार्थना त्याला शेवटच्या सामन्यात १०० धावा करून देईल का ?
हा प्रश्न पडण्याचे कारण सचिनने काढलेल्या प्रत्येक धावेकारता त्याच्याबरोबर खेळपट्टीवर कुणालातरी थांबावे लागे हे विसरले जातेय !!
हे विसरणे म्हणजे हा सांघिक खेळ आहे हे विसरणे !!!
संघ जिंकतो किव्हा हारतो खेळाडू नव्हे !

क्रीडाशुभेच्छा

बॉम्बे डक - आगरकर निवृत्त!

फारएन्ड's picture
फारएन्ड in जनातलं, मनातलं
21 Oct 2013 - 11:41 am

२००३ मधली ब्रिस्बेन कसोटी. भारताचा स्कोर ऑस्ट्रेलियाच्या स्कोरच्या पुढे नेऊन व स्वतः शतक मारून दादा नुकताच आउट झालेला. आगरकर खेळायला आला. मग एक दोन बॉल्स नंतर एक रन काढला आणि जणू शतक मारल्यासारखे बॅट उंचावून सर्वांना दाखवली. स्वतःच्याच अपयशाबद्दल इतक्या सहजतेने सेन्स ऑफ ह्यूमर दाखवणारा खेळाडू क्वचितच कोणी असेल. येथे बॅट दाखवण्याचे कारण म्हणजे त्यापूर्वीच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात अजित आगरकर त्यांच्या विरूद्ध सलग ७ वेळा शून्यावर आउट झाला होता. त्यातील चार वेळा 'गोल्डन डक' म्हणजे पहिल्याच बॉलवर! तेथेच त्याला 'बॉम्बे डक' नाव पडले.

क्रीडाबातमी

दि मद्रास टायगर वर्सेस दि मोझार्ट ऑफ चेस

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
21 Oct 2013 - 11:34 am

जगातल्या तमाम बुद्धीबळ वेड्यांची दिवाळी यावर्षी सुरु होणार आहे तारीख ९ नोव्हेंबर २०१३, हॉटेल हाएट रीजन्सी, चेन्नैला!

1
६४ घरांच्या साम्राज्याचं विजेतेपद पाचव्यांदा राखण्यासाठी सज्ज असलेल्या आपल्या लाडक्या विशीला भिडतोय मॅग्नुस कार्लसन!

क्रीडालेख

( चला नांगरूया शेत सारे )

मोदक's picture
मोदक in जे न देखे रवी...
15 Oct 2013 - 3:49 pm

आमचे लाडके लोककवी हभप श्री धनाजीराव यांच्या काव्यजीवनातील चरणकमलांचे तंतोतंत अनुकरण करण्याच्या आमच्या छोट्या प्रयत्नांचे हे पुढचे पाऊल.

चल परत नव्याने सुरू करू सारे या काव्यातून पेरणीचा मनोदय व्यक्त करणार्‍या धनाजीरावांनी नांगरणीवर काहीच भाष्य केले नसल्याने धनाजीरावांच्या गोधडीला ठिगळ लावण्याचा हा प्रयत्न गोड मानून घ्यावा..

***************************************************

अभय-काव्यकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडबालसाहित्यभूछत्रीवाङ्मयशेतीभयानकबालगीतविडंबनव्युत्पत्तीसमाजजीवनमानतंत्रक्रीडाशिक्षणमौजमजा

आमचे असतील लाडके (सच्याची २००वी कसोटी)

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
4 Sep 2013 - 11:21 am

फार फार वर्षांपूर्वीची (पूर्णपणे काल्पनिक) गोष्ट बरंका. तेव्हा ना पृथ्वीवर कोणीच राजा नव्हता. लोकं आपाआपली कामं जबाबदारीनी करायची. सचोटी, प्रामाणिकपणा, नीतिमत्ता वगैरे प्रकार तेव्हा खरोखरच अस्तित्वात होते. पण अर्थातच हे सगळं फार दिवस टिकलं नाही. लोकं षड्रिपूंच्या आहारी जाऊ लागली. खोटं बोलू लागली, एकमेकांचा द्वेष करू लागली, चोर्‍या मार्‍या करू लागली... म्हणजे थोडक्यात "वाईट" वागू लागली. आणि तेव्हा अर्थातच माणसांचं देवांशी डायरेक्ट कनेक्शन होतं. म्हणून मग काही जाणते नेणते लोक सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले "हे चतुरानन, तुझीच ही लेकरं आता अधर्माचरण करत आहेत.

समाजजीवनमानक्रीडाचित्रपटप्रकटनशुभेच्छाबातमीमत

कपिल व गांगुलीने निवडलेले एकदिवसीय क्रिकेटचे भारताचे सर्वकालीन सर्वोत्तम संघ

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in जनातलं, मनातलं
17 Aug 2013 - 11:25 pm

भारताचा महान अष्टपैलू खेळाडू कपिलदेव याने नुकताच त्याच्या मतानुसार एक-दिवसीय क्रिकेटमधील भारतातील सर्वकालीन सर्वोत्तम १२ खेळाडूंचा संघ निवडला. त्याच्या सर्वकालीन सर्वोत्तम एकदिवसीय संघात खालील खेळाडू आहेत.

धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक), सचिन, सेहवाग, गांगुली, कोहली, अझरूद्दीन, युवराज सिंग, झहीर खान, श्रीनाथ, हरभजन, कुंबळे, रविंद्र जडेजा (१२ वा खेळाडू)

त्याच्यापाठोपाठ गांगुलीने देखील स्वत:च्या मताने भारताचा सर्वकालीन सर्वोत्कृष्ट एकदिवसीय संघ निवडला. गांगुलीच्या संघात खालील खेळाडू आहेत.

क्रीडालेख