आठवण
जपला खिशात मी तुझा रुमाल होता
गुलाबी पाकळ्यांचा देही गुलाल होता.
आठवणीच्या खजिना उरात साठलेला
स्वप्नांच्या वाटेवरचा तो हमाल होता.
बांधलेला तुझ्यासाठी शब्दांचा महाल होता
शब्दांनीच उभा केला पुढती सवाल होता.
चढला होता रंग तुझ्या ही गालावरती
की तुझा अभिनय तेव्हा कमाल होता.
---- अभय बापट