✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

स्ट्रिंग थिअरीचा पाया

अ — अनन्त्_यात्री, Sun, 08/24/2025 - 17:56
(FunU)वादी लेखनाची होता उर्मी अनावर ब्रह्मलीन असूनही प्रकटू का मिपावर? बादरायणी संबंध येतील का माझ्या कामी? (एन्ट्रॉपीचे ॐकाराशी करू कलम कसे मी?) "जानव्याचा दोरा हाच स्ट्रिंग थिअरीचा पाया" हीच थीम ठेवूनिया लेख घ्यावा का पाडाया? ओव्या, अभंग, सूक्तांची लेखा जोडू का शेपटी? डिस्क्लेमर टाकावा का स्वांत:सुखाचा शेवटी? असिधारा व्रत माझे (FunU)वादी लेखनाचे जरी गायबलो सध्या लोड नका घेऊ त्याचे ! एक शिक्रेट सांगतो कोणालाही सांगू नका (FunU)वादी लेखनाचा माझा आ-मिपांत* ठेका ! ~~~~~~~~~~~~ *आ-मिपांत= मिपाच्या अंतापर्यंत प्रेमळ सूचना: मुमुक्षूंनी कृपया हलके घ्यावे :)))

प्रतिक्रिया द्या
2440 वाचन

💬 प्रतिसाद (10)

हाहाहा

डॅनी ओशन
Fri, 08/29/2025 - 13:13 नवीन
हाहाहा मस्तच. तुमची कविता क्वाणटम पातळीवर अतिशय प्रकाशित आहे.
  • Log in or register to post comments

डॅनी ओशन बरं झालं आठवण

अनन्त्_यात्री
Fri, 08/29/2025 - 16:45 नवीन
करून दिलीत. क्वांटमचा पेट फँटम कवितेत कोंबायचा ऱ्हायलाय हे विसरूनच गेलो होतो.
  • Log in or register to post comments

आणि ते 'सणातण' पण कोंबायचे र्‍हायले.

चित्रगुप्त
गुरुवार, 09/04/2025 - 17:15 नवीन
आणि ते 'सणातण' पण कोंबायचे र्‍हायले. -- (आमुचा हा प्रतिसाद '1' की '2' असा प्रश्न पडला आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री

तुमचा प्रतिसाद '1' की '2' हे हा पामर

अनन्त्_यात्री
गुरुवार, 09/04/2025 - 18:17 नवीन
काय सांगणार? आम्ही स्वतः पडलो '∞'_यात्री !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

जबरी

स्वधर्म
Fri, 08/29/2025 - 16:46 नवीन
"जानव्याचा दोरा हाच स्ट्रिंग थिअरीचा पाया" हीच थीम ठेवूनिया लेख घ्यावा का पाडाया? हे सॉलीड आहे :-)
  • Log in or register to post comments

दोन्ही कवीता....

कर्नलतपस्वी
Fri, 08/29/2025 - 17:11 नवीन
एकदम सर्जिकल स्ट्राईक म्हणावा का? मस्त.
  • Log in or register to post comments

प्रश्न

अनन्त्_यात्री
Fri, 08/29/2025 - 17:27 नवीन
(१) दुसरी कविता ? कोणती ? (२) सर्जिकल स्ट्राईक ? कोणावर?
  • Log in or register to post comments

गुलदस्त्यात राहू द्यात.....

कर्नलतपस्वी
गुरुवार, 09/04/2025 - 16:39 नवीन
तुमची पेरणा यातच उत्तर दडले आहे. बहुश्रुत मिपाकर नक्कीच ओळखतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनन्त्_यात्री

=))

सोत्रि
गुरुवार, 09/04/2025 - 11:15 नवीन
हा हा हा ... हे कस काय मिस झालं, जबरदस्तच आहे ! - (स्वांत-सुखी) सोकाजी
  • Log in or register to post comments

हा हा हा ....

श्वेता२४
गुरुवार, 09/04/2025 - 12:29 नवीन
भारी लीहीली आहे.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा