शांत अता या गाजा होणे नाही ..

drsunilahirrao's picture
drsunilahirrao in जे न देखे रवी...
8 Feb 2017 - 9:53 am

रंक कधीही राजा होणे नाही
(त्याचा गाजावाजा होणे नाही)

तू राणी आहेस चार भिंतीतच
खुला अता दरवाजा होणे नाही

तू तेथे मीही येथे आहे पण
मला तुझा अंदाजा होणे नाही

मी सारे विसरुन चाललो आहे
घाव नव्याने ताजा होणे नाही

मी नेकी दर्यात टाकली आहे
(शांत अता या गाजा होणे नाही)

डॉ. सुनील अहिरराव

gajhalgazalमराठी गझलहे ठिकाणगझल

प्रतिक्रिया

खुला अता दरवाजा होणे नाही
...
मला तुझा अंदाजा होणे नाही

इथे जरा ओढाताण झालीय का?

तुम्ही स्वतःच आमच्या अपेक्षा वाढवून ठेवल्या आहेत.

मी सारे विसरुन चाललो आहे
घाव नव्याने ताजा होणे नाही

या दोन ओळींतला एकूण भाव खूप आवडला. यासदृश मूडवाल्या नासिर काजमीच्या दोन ओळी आठवतात:

न अब वो यादोंका चढता दरिया न फुर्सतोंकी उदास बरखा
यूंही जरासी कसक है दिलमें जो जख्म गहरा था भर गया वो

मला तसे जाणवले नाही, पण असू शकते.गझलेतून व्यक्त होताना बऱ्याच मर्यादा येतात. विशेषत: मला तुझा अंदाजा होणे नाही,यात. नासिरचा शेर ग्रेट !
खूप खूप धन्यवाद सरजी !

योगेश लक्ष्मण बोरोले's picture

10 Feb 2017 - 4:29 am | योगेश लक्ष्मण बोरोले

चुटपुट लावणारी कविता ....

पैसा's picture

12 Feb 2017 - 11:54 am | पैसा

अगदी! म्हणजे कवितेतली भावना आणि वृत्तात जरा पक्की असती तर अजून छान वाटली असती अशीही चुटपुट!

अत्रुप्त आत्मा's picture

12 Feb 2017 - 10:50 am | अत्रुप्त आत्मा

व्वाह!

सत्यजित...'s picture

6 May 2017 - 7:40 am | सत्यजित...

>>>तू राणी आहेस चार भिंतीतच
खुला अता दरवाजा होणे नाही>>>बहोत बढिया!

>>>मी नेकी दर्यात टाकली आहे
(शांत अता या गाजा होणे नाही)>>>गजब शेर!क्या बात!!