Skip to main content
लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 05/11/2019 18:17 या दिवशी प्रकाशित केले.

मला नोकरी लागेपर्यंत घरची परिस्थिती बेताची होती
आई खूप सुगरण होती -तिने "भरली वांग्याची भाजी केली -मस्त झाली होती
पुन्हा आईला म्हणालो ते तसली वांग्याची भाजी कर ना
तिने केली पण चव ठीक नव्हती -मी आईला म्हणालो भाजी पहिल्या सारखी नाही झाली
आई म्हणाले अरे महिना अखेर आहे तेल संम्पत आले आहे त्या मुळे तेल कमी वापरले
मी काहीच बोललो नाही
नोकरी लागली पहिला पगार झाला अन तिला त्या काळातला फेमस ब्रॅंड पोस्टमन रिफाईंड तेला चा डबा आणून दिला
तिला खूप भरून आले -व तिने जवळ घेऊन केसावरुन मायेनं हात फिरवला

लेखनविषय:

वाचने 1394
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया