Skip to main content

ठिकऱ्या

लेखक जव्हेरगंज यांनी मंगळवार, 13/10/2015 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
रात्री रस्त्यावर चालताना समुद्र माझ्या ओंजळीत लपला. उथळ पाण्यात चंद्र ढगाआडून खोल हसला. काळवंडलेली विवरं अनंतात रुतत गेली. आकर्षकणाची साखळी सहस्त्रकांत गोल फिरली. हलकेच तरंग उठले आणि चांदण्या बेभान झाल्या. ऊधानलेल्या समुद्रात सहर्ष हेलकावत खिदळत राहिल्या. कुठुनसा एक किरण लाजत लाजत चालुन आला अविरक्त अवकाशात फाटत फरफटत पुढे गेला नकळत माझ्या मुठीतून, विश्वातला एक थेंब रस्ताभर पाझरु लागला काळोखातला सुर्य अंधार चिरडत पेटत गेला कित्येक चकोर चांदण्या ऊधानून चमकत निसटुन गेल्या अवकाशाच्या निर्वातात एका ठिणगीच्या ठिकऱ्या झाल्या.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2767
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

पण नानू सरंजामेची 'झोपतो करुन हिमालयाची उशी' आठवले! :) (साधी उशीवाला)रंगा

जरी दिले मज वैभव तीनलोकींचे दास मी खरा त्या आकांक्षेचा नव्हे रजअणू मी असेन कोठल्या धुळीचा मी नच पक्वान्न परि खचित ते वांगं जरा बुद्धीभ्रम होईल हे नीट पहा! द्या न आकले त्या काळी मज हाका यद्यपि न शाश्वती मज येथल्या वासाची मजलाही नसे ठाऊक बरळणे कसले हे!! ____/\____ Sandy

In reply to by जव्हेरगंज

रात्री एकदाच फास्ट मोडमध्ये वाचून दिलेली ही शीघ्रप्रतिक्रिया... 'ज'री दिले मज वैभव तीनलोकींचे दास मी खरा त्या आकांक्षेचा न'व्हे' 'र'जअणू मी असेन कोठल्या धुळीचा मी नच पक्वान्न परि खचित ते वां'गं' 'ज'रा बुद्धीभ्रम होईल हे नीट पहा! द्या न आकले त्या काळी मज हा'का' 'य'द्यपि न शाश्वती मज येथल्या वासाची मजलाही नसे ठाऊक बरळणे कसले 'हे'!! आता सकाळी उठून नीट वाचून हा प्रतिसाद... "वाह! कुछ तो बात है तुममे, की मै हैरान रह जाता हू, समझमे ना आनेकी अदा बहोत खूब पायी है तुमने!" मस्त! आवडेश! Sandy