साडेपाच इंच !

माम्लेदारचा पन्खा's picture
माम्लेदारचा पन्खा in जे न देखे रवी...
9 Aug 2017 - 10:04 pm

माझं मन कायम ह्या साडेपाच इंची चौकटीत वावरणारं . . . .
आजूबाजूला काय चाललंय हे पाहूनही न पाहिल्यासारखं करणारं . . .

काही वेगळं दिसलंच तर डोळे असूनही ह्या स्मार्ट खेळण्यातूनच बघतो. . .
मग समोर खाद्यजत्रा असो की प्रेतयात्रा . . तोच निर्विकारपणा असतो !

कधीकधी मरणही टिपतो मी दुसऱ्याचं कारण असं चित्र वारंवार कुठे दिसतं ?
कासावीस होतो फक्त तेंव्हाच जेव्हा बॅटरी उतरते किंवा इंटरनेट नसतं !

जगात असूनही जगाशी परत जोडण्यासाठी जपतो मी पासवर्ड. . . . .
आपण आणि आपला अंडा "सेल", कोणी माणुसकी करता का फॉरवर्ड ?

अभय-काव्यइशाराकाहीच्या काही कविताफ्री स्टाइलमुक्त कविताशांतरसवावरकवितामुक्तकसमाजव्यक्तिचित्र

प्रतिक्रिया

नाव वाचून अतींद्रिय अनुभव वैगरे वाटला.

रानरेडा's picture

10 Aug 2017 - 12:08 am | रानरेडा

मला पूर्वीची स्पॅम मेल्स आठवली .

पद्मावति's picture

10 Aug 2017 - 12:13 pm | पद्मावति

मस्त लिहिलंय. अंडा "सेल" ची उपमा खुप आवडली.

कंजूस's picture

10 Aug 2017 - 4:54 pm | कंजूस

एकूण मापं भयंकर नेमकं कवितेतून व्यक्त करत आहेत.
फार आवडली.