✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

फटाके

अ
अविनाशकुलकर्णी यांनी
Tue, 11/05/2019 - 18:46  ·  लेख
लेख
फटाक्याची मजा आमच्या पिढी ने बालपणी मनसोक्त अनुभवली.. साधारण नवरात्र सुरु झाले की फटाक्या ्चे स्टोल्स लागायला सुरवात व्हायची.. त्या काळी फटाके पण स्वस्त होते १० रु त टोपली भर दारु (फटाके) यायची.. त्या काळात "तडतडी" नावाचा प्रकार खुप पोप्युलर होता तडतडी भिंतिवर घासली की इग्नाईत व्हायची अन तडतड आवाज करत जमीनीवर नर्तन करायची.. भुई चक्र... हातात धरायची चक्रे..लवंगी फटाके "लाल किल्ला तांबडे फटाक्याची लड...सुतळी बोम्ब..चंद्रज्रोत..नाग गोळी..भुईनळे.. टिकल्या.. चमन चिडी..आकाशात उडणारे बाण. लक्ष्मी फटाके...एक ना अनेक प्रकार असत.. सकाळी स्नान झाले की आवाजाचे फटाके वाड्यातली आम्ही मुले वाजवत असु... रात्री शोभेची दारु.. वाडा सिस्टीम असल्याने मधल्या चौकात दारु काम ाचालत असे... सकाळी कचरा गोळा झाला की त्यात न फुटलेले फटाके शोधणे त्याची सुरसुरी करणे ही वेगळीच मजा असे... शाळेत दिलेल्या पर्यावरण रक्षण आदी च्या शपता..आदी मुळे हल्ली मुलाना पण फटाके उडवण्यात फारसा रस दिसत नाहि.. पण लहान पणी मनसोक्त फटाके उडवले.... दिवाळी प्यारी त्या साठीच वाटायची ..
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक

प्रतिक्रिया द्या
1642 वाचन

💬 प्रतिसाद (1)

प्रतिक्रिया

छान आठवणी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 11/05/2019 - 19:09 नवीन
सुतळी बाँब लहानपणी खूप आवडायचा. व्हेलकोना कंपनी काय तरी नाव आठवतं. बाकी भुंगा, रेल्वे, हे पण छान होते. असो, अजून आठवणी टाकायला पुन्हा येईन. लक्ष्मी मोठे फटाके भारी होते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा