मुक्तक
मध्य वयातील वादळ
प्रेषक, सुबोध खरे, Thu, 09/05/2013 - 01:12वाद-संवाद
प्रेषक, बहुगुणी, Wed, 08/05/2013 - 09:15मला उशीर झाला होता. माझी पत्नी एलीनॉर आणि मी सात वाजता रेस्टॉरंट मध्ये भेटणार होतो, पण मला चांगले साडेसात होऊन गेले होते. मला उशीर व्हायला क्लायेंटबरोबरची मीटिंग खूप वेळ चालण्याचं कारण झालं होतं. मी धावतपळत पोहोचलो आणि एलिनॉरला माझ्या उशीरा येण्याचं कारण सांगून टाकून 'सॉरी' म्हणून मोकळा झालो,
"अगं खरं तर उशीर करण्याचा माझा मुळीच हेतू नव्हता."
"तुझा हेतू कधीच नसतो रे!"
अरे बापरे! बाईसाहेब घुश्शात होत्या तर…
"अगं सॉरी म्हंटलं ना, पण मला खरंच ती मीटिंग अर्धवट सोडून येणं अशक्य होतं!"
कोकणस्थ सिनेमाची थोडक्यात गोष्ट...
प्रेषक, भडकमकर मास्तर, Tue, 07/05/2013 - 17:14गोखले नावाचा बॅंकेतला एक अधिकारी असतो. तो स्वेच्छानिवृत्ती स्वीकारतो. त्याच्या निरोपसमारंभात त्याचे गुणवर्णन चालू आहे. त्याच्या हाताखालचा अधिकारी साहेबांनी आम्हाला अमुक शिकवलं, ढमुक शिकवलं , साहेब मोठ्ठे गुणी, " एड्युकेटेड लॉ अबायडिंग पीस लविंग सोशली स्टेबल नो नॉनसेन्स "हे सगळं दीड मिन्टाच्या भाषणात जाणवेल असं.. वेळ असला तर प्रत्येक गुण दर्शवणारे ब्यांकेतले प्रसंग.. प्रेक्षकांत त्याची बायको. ती शाळेत अर्थातच शिक्षिका असते. " एड्युकेटेड लॉ अबायडिंग पीस लविंग सोशली स्टेबल नो नॉनसेन्स " असतेच कारण तीही कोकणस्थ. वेळ असला तर प्रत्येक गुण दर्शवणारे तिच्या शाळेतले प्रसंग...
<ये दिल मांगे मिनिमल!>
प्रेषक, प्यारे१, Tue, 07/05/2013 - 15:18रामराम मिपाकरहो,
साचा तयार होता. शब्द बदलले. बघा जमलंय का?
---------------------------------------------------------------------
जा ना घरी सत्तापिपासू नेत्या. जा..!
माझे करोडो नागरीक वाट बघतायत..
त्या खर्या लोकशाहीची जी वर काढेल मला हजारो समस्यांतून..
भिरकावून टाकेल आडवं येणारांना करारी निर्णयांनी
झेलेल आव्हानं अल्लद अनेक हातानी...
आणि मी म्हणेन तिला तूच बनून रहा सत्ताधीश आता...!
मी वाट बघते त्या लोकशाहीची, जी करेल मोकळे जनतेचे घुसमटलेले श्वास
आणि नेईल मला प्रगतीच्या उंच शिखरावर..
पौरुषाला आव्हान...!
प्रेषक, विसोबा खेचर, Mon, 06/05/2013 - 20:49राम राम मिपाकरहो,
आपले एक आदरणीय सभासद आणि माझे ज्येष्ठ स्नेही श्री रामदास.. अर्थात, मिपाकर रामदास..
फार पाल्हाळ लावत नाही.. पण एकच सांगतो की हा एक अफाट प्रतिभा असलेला परंतु तेवढाच अगम्य माणूस आहे.. त्यांचा माझ्यावर लोभ आहे, आमचा दोस्ताना आहे हे खरं तर माझं भाग्य..
परंतु आपले हे रामदासबुवा तसे थोडे दूर दूर राहणारे, वाटल्यास थोडे बुजरे म्हणुया..
त्यांनी एक अप्रतिम मुक्तक लिहिलं आहे..आणि आज त्यांनी मला ते सहजच दाखवलं.. परंतु का माहित नाही, रामदासबुवांना ते मिपावर टाकणं तेवढंसं प्रशस्त वाटेना..
झुळुक
प्रेषक, ज्ञानोबाचे पैजार, Sun, 05/05/2013 - 15:26मे महिना. डोक्यावर आग ओकणारा सुर्य. रणरणते उन आणि दमट हवा. मुंबई मधला उन्हाळा म्हणजे, प्रचंड घाम आणि चिकचीकाट. तशात लोकलच्या सेकंड क्लास मधुन प्रवास करायची मजबुरी. म्हणजे फस्ट क्लास काही फार सुसह्य असतो असे नाही, फक्त तिकडे सेंट मिश्रीत घामाचा दर्प येतो आणि लोक रुमाला ऐवजी टायने घाम पुसत असतात.
विक्रांत वरील आयुष्य २
प्रेषक, सुबोध खरे, Sun, 05/05/2013 - 01:08हो, मीच ती... एक सिगारेट पिणारी मुलगी..!
प्रेषक, तुमचा अभिषेक, Sat, 04/05/2013 - 16:40-----------------------------------------------------------------------------
एक सिगारेट पिणारी मुलगी - http://misalpav.com/node/24641
-----------------------------------------------------------------------------
हो, मीच ती... एक सिगारेट पिणारी मुलगी..!
आज तो दिसला, तब्बल तीन साडेतीन वर्षांनी ..
व्हेइकल
प्रेषक, अर्धवट, Sat, 04/05/2013 - 12:50एसीचा एकसुरी आवाज, आणि हॉटेलच्या खोलीचा पिवळा पंडूरोगी प्रकाश, सेकांदामागून सेकंद, तासामागून तास चालूच..
एकटेपणा शरीरावर चढत जातो शेवाळासारखा. मनावर अंधाराचे थरच्याथर चढत रहातात बुळबुळीत बुरशीसारखे. आतल्याआत आक्रसून जायला होतं, खोल अंधाऱ्या गढूळ पाण्यातल्या कोशातल्या किड्यासारखं.
त्या कोशातल्या अंधारातून बाहेरचं रंगीत जग दिसतं, पण कोश सोडता येत नाही, अनामिक आदिम भीती वाटत रहाते...
एखादा जरी रंगीत कवडसा पडला तरी, एखादा नवखा जीव उत्सुकतेने पाहू लागला तरी, जीव घाबरतो, अजून आक्रसून घेतो आतल्याआत.