gazal

मेंदू

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
6 Jul 2015 - 4:48 pm

जे नको ते नेमका वाचाळतो मेंदू
रोज वारुणीमधे बुचकाळतो मेंदू

बंद कर पारायणे गीताकुराणाची
देवधर्माने अता भंजाळतो मेंदू

दिवस-वर्षांचे युगांचे जन्मजन्मीचे
कोणते संकेत हे सांभाळतो मेंदू

भेटलो होतो कधीकाळी जिथे आपण
त्याठिकाणी आजही रेंगाळतो मेंदू

तू जरा आता नवी होऊन ये दुनिये
त्याच त्या जगण्यास हा कंटाळतो मेंदू

जीवघेणे तू असे हासू नये राणी
तीव्र तेजाबापरी वाफाळतो मेंदू

डॉ.सुनील अहिरराव

gazalहे ठिकाण

डायरीचे पान

महासंग्राम's picture
महासंग्राम in जे न देखे रवी...
17 Jun 2015 - 12:03 pm

मज व्यथेची हाव कुठे,
कुंपणाची धाव कुठे

दुःख ही जरासे पचले नाही,
वेदनेला वाव कुठे

जिंकला समर जरी तो,
तरी सुखाची हाव कुठे

झाली माणसे परागंदा,
राहिले मज गाव कुठे

रेखले होते तुझे नाव ज्याच्यात,
हरवले ते डायरीचे पान कुठे

#जिप्सी

gazalमराठी गझलहझलकवितामुक्तकगझल