शब्द. ..
सगळे शब्द कधी कधी साथ सोडून निघून जातात
दूर दूर रानात एकटे पळून जातात..
मन घिरट्या घालत रहातं वटवाघळांसारखं
पटकन फांदि न मिळणाय्रा..
प्रयत्न करतो मी खूप. शब्दांना पुन्हापुन्हा माझ्या दावणीला बांधायचा.
पण ते गेले एकदा,की जातातच.
पुन्हा परत भेटेपर्यंत!
शब्दांचा हा पाठशिवणीचा खेळ.
हेच माझं अटळ प्राक्तन आहे की काय
असं वाटेपर्यंत...
ते त्याच खेळाचा भाग म्हणून मला करवंदीच्या जाळीअडून डोकावणाय्रा उनाड पोरासारखे लांबून हळूच बघायला लागतात.