(दाराआडचा यजमान)
एक यजमान दाराआडून (नेत्रछिद्रातून)बाहेर बघतो
किती बाहेर?
दाराच्या बाहेर, जिन्याच्या पार
जिथे एक अनाहुत आला असेल बहुदा ....
असेल का तो अनोळखी, का बघून ओळख न दाखवणारा ?
येत असेल का तो ही
आप्तांच्या घरी , बिनकामाचा कुणाकडे?
यजमान दाराआडून बाहेर येऊ शकत नाही...
(पेपरातील बातम्या आणि माणसूकीची फसवणूक मानेवर जख्ख बसलेली असते)
मग तो कल्पनेचे पंख पसरतो,
त्या पंखावरुन अलगद फिरुन लेकरांना, मित्रांना भेटून येतो डोळे मिटून घेऊन
यजमान शांतपणे खुष राहतो....
दूरदेशी लेकरे आपल्याच जगात