Skip to main content

रेखाटने (स्केचेस)

लेखक इनोबा म्हणे यांनी मंगळवार, 10/06/2008 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
माझी काही जुनी रेखाटने... माध्यमः बॉन्ड पेपर, २ बी. पेन्सील व शेडींग पावडर

रुदाली - गझल ...

लेखक suralesandip यांनी सोमवार, 09/06/2008 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावणी कोठून आली ही वावटळ वाळवंटी स्वैर झाली ही वावटळ का फ़ुलांनी सजविले खोटेच मजला भावली मज आज आली ही वावटळ वादळाने बांधली कधिची सोयरी वीज बनुनी आज व्याली ही वावटळ आजही होते इरादे साधेच रे सांडली का आज प्याली ही वावटळ नेहमी तू भग्न, आता का रंगली रंग माझे आज ल्याली ही वावटळ 'दीप' विझला, थांबला झंझावात ही आज का झाली 'रुदाली' ही वावटळ --शब्दसखा! रुदाली म्हणजे, एखाद्याच्या मृत्युवर पैसे देउन रडण्यासाठी बोलवीलेली स्त्री .

(येऊ कसा तुमच्यात मी)

लेखक चतुरंग यांनी सोमवार, 09/06/2008 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
योगेश वैद्य यांची 'येऊ कसा तुमच्यात मी' ही कैफियत ऐकली आणि एकदम वेगळीच तक्रार डोक्यात रुंजी घालून गेली! ;) घालू कसा शर्टास मी? चालू कसा रस्त्यात मी? तन भारी माझे मला, मावेन का प्यांटीत मी? आरशात मावे न मी जाऊ कुठे, जाऊ कसा? संपेचना हे दोंद, का एवढा बहरात मी? आवळून पट्ट्यास ह्या पोटास ना जावू दिले एवढे जमते मला, आहे तसा निष्णात मी वाटे किती, भेटू तुला, सांगू तुला, का मी असा? पोट येते आधी जरासे आणि त्या पश्चात मी 'काटे' जरी मी मोडले ना थांबले खाणे तरी भेट घ्याया येत होतो अडकलो 'केकात' मी चतुरंग

तुला माहित आहे ?

लेखक शितल यांनी सोमवार, 09/06/2008 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
तुला माहित आहे तु कधी गोड दिसायचीस मी तुझ्याकडे पाहिल्यावर तु हळुच लाजायचीस आणि लाजुन हसल्यावर गोडच गोड दिसायचीस !! तुला माहित आहे तु कधी रूसायचीस तुला मी नकटे म्ह॑टल्यावर तु गाल फुगवुन रूसायचीस !! तुला माहित आहे तु कधी हसायचीस तुला टपोर्‍या मोगर्‍याचा गजरा दिला की तु माझ्याकडे पाहुन सु॑दर हसायचीस !! तुला माहित आहे तु कधी जळायचीस तुझ्या मैत्रिणीला मी गाडीवरून घरी सोडायचो तेव्हा तु जळुन जळुन जायचीस !! तुला माहित आहे तु कधी भाव खायचीस तुला कोणी प्रपोज केले की तु माझ्या बरोबर ए॑गेज आहे असे सा॑गुन जायचीस आणि मग माझा भाव वाढवुन जायचीस !!
Taxonomy upgrade extras

म. टा. मधे सुरु झालेले नवीन सदर , सेक्स न्यूज : नवं सेग्मेंट

लेखक शरुबाबा यांनी सोमवार, 09/06/2008 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
म. टा. मधे सुरु झालेले नवीन सदर सेक्स न्यूज : नवं सेग्मेंट http://maharashtratimes.indiatimes.com/articlelist/3103033.cms आपली प्रतीक्रीया ?

एस एम एस

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 09/06/2008 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
मला आलेला एक एस एम एस. रिमझीम पावसात तुला वाटत असेल चिंब भिजावे..... पाणी उडवत..गाणी गाताना... कोणी खास भेटावे.... हो ना ?..... अरे हो बोल ना ...लाजायचे काय त्यात?........ प्रत्येक बेडकाला असेच वाटत असते..... तुम्हाला आलेले धमाल एस एम एस....लिहा या इथे. काहीतरी भन्नाट वाचायला मिळेल .

बेळगावी मांडे

लेखक अजय जोशी यांनी सोमवार, 09/06/2008 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
प्रथमच मी बेळगावात गेलो. एका खानावळीत (फारशी वळवळ नव्हती.तशी ती रिकामीच होती) गेलो. बाके नव्हती. कसाबसा खाली बसलो. ओथंबलेला (चारी बाजूने) आचारी एकदम म्हणाला, "मांडेऽऽ". मला कळेचना. नेमकी काय चूक झाली. पुन्हा म्हणाला , "मांडेऽऽऽऽ". "असं होय..", म्हणून मी मांडी घालून बसलो. तो पुन्हा म्हणाला , "मांडेऽऽऽऽ ए ऽऽऽऽ". मला वाटले बेळगावात सेल्फ सर्विस असावी. म्हणून मी स्वतःच उठून ताट-वाटी वगैरे घेतले. तो पुन्हा म्हणाला , "मांडेऽऽऽऽ ए ऽऽऽऽ". यावेळी इतक्या जोरात म्हणाला की, मी घाबरून काहीतरी अर्थ लावून ताट वगैरे सर्व मांडीवर ठेवले.

गोळ्यांची आमटी...

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 09/06/2008 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आज आमच्या मातोश्रींची एक पाकृ तुम्हाला सांगणार आहे. हा पदार्थ खास आमच्या कोकणातला असून तुम्हाला सर्वांना हा पदार्थ आवडेल अशी आशा करतो. तशी आमची म्हातारी सुगरण आहे बरं का! :) पाकृचा स्त्रोत - वैदेही अभ्यंकर. शब्दांकन - तात्या अभ्यंकर. साहित्य (तीन ते चार इसमांना पुरेल इतपत) - एक वाटी चणाडाळ, साधारण दोन इंच सुक्या खोबर्‍याचा तुकडा, थोडीशी खसखस, तेल, तीखट, मीठ, हळद, गोडा मसाला, चिंच, गूळ, एक वाटी खोवलेला ताजा नारळ, कोथिंबीर, कढिपत्ता. सुकं खोबरं व खसखस छानशी भाजून घ्यावी व एकत्र वाटून त्याची पूड करून ठेवावी. कृती - चण्याची डाळ दोन तास भिजत टाकावी.

विहंग नायक, आदरांजली...

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 09/06/2008 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी व इंग्रजी रंगभूमीवरचे एक ज्येष्ठ कलावंत विहंग नायक यांचे अपघाती निघन झाल्याची बातमी आत्ताच कळली. बारामती येथे चित्रिकरणासाठी जाताना पनवेल येथे कळंबोलीजवळ हा अपघात झाला. अत्यंत डाऊन टू अर्थ व्यक्तिमत्व असलेला, रंगभूमीवरचा एक हरहुन्नरी आणि अतिशय गुणी कलाकार अकाली हरपला आहे. संपूर्ण मिसळपाव परिवारातर्फे या थोर कलावंताला विनम्र आदरांजली! तात्या.