गुल्लक

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
27 Aug 2025 - 8:58 am

गणेशोत्सवाच्या मिपाकरांना सपरिवार हार्दिक शुभेच्छा.

मिपा वाढदिवसानिमित्त संस्थापकांचे स्मरण, आभार आणी संपादक,लेखक,वाचकांचे अभिनंदन.

गुल्लक.....

भातुकली खेळता,खेळता केंव्हा पुढे निघून गेली लक्षातच आले नाही.

अचानक आला
वादळाला घेऊन गेला
जपून ठेवीन मनात
काळजी करू नका
कानात सांगुन गेला

राजा राणीचा संसार. लग्नानंतर पहिल्यांदाच आई बाबां आले. हरखून गेली.

काय करू, काय नको असे झाले.

तीचा आनंद तोच त्याचा परमानंद. जोडीने अदरातिथ्थ चालले होते.

आई बाबांच्या डोळ्याचे पारणे फिटले.

दिवस भुर्रकन उडून गेले.

हुश्श!!!!

राजा ताळेबंद करू लागला.जमापुंजी संपली, त्याचा चेहरा चिंताग्रस्त झाला.

मनकवडी राणी बेडरूम कडे धावली, "थांब, काळजी करू नकोस, मी आलेच ..."

कानावर चिरपरिचित आवाज आला,"गुल्लक फोडू नकोस बेटा".

तीने इकडे तीकडे पाहीले.कुणीच नव्हते,भास होता तो.

कपाटात गुल्लकच्या खाली पाचशे रूपयांच्या करकरीत नोटांच बंडल दिसले.

ऐन उन्हाळ्यात श्रावणधारा बरसू लागल्या.

बाहेर मोबाईलवर गाणे वाजत होते....

"ओ री चिरय्या,नन्हींसी गुडीया....".

अठरा वर्षापुर्वी बाबाने घेऊन दिलेली "पिगीब्यांक", तिच्याकडे बघून हसत होती.

बाप माणूस

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

गणेशोत्सवाच्या मिपाकरांना सपरिवार हार्दिक शुभेच्छा.
मिपा वाढदिवसानिमित्त संस्थापकांचे स्मरण, आभार आणी संपादक,लेखक,वाचकांचे अभिनंदन.

शुभेच्छा आणि मनःपूर्वक अभिनंदन !
अगदी अस्संच असते मुली-वडिलांचे नातं ... मन हळवं झाले ! मुक्तक आवडलंच !

मुलगी असण्या साठी परम भाग्य लागते असे माझे म्हणणे आहे.

खुप्पच भावनात्मक पणे लिहिले आहे...

मागे यावर काही लिहिलेले आठवले...पुन्हा लिहिल वेळ मिळाल्यावर

श्वेता व्यास's picture

28 Aug 2025 - 3:46 pm | श्वेता व्यास

हृदयस्पर्शी, मन भावुक करणारं लिहिलंत.
गणेशोत्सवाच्या शुभेच्छा!

कुमार१'s picture

28 Aug 2025 - 6:48 pm | कुमार१

मुक्तक आवडलं.

Bhakti's picture

28 Aug 2025 - 7:24 pm | Bhakti

सुंदर!
आईवडिल देवदुतच असतात.मायाच्या सावलीचे प्रेमाचे मेघ असतात.आयुष्यभर मायेने बरसत राहतात.