gazal

घे भरारी..मन म्हणाले...

सत्यजित...'s picture
सत्यजित... in जे न देखे रवी...
12 Mar 2017 - 7:38 am

घे भरारी..मन म्हणाले,पाखरु झालो...
सोडले घरटे..नभाचे लेकरु झालो!

जाहला अंधार तेंव्हा दाटली भीती...
वाटले की..वाट चुकले कोकरु झालो!

राजरस्त्याची तमा ना आडवाटेची...
मी तुझ्या कळपात घुसलो,मेंढरु झालो!

गाव सारा गाय का म्हणतो तुला कळले...
धन्य झाला जन्म की मी वासरु झालो!

बासरीचा सूर होणे मज कुठे जमले?
राधिकेच्या पैंजणांचे घुंगरु झालो!

हुंदके दाबून सारे स्वागता गेलो...
अन तुझ्याही हुंदक्यांशी रुबरु झालो!

घेतली हाती कलम बहुधा बरे झाले...
मी मुक्या संवेदनांची आबरु झालो!

—सत्यजित

gajhalgazalकविता माझीमराठी गझलकवितागझल

मंद थोडासा तुझा आभास किणकिणतो ..

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
8 Mar 2017 - 6:23 pm

सूर्यही दिवटीप्रमाणे फक्त मिणमिणतो
मी स्वत:भवती अशी कोळिष्टके विणतो

वेचतो माझेच मी अवशेष वाऱ्यावर
नी स्वत:मध्ये स्वतःला आणुनी चिणतो

वाटते आता भिती या चांदताऱ्यांची
मी तमाचे गीत एकांतात गुणगुणतो

शांततेवरची जरा रेषा हलत नाही
मंद थोडासा तुझा आभास किणकिणतो

चेहरा अपुला इथे जो तो बघुन जातो
आरशावर केवढा कल्लोळ घणघणतो

डॉ. सुनील अहिरराव

gajhalgazalहे ठिकाणकवितागझल

शांत अता या गाजा होणे नाही ..

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
8 Feb 2017 - 9:53 am

रंक कधीही राजा होणे नाही
(त्याचा गाजावाजा होणे नाही)

तू राणी आहेस चार भिंतीतच
खुला अता दरवाजा होणे नाही

तू तेथे मीही येथे आहे पण
मला तुझा अंदाजा होणे नाही

मी सारे विसरुन चाललो आहे
घाव नव्याने ताजा होणे नाही

मी नेकी दर्यात टाकली आहे
(शांत अता या गाजा होणे नाही)

डॉ. सुनील अहिरराव

gajhalgazalमराठी गझलहे ठिकाणगझल

दु:ख अवघा धृवतारा मागते

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
6 Feb 2017 - 11:56 am

मागचा सारा चुकारा मागते
दु: ख अवघा धृवतारा मागते

थेंबही नाही उभ्या रानात अन
जिंदगानी शेतसारा मागते

केवढे जहरुन हे गेले शहर
वीषही आता उतारा मागते

वेदना ओथंबुनी येतात अन
सूख मोराचा पिसारा मागते

जो कधी उधळून ती जाते स्वत:
प्रीत तो सारा पसारा मागते

डॉ. सुनील अहिरराव

gajhalgazalहे ठिकाणकवितागझल

कधीतरी.....

पराग देशमुख's picture
पराग देशमुख in जे न देखे रवी...
29 Jan 2017 - 3:41 pm

उकलत मनाची पाकळी
सांज हळवी होते; कधीतरी.....

भिजवून पापणी ओली
रात्र हळवी होते; कधीतरी.....

चुकवून पाहारे सारे
नजरा-नजर होते; कधीतरी.....

मोडून मनाची दारे,
तिची आठवण
उच ...!
येते;
ऊ...च...!!ऊ...च...!!!

(इतक्या रात्री कोण आठवण करतय कोण जाणे ?)
कधीतरी.....
-मुकुंद

gazalprayogअदभूतकविता माझीकाहीच्या काही कविताप्रेम कविताफ्री स्टाइलभावकवितामराठी गझलमुक्त कवितारतीबाच्या कविताअद्भुतरसकविताचारोळ्याप्रेमकाव्यमुक्तकगझल

चांदण्याला चांदणे समजू नये

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
27 Oct 2016 - 6:57 pm

एकमेकांना उणे समजू नये
(नी स्वतःला शाहणे समजू नये)

चांदणे परसामधे पडते म्हणुन
आपली तारांगणे समजू नये

माणसेही राहती रानीवनी
नेहमी बुजगावणे समजू नये

हे असे परक्यापरी येऊ नये
नी स्वत: ला पाहुणे समजू नये

ही कशाची भूल या रातीवरी
चांदण्याला चांदणे समजू नये

पाहते ती नेहमी माझ्याकडे
पण असे की, पाहणे समजू नये

डॉ. सुनील अहिरराव

gajhalgazalमराठी गझलहे ठिकाणकवितागझल

माहेर

प्रास's picture
प्रास in जे न देखे रवी...
23 Oct 2016 - 1:42 pm

असे माहेराचे घर
नसे कसली कसर
नुरे कसलाही भार
डोक्यावर

माहेराचे गणगोत
भला नात्यांचा हा पोत
प्रेम बहर भरात
ओतप्रोत

माहेराचे हे सदन
माझे स्वीकारे वंदन
असे माझाही राखून
एक-कोन

अरे माझिया माहेरा
राहो कितीही मी दूरा
फिटे दुःखाचाही भारा
मोदसारा

gazalकविता

गझल - अनुवाद करण्यास मदती हवी.

निनाव's picture
निनाव in जे न देखे रवी...
14 Sep 2016 - 8:27 pm

मित्रहो, मी नुकतंच गझल लिहिण्याचा एक प्रयत्न केला आहे. मराठी अनुवाद करण्याचे प्रयत्न केले., पण हवे तसे जमून येत नाहीये, तुम्ही प्रयत्न कराल काय ? जाणवले कि अनुवाद हे नुसते शाब्दिक असून चालणार नाही,

"ऐ ख़ुदा ना कर बेइज्जत इतना "

ऐ ख़ुदा ना कर बेइज्जत इतना
कि ज़ाहिद ही काफिर ना हो जाए

पढता रहा जो ता-उम्र तेरी इबादतें
जहन्नुम का हकदार ना हो जाए

फन जिसका था सिर्फ सच बयां करना
झूठखोरी मे ही मोहारत ना हो जाए

कंगरी कलेजे को रखे गरम बस इतना
कि दिल ही बेचिराख मेरा ना हो जाए

gazalगझल

व्यक्त न मी कुणास, तुज उमजेन का तरी

निनाव's picture
निनाव in जे न देखे रवी...
12 Sep 2016 - 8:25 pm

व्यक्त न मी कुणास, तुज उमजेन का तरी
- निनाव (१२.०९.२०१६)

व्यक्त न मी कुणास, तुज उमजेन का तरी
अव्यक्त गुंत भावनांची, तुज समजेल का तरी
आठवून विसरावे तुला, प्रयत्न मज आसवांचे
विसरलोच तुला जर कधी, मी उरेन का तरी

आस ही जगण्याची मी, सोडली नसली तरी
जगलो तुझ्याच साठी, तुज उमगेल का तरी
आठवून विचारावे तुला, अर्थ मज जगण्याचे
आठवलोच मी नाही तुज, मी उरेन का तरी

बहर गोड़ मज स्वप्नांना, कधी येईल का तरी
मन बंद पापण्यांना, चिंब भिजवेल का तरी
स्पर्श एक तुझे, मज स्वप्न कोवळे स्वप्नांचे
भंगूनि स्वप्न तुझे असे, मी उरेन का तरी

gazalप्रेमकाव्य

जाणिवांच्या जखमा

महेश रा. कोळी's picture
महेश रा. कोळी in जे न देखे रवी...
9 Sep 2016 - 12:07 am

हे असे दिवसा उजेडी आभाळ आंधारू नये
करावे उपकार कुणी केस मोकळे सोडू नये.

हसतोच आहे हाय मी मंदिरात अन् मसणातही
काय याला दुःख कसले?असे कुणा वाटू नये.

काल शिकलो मी धडा प्राक्तनाच्या बेदिलीचा
क्षणासाठी तोडले मोगऱ्याला , मग वाटले तोडू नये

का अशा जाणिवानां होतात जखमा सारख्या?
काळीज चिरणार्या अशा आठवां कुणी काढू नये.

....म्हैश्या

gazalसंस्कृतीकवितामुक्तकगझल